डिजिटल ब्रोकर (Digital Broker)
भारतातील डिजिटल स्वीकाराचा थेट परिणाम एक्सचेंज इंडस्ट्रीवरही झाला आहे. डिजिटल भारतात ‘डिजिटल ब्रोकर (Digital Broker)‘ ही संकल्पनाही रुजू लागली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीसारख्या बेंचमार्क निर्देशांकांनी जवळपास ५०% पेक्षा जास्त परतावे मागील ४ वर्षात दिले. ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ सारख्या उपक्रमांना पाठिंबा देत भारतीय बाजाराने चांगलीच प्रगती केली आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांने या संधीचा फायदा घेतला आहे/ घेत आहेत. तुमचीही शेअर बाजाराच्या दुनियेत आपलं नशीब आजमावायची इच्छा असेल, तर डिजिटल ब्रोकर तुमच्या मदतीला तत्पर आहेत.
हे नक्की वाचा: शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती?
Digital Broker: डिजिटल ब्रोकर निवडण्याची ५ कारणे
१. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म:
- डिजिटल ब्रोकरची निवड करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ते तुम्हाला ट्रेडिंगची संपूर्ण सुविधा एकाच ठिकाणी मिळते, ते ही तांत्रिक सल्ला व विश्लेषणासहित.
- ऑफलाइन ब्रोकर तुम्हाला स्टॉकविषयी शिफारशी देतात. मात्र त्या स्टॉकमध्ये स्वत: रिसर्च करणे तुम्हाला कठीणअसते. त्यामुळे तुम्हाला जुजबी माहितीवर समाधान मानावे लागते किंवा तुमच्या ब्रोकरवर अवलंबून रहावे लागते. यामुळे तुमचा गोंधळ वाढू शकतो व शेअर्स खरेदी-विक्रीच्या किंमतींवरही परिणाम होतो. तुम्ही डिजिटल ब्रोकरकडे गेल्यास हे सर्व प्रश्न तत्काळ सुटतात.
- डिजिटल ब्रोकर खास करून चार्टची सुविधा, मार्केट स्कॅनर आणि मोबाइल ट्रेडिंग ॲप्लिकेशनची सुविधा देतात. याचमुळे गुंतवणूकदारासाठी महत्वाचे ठरतात. मात्र, ब्रोकरने त्याच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर काही शुल्क लावले आहे का, हे तपासून पहावे.
२. ट्रेडिंग किंमत:
- डिजिटल ब्रोकरचे महत्त्व सांगण्यामागील आणखी एक कारण म्हणजे ट्रेडिंगची किंमत.
- ट्रेडिंग कॉस्टमध्ये ब्रोकरेज व व्यवहार शुल्कापासून एएमसी, डिमॅट चार्ज आणि टॅक्सपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो.
- आता त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे टक्केवारीवर आधारीत ब्रोकरेज. म्हणजेच प्रत्येक व्यापार मूल्यावर (खरेदी किंवा विक्री दोन्हीतही) तुम्हाला पूर्वनिश्चित शुल्क टक्केवारीनुसार द्यावे लागते.
- ऑफलाइन ब्रोकर्स आणि काही डिजिटल ब्रोकरदेखील टक्केवारीवर आधारीत ब्रोकरेज पद्धत वापरत असल्याने गुंतवणुकदारांसाठी ते कमी फायद्याचे ठरते. तथापि, नामांकित डिजिटल ब्रोकर्स कमी शुल्क आकारतात, फिक्स ब्रोकरेज घेतात.
- संपूर्ण ऑर्डरच्या एकूण मूल्याऐवजी ट्रेड ऑर्डरवर फ्लॅट फी आकारली जाते. काही डिजिटल ब्रोकर्सचे इक्विटी डिलिव्हरीसाठी शून्य ब्रोकरेजदेखील असे. अशा घटकांमुळे आपल्या एकूण कमाईत मोठा फरक पडतो.
