आत्तापर्यंत आयकर रिटर्न भरल्यानंतर ते व्हेरिफाय करण्यासाठी ITR-V हा फॉर्म म्हणजे ITR फाईल केल्यावर आयकर विभागाच्या साईटवर तयार होणारी पोचपावती (acknowledgement) डाऊनलोड करावी लागत असे. नंतर सदर पावती सही करून सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर म्हणजे सी.पी.सी. बेंगलोरला पाठवावा लागत असे. नाही म्हटलं, तरी ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ होती. आता मात्र ही प्रकिया इलेक्ट्रॉनिकली त्वरित पूर्ण करण्याच्या ५ सोप्या आणि सहज पद्धती उपलब्ध आहेत. याबद्दल अनेकजणांना माहिती नसते.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अधिकृत वेबसाईट म्हणजेच ई-फायलिंग पोर्टलची लिंक पुढीलप्रमाणे- (https://www.incometaxindiaefiling.gov.in)
त्याआधी इव्हीसी (EVC) म्हणजे काय ते जाणून घेऊ-
- इव्हीसी EVC म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड.
- हा एक १० आकडी अंकाक्षरी (Alphanumeric) सांकेतांक असतो.
- हा कोड आपण आपले आयकर रिटर्न व्हेरिफाय करायची पढीलपैकी जी पद्धत निवडू, त्या पद्धतीत नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो.
- आयकर रिटर्नचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफिकेशन करण्याच्या प्रक्रियेत EVC हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
- EVC शिवाय आपले आयकर रिटर्न इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफाय होऊ शकत नाही.
ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती
- नेटबँकिंग–
-
- तुमच्या नेट-बँकिंगच्या खात्यात लॉग-इन करा.
- ई-फायलिंगच्या लिंकवर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर तुम्ही आपोआप इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग वेबसाईटशी जोडले जाल.
- तुमची इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल अपलोड करा (XML स्वरूपात.)
- व्हेरिफाय पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे रिटर्न व्हेरीफाय होईल.
- बँक खाते-
-
- इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.
- प्रोफाईल सेटिंग्जमध्ये तुमच्या बँक खात्याचा पर्याय निवडा.(सध्या फक्त निवडक बँकांसाठी उपलब्ध). ह्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे प्री-व्हॅलिडेशन करावे लागेल.
- व्हेरिफिकेशनची पद्धत म्हणून तुमच्या प्री-व्हॅलिडेटेड बँक खात्याद्वारे EVC पर्याय निवडा.
- तुमची इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल अपलोड करा (XML स्वरूपात.)
- तुमच्या नेंदणीकृत मोबाईल क्रमांकावर EVCपाठवला जाईल.
- विचारलेल्या जागी EVC टाईप करा.
- व्हेरिफाय पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे रिटर्न व्हेरीफाय होईल.
- डी-मॅट खाते-
-
- इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.
- प्रोफाईल सेटिंग्जमध्ये तुमच्या डी-मॅट खात्याचा पर्याय निवडा.(सध्या फक्त निवडक बँकांसाठी उपलब्ध). ह्यासाठी तुम्हाला खात्याचे प्री-व्हॅलिडेशन करावे लागेल.
- व्हेरिफिकेशनची पद्धत म्हणून तुमच्या प्री-व्हॅलिडेटेड डी-मॅट खात्याद्वारे EVC पर्याय निवडा.
- तुमची इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल अपलोड करा (XML स्वरूपात.)
- तुमच्या नेंदणीकृत मोबाईल क्रमांकावर EVCपाठवला जाईल.
- विचारलेल्या जागी EVC टाईप करा.
- व्हेरिफाय पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे रिटर्न व्हेरीफाय होईल.
- एटीएम (ATM)-
-
- तुमच्याच बँकेच्या ए.टी.एम.मध्ये तुमचे डेबिट कार्ड स्वाईप करा.
- पीन फॉर ई-फायलिंग ह्या पर्यायावर क्लिक करा. (निवडक बँकांसाठीच उपलब्ध.)
- तुमच्या नेंदणीकृत मोबाईल क्रमांकावर EVCपाठवला जाईल. हा कोड तुम्हाला बराच वेळ वापरता येतो.
- इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या आणि तुमच्या खात्यात लॉग-इन करा.
- व्हेरिफिकेशनची पद्धत म्हणून “Already Generated EVC through Bank ATM” ह्या पर्यायाची निवड करा.
- तुमची इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल अपलोड करा (XML स्वरूपात.)
- विचारलेल्या जागी इव्हीसी (EVC) टाईप करा.
- व्हेरिफाय पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे रिटर्न व्हेरीफाय होईल.
- आधारकार्ड–
-
- ई-फायलिंग पोर्टलवर तुमच्या खात्यात लॉग-इन करा.
- रिटर्न सबमिट करताना व्हेरिफिकेशनची पद्धत म्हणून आधार ओटीपी हा पर्याय निवडा.
- तुमच्या आधारकार्डशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
- तो ओटीपी ई-फायलिंग पोर्टलवर विचारलेल्या जागी टीप करा.
- व्हेरिफाय पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे रिटर्न व्हेरीफाय होईल.
मात्र, आधारकार्डचा पर्याय वापरण्यासाठी तुमचे पॅन व आधार कार्ड एकमेकांशी जोडलेले असणे आवश्यक आहे. आधार व पॅनकार्ड एकमेकांशी जोडणेही अत्यंत सोपे आहे. ई-फायलिंग वेबसाईटवर हाही पर्याय उपलब्ध असतो.
हे पर्याय वापरून आता आपण आपल्या भरलेल्या रिटर्नचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अगदी काही मिनिटांत व्हेरफिकेशन करू शकतो.
आयटीआर (ITR) संदर्भातील विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी http://bit.ly/ITR_FY2018_19 या लिंकवर क्लिक करा.
इन्कम टॅक्स ई-व्हेरिफिकेशन आता झाले सोपे,
मागिल आर्थिक वर्षांचे आय.टी.आर.(ITR) भरू शकतो का?,
आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे,
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.