Housewife and ITR
Reading Time: 4 minutes

Housewife and ITR

गृहिणींना आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ‘हो’ असे आहे. गृहिणींना आयकर विवरणपत्र (Housewife and ITR) दाखल करण्याची गरज नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हा  लेख तुमचे सगळे गैरसमज दूर करेल. 

Housewife and ITR

  • आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे याचा अर्थ कर भरावा लागेल,असा नाही. आपण कर न भरता निल रिटर्न फाईल (Nil Return) फाईल करू शकता. 
  • गृहिणी म्हणून तुम्ही असा विचार करत असाल की तुम्हाला कोणतेही उत्पन्न मिळत नाही म्हणून तुम्हाला आयटीआर दाखल करण्याची  गरज नाही तर, एकाअर्थी आपण बरोबर विचार करत आहात. कायद्यानुसार आपल्याला आयटीआर भरण्याची गरज नाही. तथापि, आयटीआर भरल्यामुळे वेगवेगळ्या मार्गांनी त्याचा फायदा गृहिणींनाहोऊ शकतो. 
  • गृहिणींशी संबंधित असलेल्या उत्पन्नाचा उदा. घर खर्चासाठी मिळालेले पैसे, गुंतवणुकीवरील व्याज, मिळालेले गिफ्ट्स, दागिने विकून मिळालेले पैसे,अशा गोष्टींचा विचार कधी गृहिणीने केला नसेल.

हे नक्की वाचा: आयकर वाचविण्यासाठी ‘गिफ्ट डीड’ हा चांगला पर्याय आहे का? 

गृहिणींना मिळणारे उत्पन्न –

१. घरगुती खर्चासाठी मिळालेले पैसे 

  • हे आपले नक्कीच उत्पन्न नाही परंतु आपण आपल्या जोडीदाराकडून मिळालेले पैसे किंवा घरातील खर्चासाठी किंवा घराच्या बजेटसाठी कुटुंबातील सदस्याकडून मिळालेले पैसे. हे पैसे कर भरलेल्या उत्पन्नाचे आहेत म्हणून त्यावर परत आयकर भरावा लागत नाही. 
  • जर काही कौटुंबिक खर्चासाठी जोडीदाराने बँक खात्यात जास्त रक्कम जमा केली असेल आणि गृहिणी त्या खात्यातून पैसे काढत असतील किंवा खर्च करत असतील, तर कदाचित आयकर विभाग नोटीस पाठवून अशा व्यवहारांची तपासणी करू शकते किंवा खातेदार गृहिणी आयटीआर दाखल करीत आहेत की नाही याबद्दल आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवून त्यासंदर्भात तपासणी करू शकते. 
  • अशी प्रकरणे कमी असली तरी भविष्यात अशा नोटीसला सामोरे जायची वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आयटीआर दाखल करणे अधिक चांगले. 

२. व्याजाच्या स्वरुपात मिळालेले उत्पन्न  

  • गृहिणी म्हणून दोन कारणांमुळे तुम्ही व्याज मिळवू शकता. पहिले म्हणजे, तुमच्या पालकांनी तुमच्या लग्नाच्या आधी तुमच्या नावावर मुदत ठेव किंवा व्याज देणाऱ्या अन्य गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा अन्य नातेवाईकांकडून लग्नामध्ये भेट म्हणून मिळालेल्या गुंतवणूक योजना. तर, दुसरे म्हणजे,बँक खात्यातील जमा उत्पन्नावर मिळणारे व्याज. 
  • पहिल्या प्रसंगी, जेवढे व्याज स्वरुपात उत्पन्न आपल्या हातात येईल ते घोषित करून त्यावर कर भरावा लागेल आणि दुसऱ्या प्रसंगात, आपल्या बँक खात्यातील जमा रकमेवर मिळालेले व्याज करपात्र असल्याने त्यावर आयकर भरावा लागतो. 
  • कलम ८० टीटीए नुसार बचत खात्यावरील व्याजाला रु. १० हजारची सुट मिळते. आपल्याला एका आर्थिक वर्षात जर रु. २ लाख ५० हजार पेक्षा जास्त व्याज स्वरुपात उत्पन्न मिळाले तर ते करपात्र होते. 

महत्वाचा लेख: Tax and Gold jewellery: आपण किती सोने बाळगू शकतो?

३. मिळालेल्या भेटी किंवा भेटवस्तू

  • अनेकदा नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व कुटूंबाकडून भेटवस्तू मिळतात. काही ठरविक नातेवाईक आणि निकटवर्तीयांकडून मिळालेल्या किंवा प्राप्त झालेल्या भेटी किंवा भेटवस्तू पूर्णपणे करमुक्त आहेत, तर इतरांकडून मिळालेल्या भेटी किंवा भेटवस्तू ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मिळालेल्या किंवा प्राप्त झालेल्या भेटी किंवा भेटवस्तू करपात्र आहेत. 
  • जर तुम्हाला गेल्या काही वर्षांत भेटी किंवा भेटवस्तू मिळाल्या असतील तर त्या आयटीआर मध्ये दाखवून त्यावरील कर भरावा किंवा मिळालेल्या भेटी किंवा भेटवस्तू या करमुक्त म्हणून घोषित करायच्या आहे किंवा नाही याची सनदी लेखापाल, कर सल्लागार, टक्स रिटर्न प्रीपेरर कडून तपासणी करून घ्यावी. 
  • अशा सर्व भेटवस्तू रेकॉर्डवर आणण्यासाठी जेणेकरून भविष्यात काही प्रश्न उद्भवू नयेत म्हणून आयटीआर दाखल करणे नेहमीच चांगले. 

