PMJJBY
Reading Time: 2 minutes

PMJJBM

सामान्य माणसाच्या हितासाठी सरकारमार्फत अनेक योजना राबविण्यात येतात, यापैकीच एक महत्वपूर्ण योजना म्हणजे PMJJBM -पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना. 

विमा हा आर्थिक नियोजनामधला महत्वाचा घटक आहे. विम्याचे मुख्यत्वे करून दोन प्रकार असतात. एक म्हणजे जीवन विमा व दुसरी सर्वसाधारण विमा योजना. जीवनविमा तुमच्या पश्चात तुमच्या जिवलगांना आर्थिक संरक्षण देतो, तर सर्वसाधारण विमा योजना आकस्मिक संकटांमुळे होणाऱ्या नुकसानामध्ये मदतीचा हात देतो. दोन्ही प्रकारच्या विमा योजना आवश्यक असतात. सर्वसामान्य जनतेसाठी विशेष करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी माफक दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. यापैकी जीवनविम्यासाठी तयार केलेली योजना म्हणजे ‘जीवन ज्योती विमा योजना’. 

हे नक्की वाचा: PMSBY: गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी पंतप्रधान स्नेह बंधन योजना

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBM) 

  • या योजनेचा लाभ कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. ही योजना एक प्रकारची जीवनविमा योजना आहे. 
  • या योजनेअंतर्गत १८ ते ५० वयोगटातील कोणतीही व्यक्ती विमा सुविधा खरेदी करू शकते. 
  • या योजनेअंतर्गत रु. २ लाखांची विमा योजना प्रतिवर्ष केवळ ३३० रुपयांच्या हप्त्यामध्ये उपलब्ध असेल. या विमा योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
  • ही एक शुद्ध विमा योजना असून योजनेअंतर्गत केवळ मृत्यूपश्चात लाभ नामनिर्देशित व्यक्तीला मिळेल. 
  • या योजनेसाठी प्रतिवर्ष १ जून ते ३१ मे पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला असून ३१  मे २०२१ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBM)-पात्रता

  • वय वर्ष १८ ते  ५० पर्यंतचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 
  • यासाठी लाभार्थीचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. 
  • जर एखाद्या व्यक्तीची एकापेक्षा अधिक बँकांमध्ये बचत खाते असेल तर ती व्यक्ती केवळ एका बचत बँक खात्यातून ही योजना घेऊ शकते. 
  • जर बँकेमध्ये संयुक्त खाते असेल तर, संबंधित खात्याचे सर्व खातेधारक या योजनेत सामील होऊ शकतात व प्रति व्यक्ती प्रतिवर्षी रु. ३३०  प्रिमिअम भरावा लागेल. 
  • प्रीमियमची रक्कम संबंधित बँक खात्यातून ऑटो -डेबिट पद्धतीने जमा केली जाईल. 
  • १ जून १६ नंतर योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना ४५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच जोखीम संरक्षण दिले जाईल. तथापि या ४५ दिवसांच्या कालावधीत लाभार्थीचा अपघातामुळे मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला विम्याची रक्कम दिली  जाईल.
  • १ सप्टेंबर नंतर योजनेसाठी विनंती केल्यास २०१८ च्या सुधारित रचनेनुसार रु. २५८ प्रो-राटा पद्धतीने प्रीमियम लागू होईल.
  • आपला मोबाइल क्रमांक बँक खात्यामध्ये अद्ययावत (Update) असल्याची खात्री करा. बचत बँक खात्यात मोबाइल नंबर अद्ययावत नसल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

विशेष लेख: EDLI: आकस्मित मृत्यूपश्चात साथ देणारी ‘ईडीएलआय’ योजना

PMJJBM: योजनेचा लाभ कसा घ्याल? 

  • या योजनेचे व्यवस्थापन एलआयसी आणि इतर भारतीय खाजगी आयुर्विमा कंपन्यांमार्फत केले जाते. तुमचे बँक खाते असलेल्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. 
  • तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून नेटबँकिंग सुविधेद्वारा या योजनेसाठी अर्ज करू शकता. 
    • नेटबँकिंगद्वारा विमा घेताना सर्वप्रथम नेटबँकिंगमध्ये लॉग इन करा. 
    • विमा खरेदीसाठी योग्य त्या टॅबवर क्लिक करा 
    • योजेची रक्कम, प्रीमियम रक्कम आणि नामनिर्देशनाचे तपशील नमूद करा. 
    • ‘कन्फर्म’ वर क्लिक करा
    • भविष्यातील संदर्भासाठी पोचपावती (Acknowledgement) आणि संदर्भ क्रमांक (unique reference number) डाऊनलोड करा. 

जीवनविमा हा परिवाराला तुमच्यापश्चात आर्थिक संरक्षण देतो. कोणतीही व्यक्ती विम्यापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने माफक दारात विमा योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा लाभ घ्या. तुमच्या कुटुंबियांचे भविष्य  संरक्षित करा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Marathi Mahiti, Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi, Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Marathi Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana kaay ahe?, PMJJBM in Marathi, PMJJBM Marathi, PMJJBM Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesPhule Yojna –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची…

ESIC- सरकारची ‘इएसआयसी योजना’ तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesESIC- इएसआयसी  योजना  एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातली हुशार मुलगी कार्तिकी. शिष्यवृत्तीतून शिक्षण…

केवायसी म्हणजे काय? ती ऑनलाईन कशी करावी?

Reading Time: 2 minutesबँकेत खाते उघडायला गेले की केवायसी केलेली आहे का? हा प्रश्न पहिल्यांदा…