Types of Credit Card
क्रेडिट कार्डचा वापर तर अनेकजण करत असतील पण आपल्यासाठी योग्य क्रेडिट कार्ड कोणतं हे ठरविण्यासाठी क्रेडिट कार्डचे प्रकार (Types of Credit Card) माहिती असणं आवश्यक आहे.
आजकाल जिथे जिथे पैसे रोख स्वरुपात वापरले जातात त्या जास्तीत जास्त ठिकाणी प्लॅस्टिक मनीचा पर्याय आहे. प्लॅस्टिक मनी मूळे पैसे देणे घेणे एका सोप्या आणि सुलभ स्वरुपात बदलले. हा एक उत्तम बदल आहे. प्लॅस्टिक मनी मधील एक म्हणजे क्रेडिट कार्ड. बँकिंग आणि वित्तीय संस्था आपल्याला आपल्या गरजेनुसार वेगवेगळे क्रेडिट कार्ड तसेच कर्ज उपलब्ध करून देतात. त्यापैकी आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे निवड करू शकतो. अर्थात त्यांची वैशिष्टे आणि सुविधा प्रत्येक बँकेपरत वेगवेगळी असू शकतात.
क्रेडिट कार्ड घेताना त्यासोबतच वार्षिक सदस्यता शुल्क, जॉइन फी, लेट फी, थकबाकी बिलावरील व्याज इ. सर्व गोष्टी येतात.
हे नक्की वाचा: भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची ६ कारणे
Types of Credit Card: क्रेडिट कार्डचे प्रकार
बिझनेस क्रेडिट कार्ड –
- हे कार्ड लघु, मध्यम, मोठे व्यवसाय करणार्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. यालाच कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड देखील म्हणतात.
- आपला व्यवसाय चालवताना पैशांची गरज भागवण्यासाठी ही एक वेगवान सुविधा आहे.
- या कार्ड द्वारे व्यवसायाशी निगडीत उत्तम सुविधा दिल्या जातात. जसे की जमाखर्चाची देखरेख, व्यवसाय बचत योजना, किफायतशीर प्रवास आणि निवास व्यवस्था आणि मनोरंजन.
सिल्व्हर क्रेडिट कार्ड –
- सिल्व्हर क्रेडिट कार्ड हे चार ते पाच वर्ष अनुभव असणार्या कोणत्याही सामान्य नोकरदार वर्गाला मिळू शकते.
- काही सामान्य वैशिष्टे पुढील प्रमाणे – कमी सदस्यता शुल्क, खात्यातील बाकी हस्तांतरित करताना व्याजदर हा पहिले सहा ते नऊ महिन्यांपर्यंत 0% असतो, जर कार्ड धारकाची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर कार्डची मर्यादा इतर क्रेडिट कार्ड प्रमाणेच राहते.
गोल्ड क्रेडिट कार्ड –
- गोल्ड क्रेडिट कार्ड हे उच्च उत्पन्न असणार्यांसाठी बनविले गेले आहे, ज्यांचे क्रेडिट रेटिंग देखील जास्त असते.
- गोल्ड कार्ड हे प्रतिष्ठित पणाचे लक्षण मानले जाते, एक स्टेटस सिम्बोल समजले जाते.
- गोल्ड कार्डची वैशिष्टे देखील त्याच्या नावाप्रमाणेच आहेत.
- रोख पैसे काढण्याची जास्त मर्यादा, जास्त क्रेडिट मर्यादा, एक ॲड-ऑन कार्ड जे की जोडीदारास अथवा मुलांना किंवा पालकांना देता येते, ट्रॅव्हल इन्शुरन्स, रिवॉर्ड पॉइंट्स, कॅश बॅक ऑफर्स इत्यादी अनेक सुविधा मिळतात.
प्लॅटिनम किंवा टायटॅनियम कार्ड –
- या कार्ड ची वैशिष्टे गोल्ड कार्ड प्रमाणेच आहेत. मात्र यात आणखी काही अतिरिक्त फायदे आहेत.
- काही सामान्य वैशिष्टे पुढील प्रमाणे – क्रेडिट कार्ड हरवणे अथवा चोरी होणे पासून संरक्षण, ऑनलाइन फसवणूक होण्यापासून संरक्षण, वार्षिक फी भरण्याची गरज नाही इ.
याशिवायही भारतात आपल्या गरजेप्रमाणे क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. जसे की ऑनलाइन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग क्रेडिट कार्ड. यामधील काही महत्वाचे प्रकार पाहू –
महत्वाचे लेख: क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?
1. कॅशबॅक क्रेडिट कार्ड –
- अधिक पैसे कमवायला सर्वांनाच आवडते. कॅश बॅक क्रेडिट कार्ड हे आपल्याला अशाच प्रकारची सुविधा देते.
- आपण या क्रेडिट कार्ड द्वारे जेव्हा खर्च करू तेव्हा त्यावरती कॅश बॅक रक्कम आणि रिवार्ड्स मिळतात. सिटीबँक कॅश बॅक क्रेडिट कार्ड, स्टँडर्ड चार्टर्ड मॅनहॅटन प्लॅटिनम क्रेडिट कार्ड ही काही सर्वोत्कृष्ट कॅश बॅक क्रेडिट कार्ड आहेत.
2. को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड –
- हे कार्ड काही ब्रॅण्ड्स, ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट किंवा ट्रॅव्हल अॅग्रीगेटरच्या सहकार्याने बँकेद्वारे ऑफर केल्या जातात.
- हे कार्ड खास करून एखाद्या विशिष्ट ब्रँडसाठी बनवले गेलेले असते.
- आपण जर एखादा विशिष्ट ब्रँडला प्राधान्य देत असाल तर त्या संबधित असे कार्ड आपण घेऊ शकता.
- ज्याने आपला फायदा होईल. उदाहरण – यात्रा एसबीआय क्रेडिट कार्ड, आयआरसीटीसी एसबीआय प्लॅटिनम क्रेडिट कार्ड इ.
3. महिलांसाठी क्रेडिट कार्ड –
- खरेदी म्हणले की महिला आघाडीवर असतात. अर्थात त्याला कारणही आहे. त्यांना घरासाठी, घरातल्या सर्वांसाठी, स्वतः साठी तसेच किराणा, भाज्या अशी आणि अनेक खरेदी करावीच लागते.
- या खास महिलांसाठी असणार्या क्रेडिट कार्डची वैशिष्टे म्हणजे त्यावर भरपूर कॅश बॅक, शॉपिंग व्हाऊचर्स आणि रिवार्ड्स असतात.
- हे कार्ड अधिभार माफी, विमा इ. अतिरिक्त लाभ देखील देते. उदाहरण – एचडीएफसी बँक सॉलिटेअर – प्रीमियम वुमेन्स क्रेडिट कार्ड
4. ऑनलाईन खरेदीसाठी क्रेडिट कार्ड –
- सद्य परिस्थिति मध्ये बाहेर पडण्यास तसेच प्रत्यक्ष खरेदी करण्यावर थोडेफार निर्बंध बसलेले आहेत. त्यामुळे आधी पासूनच छान चालू असलेला ई-कॉमर्स व्यवसाय आता अजून जोमाने पळतो आहे.
- ऑनलाइन खरेदी करण्यासाठी हे ऑनलाइन शॉपिंग क्रेडिट कार्ड उत्तम आहे.
- या कार्ड द्वारे आपल्याला सूट मिळते, रिवॉर्ड पॉईंट्स, ई-व्हाउचर्स मिळतात शिवाय ईएमआय वर खरेदीचा पर्याय निवडता येतो.
- यासाठी एसबीआय सिंपली क्लिक, अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड ई. उत्तम पर्याय आहेत.
5. क्लासिक क्रेडिट कार्ड –
- क्लासिक क्रेडिट कार्डचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जागतिक स्वीकृती (ग्लोबल ॲक्सेप्टन्स), कॅश ॲडव्हान्स, व्याज रहित क्रेडिट कालावधी, सप्लीमेंटरी कार्ड लाभ, कार्ड हरवल्यास त्यासाठी विमा आणि उत्तम ग्राहक सुविधा.
- उदाहरण – आयसीआयसीआय बँक ब्रिटिश एअरवेज क्लासिक क्रेडिट कार्ड, इंडियन बँक ग्लोबल क्लासिक क्रेडिट कार्ड
6. एंटरटेंमेंट क्रेडिट कार्ड –
- आपल्याला चित्रपट, नाटक ई. नेहमी पाहायला आवडत असेल तर हे कार्ड आपल्यासाठीच आहे.
- या कार्ड द्वारे आपल्याला मनोरंजनावर पैसे खर्च करताना उत्तम फायदे मिळतील. या कार्ड द्वारे आपल्याला रिवॉर्ड पॉईंट्स आणि जेवणावर सूट देखील मिळते.
- एचडीएफसी टायटॅनियम टाइम्स कार्ड आणि कोटक पीव्हीआर गोल्ड क्रेडिट कार्ड ही सर्वोत्कृष्ट एंटरटेनमेंट क्रेडिट कार्ड आहेत.
7. फ्यूएल क्रेडिट कार्ड –
- आपला जर पेट्रोल आणि डिझेल वर जास्त खर्च होत असेल तर हे कार्ड आपल्यासाठी योग्य आहे.
- फ्यूएल क्रेडिट कार्डचे फायदे म्हणजे इंधनावरील सूट, कॅशबॅक आणि अधिभार माफी.
- या कार्डच्या वापरामुळे आपल्याला इंधंनासाठी लागणार्या खर्चामध्ये उत्तम बचत होईल. उदाहरण – इंडियन ऑईल सिटी प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
विशेष लेख: क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता?
क्रेडिट कार्ड विषयीचे आपल्या मनातील सर्व किंतु आता दूर झाले असतील. तेव्हा आता क्रेडिट कार्डची निवड करणे आपल्याला सुकर जाईल, मात्र एक गोष्ट आपण लक्षात असू द्यावी की क्रेडिट कार्ड कोणतेही असले तरी थकबाकी ठेवणे योग्य नाही. त्यावर आपल्याला व्याज बसते आणि यामुळे आपल्या क्रेडिट स्कोअर वर सुद्धा परिणाम होतो. असेच आपल्या प्रियजनांना देखील उत्तम क्रेडिट कार्ड निवडता यावे यासाठी हा लेख शेअर करा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Types of Credit Card in Marathi, Types of Credit Card Marathi Mahiti, Types of Credit Card Marathi