महत्वाचा लेख: IPO: आयपीओ गुंतवणूक करताना विचारात घ्या या महत्वाच्या गोष्टी
३. संशोधन :
- सध्याच्या डिजिटल युगात ‘डाटा’ अत्यंत महत्वाचा आहे.
- स्टॉकच्या किंमती वित्त, बाजारातील कामगिरी, त्रैमासिक निकाल, प्रमोटर शेअर होल्डिंग पॅटर्न, रेग्युलेटरी उपाययोजना, भौगोलिक घटना, गुंतवणुकादारांच्या भावना अशा विविध घटकांवर अवलंबून असतात. त्यामळे शेअर बाजारातील स्टॉक्सच्या किंमतींचा बऱ्यापैकी अंदाज येतो.
- तंत्रज्ञान हे डिजिटल ब्रोकर्सचे वैशिष्ट्य असल्यामुळे त्यांच्याजवळ अत्याधुनिक संशोधन करण्याची क्षमता असते.
- काही डिजिटल ब्रोकर्सनी गुंतवणूक इंजिनही विकसित केले आहेत, जे शिफारस करण्यापूर्वी (Stock recommendation) १ अब्ज डाटा पॉइंट्सचे विश्लेषण करते.
४. मार्जिनचा फायदा:
- तुमच्या खऱ्या गुंतवणुकीपेक्षा जास्त ट्रेडिंग करण्यासाठी मार्जिन ट्रेडिंग केली जाते. डे ट्रेडर्समार्फत ही सुविधा वापरली जाते. तसेच तुमच्या एकंदरीत नफ्यामध्ये मोठा फरक दिसून येतो.
- तुम्ही स्टॉक ट्रेडिंगमध्ये नवे असाल, तर तुम्ही मार्जिन ट्रेडिंगमधील जोखीम समजून घेतली पाहिजे. गोष्टी हाताबाहेर गेल्या तर तुम्ही तुमच्या गुंतवणूकीचे पूर्ण नुकसान होऊ शकते.
- ही सुविधा फक्त अनुभवी ट्रेडर्सनी त्यासोबतची जोखीम समजून घेत वापरली पाहिजे.
५. ग्राहक सेवा:
- डिजिटल ब्रोकर तुम्हाला केवळ एका क्लिकवर अनेक सेवा उत्कृष्टरित्या प्रदान करतो. त्यापैकी काहींकडे ऑनलाइन कस्टमर केअर प्रतिनिधी, रिलेशन मॅनेजर्स आणि २४ X ७ कस्टमर हेल्पलाइन नंबर्सची सुविधा असते.
- मूल्य आधारीत ब्रोकर्स यापुढेही जाऊन निवडक रिसर्च मटेरिअल्स गुंतवणूकदारांसाठी पुरवतात व वैयक्तिक सल्लाही देतात.
- वेबिनार्स, पॉडकास्ट्स आणि इतर संबंधित ग्राहक केंद्रित उपक्रमांचाही ग्राहकांना लाभ होऊ शकतो.
विशेष लेख: शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी आणि कशासाठी?
भारतातील सकारात्मक बिझनेस स्थितीसह रिटेल गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग पाहता, भारतीय शेअर बाजाराला अद्याप बरीच प्रगती करायची आहे, असे म्हणता येईल. जानेवारी १९९९ व जानेवारी २००९ दरम्यान ते तीन पटींनी वाढले. पुढील १० वर्षात ते जवळपास चौपट होईल. आतापासूनची गुंतवणूक १० वर्षांनी कुठे असेल, याचा विचार करा आणि हुशारीने गुंतवणूक करा.
श्री प्रभाकर तिवारी
सीएम, एंजल ब्रोकिंग लिमिटेड
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Digital Broker in Marathi, Digital Broker Marathi Mahiti, Digital Broker Marathi, Digital Broker mhanje kay? Digital Broker option Marathi Mahiti
1 comment
Can I have the latest review of CSE exam for august 2017. Thank you Karalee Mord Harv