Aadhaar - PAN Linking
Reading Time: 2 minutes

Aadhaar – PAN Linking

“आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी” म्हणजेच Aadhaar – PAN Linking ही केंद्रसरकारच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी मुदतवाढ देऊनही अनेकांनी आधार -पॅन लिंक केलेले नाही.

आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी (Aadhaar – PAN Linking)

 • “आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी”संदर्भात सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एक परिपत्रक एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जर नागरिकांनी ३१ मार्च  २०२१ पर्यंत आपले पॅन आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. 
 • आयकर कायद्यानुसार वरील मुदतीत आधार -पॅन लिंकिंग न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल.
 • रद्द झालेल्या पॅन क्रमाकांच्या सहाय्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
 • सर्व कंपन्यांच्या  कर्मचाऱ्यांना २०% अतिरिक्त कर द्यावा लागेल.

Aadhaar – PAN Linking: कशी कराल आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी ?

१. मोबाईल

 • तुमच्या रजिस्टर  मोबाईल वरून तुम्ही आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी करू शकता. 
 • यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 56161 या नंबरला एसएमएस करा. 

२. ऑनलाईन वेबसाईट

 • आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील पॅन आणि आधार क्रमांक लिंक करता येईल.
 • यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www1.incometaxindiaefiling.gov.in/
 • लिंकवर क्लिक केल्यावर एक वेबपेज ओपन होईल. त्यावरील माहिती भरून कॅप्चा टाईप करा अथवा ओटीपी मागवून तो भरावा लागेल.

 • त्यांनतर ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचे आधार -पॅन लिंक करू शकता.
 • नागरिकांनी आधार-पॅन लिंक करताना नाव व जन्मतारीख बरोबर असल्याची खात्री  करुन घेणे आवश्यक आहे. 
 • नाव अथवा जन्मतारीख यामध्ये चूक असल्यास,आधी ते दुरुस्त करुन घ्यावे लागेल. 
 • आधारमध्ये चूक असेल, तर यूआयडीएआय आणि पॅनमध्ये बदल करायचा असेल, तर आयकर विभागाशी संपर्क साधून त्यामध्ये दुरुस्ती करता येईल.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…