Arthasakshar Alert from fake job offers
Reading Time: 3 minutes

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक 

कोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन. 

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकत्यांना एक सामाजिक जाणीव असणारी व मदतीस तत्पर असणारी व्यक्ती, अशी ओळख तिच्या कामामुळे मिळालेली असते. त्यामुळे केवळ ग्राहक या नात्याने नव्हे, तर अन्य कुठे काही समस्या आल्यास ‘इथे आपल्याला योग्य माहिती मिळेल’, अशा खात्रीने अधून मधून कुणी न कुणी त्यांच्याकडे येत असते. नोकरी बाबत संस्थेच्या कार्यकर्तीला अलीकडे आलेला अनुभव अतिशय बोलका आहे.  

 • त्यांच्याकडे धुण्याभांड्याचे काम करणाऱ्या मावशीनी त्याच्या मुलाला आलेले एका प्रतिथयश कंपनी नेमणूक पत्र दाखवले. 
 • हे पत्र एका खासगी प्लेसमेंट एजन्सीने दिले होते. पत्र हातात आल्यावर २ दिवसांनी नोकरीपूर्वी प्रशिक्षण आहे, त्याच्या खर्चापोटी २४ तासात ५०००/- भरावे. पैसे न दिल्यास नोकरीस मुकावे लागेल’, असे फोनवरून सांगितले गेले. 
 • मुलगा आईकडे पैसे मागू लागला. आईच्या मागे लागला आणि आई लगेच हो म्हणाली नाही, तर मुलगा बिथरला. 
 • मावशींना शंका आल्याने ते पत्र आपल्या कार्यकर्तीस दाखवून त्या होकार देतील, तर मी तुला पैसे देते असे त्यांनी मुलाला सांगितले. 
 • आपल्या मुलासह, प्लेसमेंट कंपनीचे पत्र व त्या अत्यंत सचोटीची म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंपनीचा केवळ लोगो असलेले (असा लोगो गूगल वरून सहज पळवता येतो) नेमणूकपत्र घेऊन मायलेकाची ही जोडी आपल्या कार्यकर्तीकडे आली. नेमणूक पत्र अधिकृत असल्याचे वाटत होते, मात्र त्या पत्रावर फक्त फोन नंबर होता. मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्या कंपनीच्या जनसंपर्क  विभागातून या नेमणुकीबाबत खातरजमा केल्यावर हे सर्व बोगस आहे, असे उघडकीस आले. 
 • बोगस नेमणुकपत्र देणाऱ्या प्लेसमेंट कंपनी विरुध्द याआधीच कायदेशीर कारवाई चालू केल्याचेही फोनवरून सांगण्यात आले. त्यामुळे होऊ घातलेले अधिक नुकसान टळले.

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

सावध रहा –

 • हा सारा ठरवून घडवून आणलेला आणि राजरोसपणे सुरू असलेला फसवणुकीचा धंदा असून त्यांचा स्वत:चा बिझनेस प्लॅन आहे. अर्धवट शिक्षण झालेले निम्न मध्यमवर्गीय हे त्यांचे गिहाईक आहेत.
 • वाढलेली बेकारी, व्यवसायापेक्षा नोकरीचे आकर्षण, काही कामे हलकी असल्याची व आपला जन्म यासाठी झालेला नसल्याची समजूत, पालकांची मानसिकता इत्यादी अनेक गोष्टी या गोरखधंद्यास पूरक आहेत. 
 • त्यांचे स्वतःचे ऑफिस निश्चित नाही, असेलच तर टेबल प्लेट असते ज्याचा कुठेही पत्ता दिलेला नसतो. वेबसाईट व फक्त भ्रमणध्वनी इतका संपर्क  दिलेला असतो. 
 • विविध नोकरी देणाऱ्या ठिकाणाहून उपलब्ध नोकऱ्या, गरजू व्यक्ती शोधतात. या एजन्सीजनी अनेक मध्यस्थांशी संधान बांधलेले असते. त्यांनी देऊ केलेली नोकरी बऱ्यापैकी पगार देणारी असते.
 • नोकरी हवी असलेल्या व्यक्तीची मुलाखत फोनवरून घेतली जाते. नेमणूक पत्र पत्र देऊन तुलनेने कमी फी मागितली जाते. नोंदणी फी / कमिशन ऑनलाईन घेतली जाते.
 • सर्वसाधारण फसवणूक झालेली व्यक्ती सदर रक्कम सोडून देते. कोणतीही कारवाई करायची तर मूळ चालकाचे नाव पत्ता माहित नसते. अशी सर्वांची थोडी थोडी रक्कम मिळून लाखो रुपयांची कमाई होते. काहीच नाही तरी नोंदणी करायला सुद्धा किमान हजार रुपये भरावे लागतात. ते जातातच शिवाय खोटे नेमणूक मिळाल्यास त्यासाठी दिलेली कमिशन रक्कमही सोडून द्यावी लागते.
 • प्लेसमेंट एजेंसी कडून ग्राहकांनी ही विकत घेतलेली सेवा असल्याने फसवणूक ही सेवेतील त्रुटी म्हणून ग्राहक संरक्षण कायदा, फसवणूक म्हणून कलम ४२०, मोनोग्रामचा गैरवापर केल्याने कॉपीराईट कायदा अशा अनेक कायद्याने यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे. 
 • सरकारने प्लेसमेंट एजन्सीजवर कायदेशीर अंकुश बसवणे जरुरीचे आहे.

