नकारात्मक जीडीपी
https://bit.ly/2BKZZwP
Reading Time: 2 minutes

 लघु, सूक्ष्म उद्योगांचे लॉकडाऊन

कोरोना महामारीमुळे देशभरातील उद्योग, संस्था आणि समाज यावर गंभीर परिणाम झालेला आहे. वित्तीय उदासीनता, शून्य महसूल निर्मिती यामुळे ७८% लघु, सूक्ष्म उद्योगांना (MSME) आपले कामकाज बंद करावे लागल्याचे भारतातील आघाडीची मोठी डेटा विश्लेषक-आधारित बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी स्पोक्टोने केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. 

करोना कर्ज म्हणजे काय?…

  • स्पोक्टोने ‘द ग्राउंड ट्रुथ-व्हॉइस ऑफ इंडियन बॉरोव्हर्स’ शीर्षकाखाली मुदत कर्ज देणाऱ्या संस्थांचा अभ्यास केला. 
  • ग्राहकांची गरज, याबाबत सध्याची जागरूकता, मोरॅटोरियमची समज आणि देय रकमेवर त्याचा परिणाम या अभ्यासातून दिसून आला.
  • मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरू इत्यादीसारख्या १८५ शहरांमधील खातेदारांचे विचार व दृष्टीकोन समाविष्ट असणाऱ्या अभ्यासातून आणखी काही ठळक बाबी निदर्शनास आल्या आहेत. 
  • सुमारे ५९% ग्राहकांचे कोव्हिड-१९ च्या काळात उत्पन्नात पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर केवळ ४ टक्के ग्राहकांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. 
  • सध्याच्या कामगार शक्तीतील ३४% कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. 

कोरोनाव्हायरस आणि करिअर

दैनंदिन गरजा भागविण्याकरिता वैयक्तिक कर्ज घेण्याकडे ग्राहकांचा कल –

  • लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर ग्राहकांकडे पैशांची चणचण निर्माण झाली असून दैनंदिन गरजा भागविण्याकरिता सुमारे ५६ टक्के ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे, तर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या २३ टक्के आहे. 
  • यानंतर व्यावसायिक कर्ज घेणा-या ग्राहकांचा (१७%), कार लोन (१६%), दुचाकी कर्ज (१५%), इतर कर्ज (५%) यांचा क्रमांक लागतो. 
  • एकूण खातेदारांपैकी ७६% लोकांनी ईएमआयमध्ये ५०,००० रुपयांची लहान कर्जे घेतली आहेत. परतफेड करण्यात गडबड झालेल्या कर्जांमध्ये सुरक्षित कर्जांपेक्षा असुरक्षित कर्जांचे प्रमाण जास्त आहे.
  • पुढच्या वर्षभराचा विचार केल्यास –
    • ३८ टक्के ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या कर्जाची गरज भासणार नाही.
    • ३७ टक्के ग्राहकांना मात्र लग्न, शिक्षण यांसारख्या वैयक्तिक खर्चकरिता कर्जाची आवश्यकता असणार आहे.
    • १६ टक्के ग्राहकांना गृहकर्जाची आवश्यकता भासणार असून स्वतःचे वाहन विकत घेण्याकरिता ९ टक्के ग्राहकांना कर्जाची गरज लागणार आहे.

कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !…

मोरॅटोरियमविषयी नाराजी –

  • मोरॅटोरियमविषयी जाणून घेतले असता निदर्शनास आले की ७८% ग्राहाकांनी इनिशिअल मोरॅटोरिअम कालावधी (मार्च ते मे) ची निवड केली. याचा अर्थ  २२ % त्यांच्या बँकेच्या मोरॅटोरिअम ऑफरची निवड केली नाही. 
  • ७५% कर्जदारांनी मोरॅटोरिअमध्ये अधिक स्पष्टता आणि त्याचे ज्ञान यावर भर दिला. 
  • ६४% कर्जदारांनी मान्य केले की, मोरॅटोरिअमच्या बदलामुळे व्याजावर काय परिणाम होतील याची त्यांना जाणीव आहे. 
  • ३८% ग्राहक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संवाद साधण्यास प्राधान्य देतात. 
  • ६२% कर्जदारांच्या वर्तणुकीतून असे आढळून आले की, “डिजिटल हे नव्या काळातील माहिती घेण्याचे माध्यम असून याद्वारे त्यांच्या सध्याच्या काळातील गरजा, पूर्वग्रहमूक्त, सतत व अखंड, अधिकृत परिणाम मिळण्यासाठी हे माध्यम महत्त्वाचे आहे.
  • मोरॅटोरिअमविषयी बँकांकडून मिळालेली अपूर्ण माहिती याबद्दल ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर असून मोरॅटोरिअममधील बदल ग्राहकांना समजवून सांगण्यात २८% ग्राहक बँकांमार्फत केलेल्या संवादाच्या पातळीवर असमाधानी होते, तर ४६% ग्राहक, बँकांनी यासाठी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल असमाधानी असल्याचे निदर्शनास आले आहे. 
  • ३७% ग्राहकांनी सांगितले की, पुढील १२ महिन्यात त्यांना वैयक्तिक खर्चासाठी आवश्यक कर्जाच्या रुपात वित्तीय प्रणालीचा आधार आ‌श्यक आहे. तर ५६% पेक्षा जास्त ग्राहकांनी मोरॅटोरिअममधून बाहेर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल…

२०२० – उद्योग आणि व्यावसायिकांसाठीचे दुःस्वप्न 

  • स्पोक्टो सोल्यूशन्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. समित श्रीवास्तव यांच्या मते, ‘देशातील उद्योग आणि व्यावसायिकांसाठी २०२० हे वर्ष एखाद्या दु:स्वप्नासारखे आहे.
  • या काळाने अनेक धडेही दिले आहेत. अर्थात बँकिंग आणि कर्ज देणाऱ्या इको सिस्टिमला आपली एंगेजमेंट धोरणे आणि योजना नव्याने विकसित कराव्या लागतील. कारण त्यांचे ग्राहक सध्या मिळालेल्या मुदतीत कर्जाची परतफेड करण्याच्या परिस्थितीत नाहीत. 
  • ग्राहक बाजारातील संभाव्य मंदीचे बळी आहेत. अशावेळी बँकांनी शॉर्ट टर्म डिफॉल्टर कमी करण्याऐवजी दिर्घकालीन ग्राहकांना महत्त्व दिले पाहिजे. 
  • बँकांनीही लोन डिस्बर्समेंटच्या डिजिटल आणि कुशल मार्गांच्या अत्याधुनिक पर्यायावर लक्ष केंद्रत केले पाहिजे. जास्तीत जास्त उपभोक्त्यांना आकर्षित करणे आणि गुंतवून ठेवण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. यामुळे या कमकुवत क्षेत्राला नियोजितकाळात स्वत:च्या पायांवर पुन्हा उभे राहण्यासाठी मदत मिळेल.

– Value360 Communications

 Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesकोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची? झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया –

आर्थिक आणीबाणी म्हणजे काय? 

Reading Time: 3 minutesआर्थिक आणीबाणी यावर सध्या प्रसार माध्यमातून विविध बातम्या येत आहेत. प्रत्यक्षात ही तरतूद आर्थिक (Economic) संबंधात नसून वित्तीय (Financial) संबंधात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक जनहित याचिकाही प्रलंबीत आहे. भारतीय राज्यघटनेत असलेल्या विविध  तरतुदींनुसार कलम ३५२, ३५६ आणि ३६० यानुसार भारताच्या राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे.

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Reading Time: 3 minutesकोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन. 

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

Reading Time: 5 minutesलॉकडाऊन मध्ये अनेकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत याची काळजी आणि एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येणाऱ्या नैराश्याने ग्रासलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसिद्ध बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर “चकोर गांधी” यांनी लॉक डाऊन मध्ये  बदललेल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक नियोजन व गुंतवणुकी संदर्भात मार्गदर्शन करणारा ऑडिओ आम्ही ऑडिओ आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करत आहोत.