४. दागिन्यांची विक्री करून झालेला नफा अथवा तोटा

  • जर आपण कोणतेही दागदागिने, सोन्याने बनवलेल्या वस्तू विकल्या असतील आणि त्या बदल्यात पैसे किंवा इतर दागिने घेतले असतील किंवा प्राप्त झाले असतील तर हा व्यवहार भांडवली नफा किंवा तोटा या उत्पन्नाच्या प्रकारात मोडतो. 
  • समजा, तुम्हाला विवाहसोहळा किंवा समारंभात आपल्या नातेवाईकाकडून १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत व ते आपल्या आयकर विवरणपत्रात करमुक्त भेट म्हणून आपणास मिळाल्याची माहिती देणे आवश्यक आहे. 
  • जर तुम्ही आयकर विवरणपत्रात करमुक्त भेट म्हणून आपण विवाहसोहळा किंवा समारंभात आपल्या नातेवाईकाकडून १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाल्याची माहिती आयकर विवरणपत्रात दिली नाही आणि काही कारणास्तव एका विशिष्ट वर्षात ते दागिने २ लाख रुपयांना विकले असेल, तर नफा २ लाख रुपये समजला जाईल कारण तुम्ही हे सोन्याचे दागिने तुमच्याकडे करमुक्त भेट स्वरुपात मिळाल्याची माहिती आयकर विवरणपत्रात दिली नाही. 
  • जर आयकर विवरणपत्रात सोन्याचे दागिने भेट स्वरुपात मिळाल्याची माहिती दिली असेल तर त्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत १ लाख रुपये आहे, हे तुमच्याकडील तुम्ही भरलेल्या आयटीआर नुसार समजेल म्हणजेच तुम्ही आयटीआरमध्ये माहिती सादर केल्यामुळे तुमचा भांडवली नफा कमी करण्यास मदत होऊ शकते. 
  • याचा अर्थ गृहिणी म्हणून आपणासही अशा प्रकारचे उत्पन्न मिळू शकते जे आयकर विवरणपत्रात जाहीर करावे लागेल आणि म्हणूनच आय टी रिटर्न भरणे आवश्यक आहे.

विशेष लेख: आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

गृहिणींनी आयटीआर दाखल केल्यास  मिळणारे फायदे – 

१.उत्पन्नाची नोंद

  • तुमच्या उत्पन्नाचा आय टी रिटर्न इतका खरा रेकॉर्ड कोणताच नाही. 
  • आय टी रिटर्न द्वारे आपण उत्पन्न मिळवल्याचे सरकार प्रमाणित करते. 
  • हे प्राप्तिकर पुरावा दस्तऐवज आवश्यक असलेल्या असंख्य प्रसंगी वापरले जाऊ शकते.

२. व्हिसा प्रक्रिया 

  • जर तुम्हाला कोणत्याही हेतूने परदेश प्रवास करायचा असेल तर तुम्हाला व्हिसा घ्यावा लागतो आणि व्हिसा जारी करणार्‍या अधिका-यांनी व्हिसा देण्यासाठी मागील काही वर्षातील उत्पन्नाचा पुरावा विचारला असेल किंवा मागितला असेल तर अशा परिस्थितीत दाखल केलेला आयटीआर हा उत्पन्न दर्शविणारा सर्वात महत्वाचा पुरावा ग्राह्य समजला जातो.

३. कर्ज

  • जर आपण गृह कर्ज किंवा कार कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज इत्यादी कर्जासाठी अर्ज करण्याचा विचार केला असेल तर कर्ज देणारी बँक किंवा संस्था मागील ३ वर्षाचे आयटीआर फाईल मागवते आणि आपण आयटीआर  फाईल तयार केली असेल तरच बँक कर्जदाराला कर्ज मंजूर करते. 

४. क्रेडिट कार्ड 

  • घरखर्चासाठी क्रेडीट कार्डची आवश्यकता असेल तर क्रेडीट कार्ड प्रोसेसिंगसाठी आयटीआर हे अतिशय महत्वाचे कागदपत्र म्हणून मागितले जाते.

५. टीडीएस रिफंड  

  • तुमच्या बँकेत मुदत ठेवी असतील तर मिळालेल्या व्याजावर बँक टीडीएस कट करत असते ही रक्कम परत मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे.

६. टीसीएस रिफंड

  • तुमच्या नावावर रु. १० लाखापेक्षा जास्त किमतीची कार खरेदी केली असेल तर त्या कारच्या रकमेवर १% टी.सी.एस. कट केला जातो हि रक्कम परत मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे.

७. रहिवासी दाखला 

  • आयटीआर कागदपत्रे तुम्ही आधार कार्ड किंवा पासपोर्ट ऑफिसच्या कामासाठी रेसिडेंट प्रूफ म्हणून वापरु शकता.

आयकर लागू नसला तरीही नियमितपणे आयटीआर भरण्याचे हे काही मूर्त फायदे आहेत आणि सर्वात महत्वाचा अमूर्त फायदा म्हणजे आपल्याला मिळालेला आत्मविश्वास. म्हणून या वर्षापासून आपले आयटीआर दाखल करा आणि अर्थसाक्षर व्हा! अर्थसाक्षर.कॉमच्या माध्यमातून जी अर्थसाक्षरता मोहीम चालू केली आहे त्यामधून गृहिणीदेखील अर्थसाक्षर व्हाव्यात म्हणून गृहिणीनी आयटीआर का भरावे ? या लेखाच्या माध्यमातून मांडलेली सविस्तर माहिती गृहिणींसाठी नक्कीच महत्वाची ठरेल!

– आशिष भोजने 

करसल्लागार, पुणे

७०३८५७७५७७ 

[email protected]

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Housewife and ITR Marathi Mahiti, Housewife and ITR in Marathi, Housewives with no income should also file IT return information in Marathi, why  housewife  should  filed ITR ? Information in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.