फसवुकीपासून स्वतःला कसे वाचवाल?

एक सजग ग्राहक म्हणून अशी प्लेसमेंट सेवा घेणाऱ्यानी खालील काळजी घ्यावी.

 • कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोकरीच्या संधी शोधाव्यात.
 • जॉब पोर्टल वर आपली माहिती टाकताना आपल्याला कोणत्या प्रकारची नोकरी हवी त्याचा स्पष्ट उल्लेख करावा.
 • नोकरी निश्चित करण्यासाठी प्रथितयश कंपन्या फी आकारात नाहीत. नोंदणी फी वैयक्तिक नावावर घेतली जात नाही. ऑनलाईन रक्कम पाठवताना आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी.
 • आपल्याला मेल कुठून आला? तो मोफत मेल पाठवणाऱ्या साईट वरून आला की कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून ते तपासून पाहावे.
 • कंपनी पत्ता, फोन, संकेतस्थळाचे स्पेलिंग नीट तपासून पाहावे.
 • नामसाधर्म्य असलेल्या गोष्टी लक्षात येण्यासाठी अत्यंत बारकाईने पाहावे लागते. नेमणूक पत्र याबाबत शंका असल्यास कंपनीच्या अधिकृत फोनवरून चौकशी करावी.
 • आपल्याला पाठवणारी व्यक्ती प्रत्यक्षात आहे विचारून पाहावे.
 • आपल्या माहितीतील कोणी तेथे कामकरीत असल्यास तेथून माहिती मिळावावी.
 • आपली खरीखुरी पात्रता ओळखून त्याहून अधिक रकमेची किंवा सर्वसाधारण नोकरीत होणारी पगारवाढ पेक्षा अधिक पगारवाढ देणारी नोकरी कोणी देत असेल, कंपनी नोंदणी कार्यालयाशिवाय एखाद्या घरात किंवा हॉटेलमध्ये मुलाखत घेत असेल तर गाफील राहू नका.
 • योग्य प्रकारे काळजी घेऊनही फसवणूक झाली तर सोडून देऊ नका शक्यतो सर्व ठिकाणाहून पाठपुरावा करा. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग करावा. आपली तक्रार मार्गदर्शन केंद्रे मदतीला आहेतच.

सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना

– उदय पिंगळे

मुंबई ग्राहक पंचायत

(पूर्वप्रसिद्धी – सदर लेख दि. २४/०४/२०२० च्या “दैनिक नवशक्ती – मुंबई आवृत्ती” मध्ये ‘ग्राहक मंच’ या सदरात ‘नोकरी देण्याचा बहाणा-फसवणुकीचा गोरखधंदा’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला आहे.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्कक्लेमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutes कोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची? झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया –

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

आर्थिक आणीबाणी म्हणजे काय? 

Reading Time: 3 minutes आर्थिक आणीबाणी यावर सध्या प्रसार माध्यमातून विविध बातम्या येत आहेत. प्रत्यक्षात ही तरतूद आर्थिक (Economic) संबंधात नसून वित्तीय (Financial) संबंधात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक जनहित याचिकाही प्रलंबीत आहे. भारतीय राज्यघटनेत असलेल्या विविध  तरतुदींनुसार कलम ३५२, ३५६ आणि ३६० यानुसार भारताच्या राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे.