Arthasakshar Stock Market movies
https://bit.ly/32dBkeZ
Reading Time: 3 minutes

Stock Market movies:स्टॉक मार्केटवर आधारित चित्रपट 

आजच्या लेखात आपण गुंतवणूकदारांनी आवर्जून पाहावेत अशा स्टॉक मार्केटवर आधारित काही रंजक चित्रपटांबद्दल (Stock Market movies) माहिती घेणार आहोत.

स्टॉक मार्केट गुंतवणूक जसा भरघोस फायदा करून देते, त्याचप्रमाणे त्यातून खूप तोटाही होण्याचा तितकाच संभव असतो. परंतु त्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तेजीने होणारे चढ-उतार, व्यवहार, तिथे असणारे गुंतवणूकदार अशा मार्केट संदर्भातील अनेक गोष्टींची कल्पना येणे नेहमीच फायद्याचे ठरते. स्टॉक मार्केटची माहिती मिळवण्याचे पर्याय म्हणजे त्यासंदर्भातील कोर्सेस करायचे, पुस्तके वाचायची, भाषणे ऐकायची, लेख वाचायचे वगैरे. पण हे पर्याय अनेकांना फारच कंटाळवाणे आणि वेळखाऊ वाटतात. अशा वेळी काही मनोरंजक मार्ग मिळाला की ज्यामधून शेअर बाजाराबद्दल अंदाजही येईल आणि त्यासाठी फार वेळही नाही द्यावा लागणार तर तो सर्वांनाच आवडेल, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी स्टॉक मार्केट गुंतवणुकीवर आधारित  काही चित्रपटांची माहिती देणार आहोत. 

हे नक्की वाचा:शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाच्या टिप्स

Stock Market movies: स्टॉक मार्केटवर आधारित ९ रंजक चित्रपट 

१. द बिग शॉर्ट (२०१५):

  • हा चित्रपट मायकेल लुईस यांनी लिहिलेल्या एका नॉन-फिक्शन पुस्तकावर आधारित आहे.
  • ऍडम मॅके दिग्दर्शित या चित्रपटाने २०१५ चा ऑस्कर पुरस्कारासोबतच इतर ३७ पुरस्कार पटकावले आहेत.
  • वॉल स्ट्रीटचे गुरू मायकल बर्री यांना अनेक गृहकर्जाची परतफेड होऊ शकणार नाही याची जाणीव झाली. त्याचा फायदा उचलण्यासाठी त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रामध्ये १ अब्ज डॉलर्सहुन अधिक पैसे गुंतवून त्या क्षेत्राला महत्व प्राप्त करून दिले.
  • या त्यांच्या कृतीने लोभी बँकर जेरेड व्हेनेट यांचेही लक्ष वेधले आणि अमेरिकेमध्ये येणाऱ्या आर्थिक मंदीमध्ये यांनी निर्माण केलेल्या मोठ्या कृत्रिम फुगवट्यामध्ये भरपूर पैसे कमावले.
  • हा चित्रपट म्हणजे विनोदाचा आधार घेऊन अशा आर्थिक संकटाची मांडणी आहे ज्यामुळे ८ दशलक्ष लोकांनी आपली नोकरी गमावली. 

https://youtu.be/vgqG3ITMv1Q

२. द वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट (2013):

  • हा चित्रपट जॉर्डन बेलफोर्ट यांच्या सत्य कथेवर आधारित आहे.
  • जॉर्डन हे अगदी कमी गुंतवणूक करण्यापासून ते अगदी वॉल स्ट्रीट वरच्या काही मोठ्या व्यक्तींपैकी एक असे व्यक्तिमत्व.
  • जॉर्डन बेलफोर्ट त्यांच्या एका मित्रांसोबत स्टॉक ब्रोकर्सची कंपनी सुरु करतो आणि त्याच्या ग्राहकांना खोटी प्रलोभने दाखवतो. त्यासाठी तो वेश्या आणि ड्रग्सच्या व्यवसायाचा आधार घेतो आणि भरपूर पैसे कमावतो.
  • यामध्ये तो इतका यशस्वी होतो की त्याची नाव फोर्ब्स सारख्या अत्यंत प्रख्यात मासिकाकडूनही घेतली जाते. पण ही फसवाफसवी त्यांच्याकडे लक्ष असलेल्या FBI मुळे समोर येते. गुंतवणूकदारांना खूप मोठ्या प्रमाणात सिक्युरिटीज च्या घोटाळ्यामध्ये फसवल्याबद्दल यांनी २२ महिने जेलमध्येही काढलेले आहेत. यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये लिओनार्डो दि कॅप्रिओची आहे. 

https://youtu.be/iszwuX1AK6A

इतर लेख: शेअर बाजार पार्टीसिपंटस – प्रकार आणि अर्थ 

३. इक्विटी (२०१६):

  • हा असाच एक आर्थिक परिस्थितीवरील रहस्यमय चित्रपट आहे. याची दिग्दर्शिका आहे मीरा मेनन.
  • या चित्रपटात नाओमी बिशप नावाची एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे.
  • ती भ्रष्ट असल्याचा संशय घेणाऱ्या एका सरकारी वकिलाकडून तिच्यावर नजर ठेवली जात आहे. त्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त करण्यासाठी एका विश्वासू सहकाऱ्याने विश्वासघात करून तिला भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवले आहे.

https://youtu.be/Xg2TSp5tJy4

४. बाजार (२०१८):

  • अलीकडच्या काळातल्या या चित्रपटात सैफ अली खान, राधिका आपटे आणि रोहन मेहरा यांच्या प्रमुख भूमिकाआहेत.
  • या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरव चावला यांचे आहे.
  • हा चित्रपट इनसायडर ट्रेडिंग, अंतर्गत पद्धतशीर भ्रष्टाचार आणि परस्पर विरोधी टेकओव्हर यासंबंधी आहे. 

https://youtu.be/Pb7iJnIWzNk

५. द आस्सेन्ट ऑफ मनी (२००८):

  • निल फर्ग्युसन लिखित हा माहितीपट एकूण ८ भागांचा हा माहितीपट जगाच्या आर्थिक व्यवस्थेवर आधारित आहे.
  • हा माहितीपट पैसे, कर्ज आणि बँकिंग या मुख्य विषयाभोवती फिरतो.
  • आधुनिक समाजाची बांधणी, त्यांची वर्तणूक सद्दयस्थितीत आपण अनुभवतो तशी का आहे, याचे उत्तर या माहितीपटामध्ये उलगडते.
  • शेअर बाजार, पाश्चिमात्य अर्थव्यवस्थेचे बबल्स, त्यातले कमालीचे तीव्र चढ-उतार आणि अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण का निर्माण करतात हे सर्व या माध्यमातून आपण समजून घेऊ शकाल.

https://youtu.be/o3C-OaWTB_U

हे नक्की वाचा:शेअर ट्रेडिंग ॲप्स – सुरक्षित ट्रेडिंग करण्याचे ५ मार्ग

६. इंसाईड जॉब (२०१०):

  • हा पाच भागांचा माहितीपट बँकिंग आणि त्याविषयीच्या धोरणांवर आधारित आहे.
  • चार्ल्स फर्ग्युसन यांनी दिग्दर्शित केलेला हा माहितीपट २००८ साली आलेल्या आर्थिक संकटावर आधारित आहे.
  • या माहितीपटाला २०१० चा ‘सर्वोत्तम वैशिष्टये असलेला माहितीपट’ हा अकादमी पुरस्कारही प्राप्त आहे.
  • यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे २००८ साली आलेल्या या आर्थिक संकटाची पूर्वकल्पना भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री. रघुराम राजन यांनी २००५ च्या सुरुवातीला दिली होती. 

https://youtu.be/FzrBurlJUNk

७. टू बिग टू फेल (२०११):

  • हा चित्रपट अँड्र्यू रॉस सॉरकीं यांच्या याच नावाने असणाऱ्या पुस्तकावर आधारित आहे.
  • हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आला होता.
  • २००८ साली लेहमन ब्रदर्स कोसळण्यापूर्वी व नंतर उद्भवलेली परिस्थिती वाचवण्यासाठीच्या ‘पडद्यामागील कृतीं’चा इतिहास या चित्रपटात दाखवला आहे.
  • ही परिस्थिती सावरण्यासाठी अमेरिकन कोषागार आणि फेडरल रिझर्व्ह यांनी त्यावेळी जे प्रयत्न केले त्यावर आधारित आहे.
  • सर्वप्रथम हा चित्रपट HBO वर प्रदर्शित करण्यात आला होता.

https://youtu.be/E7YSrmRe9zY

८. चेंजिंग मॅडॉफ (२०११):

  • हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
  • हॅरी मार्कोपोलोस यांच्या ‘नो वन वूड लिसन’ नावाच्या नॉन-फिक्शन प्रकारातल्या कादंबरीवर हा चित्रपट काढलेला आहे.
  • लेखकाने यूएस सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशन यांनी बर्नी मॅडॉफच्या पॉन्झी योजनेचे चौकशी पुरावे मिळवण्यासाठी १० वर्षे प्रयत्न केले.
  • या योजनेच्या माध्यमातून साधारणतः १८ अब्ज डॉलर्सची फसवणूक झाली होती ज्यामध्ये बनावट परताव्यांचाही समावेश होता.

https://youtu.be/rpH_NNjModY

इंट्रा डे ट्रेडिंग : योग्य स्टॉक्सची निवड कशी कराल?

९. मार्जिन कॉल (२०११):

  • विचार करायला प्रवृत्त करणारा हा सिनेमा जे. सी. चांदोर यांनी दिग्दर्शित केला आहे.
  • हा चित्रपट म्हणजे २००८ साली आलेल्या आर्थिक संकटाच्या काही तास आधीची कहाणी आहे.
  • ही अर्थव्यवस्था कोलमडू न देण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या व्यर्थ प्रयत्नांचा आढावा हा चित्रपट घेतो.
  • यामध्ये मोठ्या वित्तीय संस्था कशा चालतात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रेरणास्थान काय असते, हे या चित्रपटामध्ये दाखवले आहे.

https://youtu.be/IjZ-ke1kJrA

या लेखांच्या माध्यमातून आपण स्टॉक मार्केटच्या विविध पैलूंची झलक दाखवणाऱ्या, त्याचे परिणाम दर्शवणाऱ्या विविध चित्रपटांची माहिती घेतली. या चित्रपटांमधून बोध घेऊन, योग्य त्या मार्गांचा अवलंब करून आपल्याला स्टॉक मार्केटमधून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. त्याशिवाय कुठे व कशी सावधानता बाळगायची याचीही कल्पना येते.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…