EDLI: आकस्मित मृत्यूपश्चात साथ देणारी ‘ईडीएलआय’ योजना

Reading Time: 3 minutes

ईडीएलआय योजना (EDLI) 

आजच्या लेखात आपण ईडीएलआय योजना (EDLI -Employees Deposit Linked Insurance Scheme) त्यासाठीची पात्रता, वैशिष्टे आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 

आज नवीनच जॉइन झालेल्या अनिकेतला  महितीपूर्ण आणि नवीन विषयावर बोलयला संगितले होते. मॅनेजमेंटची डिग्री घेतलेल्या हुशार अनिकेतने सर्वांना माहीत नसलेला वेगळा विषय उचलला. विषय तसा तर नवीन नव्हता, पण अगदी संपूर्ण माहिती अशी कोणालाही नव्हती. अतिशय आत्मविश्वासाने त्याने सुरुवात केली,

सध्याच्या काळात प्रत्येकाला आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता वाटत असते. आपल्याला आपल्या कंपांनीकडून पीएफ ची सुविधा मिळते हे तर सर्वांना माहिती आहे मात्र त्याच्या अंतर्गत येणार्‍या ईडीएलआय बद्दल फार कमी जणांना माहिती असणार.आता आपण याबद्दल पूर्ण माहिती घेवूया.

हे नक्की वाचा: नोकरी गेल्यानंतरही पैशाचे नियोजन कसे कराल?

EDLI: कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजना (Employees Deposit Linked Insurance Scheme) 

 • एम्प्लोयी प्रोविडेंट फंडच्या (EPF)  विमा धारकांना लाभ देण्यासाठी’ ईडीएलआय’ योजना सुरू करण्यात आली आहे.
 • याचे मुख्य उद्दीष्ट विमा धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी हा आहे. 
 • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूदी अधिनियम 1952 अंतर्गत नोंदणीकृत सर्व संस्थांना ईडीएलआय लागू आहे. 
 • अशा सर्व संस्थांमधील कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ही योजना ईपीएफ आणि ईपीएस यांच्यासह एकत्रितपणे कार्य करते. 
 • या योजनेअंतर्गत मिळणारे विमा संरक्षण हे विमा धारकाच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या पगारावर आधारित असते. 
 • सर्वात महत्वाचे म्हणजे ही योजना प्रत्येक कर्मचार्‍यासाठी अगदी विनामूल्य स्वरूपात उपलब्ध आहे.

EDLI: ईडीएलआय योजनेची वैशिष्ट्ये –

 • ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा एक भाग आहे आणि ज्यांचे ईपीएफ खाते हे अशा सर्व कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ घेता येतो. 
 • ईपीएफओचे सदस्य आपोआप ईडीएलआयसाठी नोंदवले जातात.
 • ईडीएलआय योजनेचा लाभ विमाधारक कर्मचार्‍याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वरासदारांना मिळतो. मृत्यू कधीही आणि कोठेही झाला तरी तो यात ग्राह्य धरला जातो.
 • कर्मचार्‍यांना ईडीएलआयमध्ये वेगळे योगदान देण्याची गरज नाही. त्यांना योगदान केवळ  ईपीएफसाठी द्यावे लागते.
 • जोपर्यंत व्यक्ती ईपीएफचा सक्रिय सदस्य असेल तोपर्यंत ईडीएलआय योजनेत त्याचा सहभाग असतो. ईपीएफ नोंदणीकृत कंपनीतून निवृत्त झाल्यावर अथव नोकरी सोडल्यानंतर सदस्याचे कुटुंब / वारस / नामनिर्देशित त्यावर दावा सांगू शकत नाहीत.
 • ईएलडीआय अंतर्गत क्लेमची रक्कम मागील 12 महिन्यांतील सरासरी मासिक पगाराच्या 35 पट ते जास्तीत जास्त रु. 7 लाख (रु. 4.5 लाख मूलभूत + 1.5 रु. लाख बोनस) पर्यन्त आहे. 
 • ईडीएलआय लाभ घेण्यासाठी किमान सेवा कालावधी नाही. सरासरी मासिक पगाराची गणना कर्मचार्‍याच्या बेसिक + महागाई भत्ता मिळून केली जाते

विशेष लेख: सॅलरी स्लिप कशी समजून घ्यावी?

ईडीएलआय योजनेसाठी लागणारे योगदान(EDLI contribution) –

 • कर्मचार्‍यांना ईडीएलआयसाठी कोणतेही वेगळे योगदान द्यावे लागत नाही. पीएफ साठी जे आपण योगदान देतो (12%) त्याशिवाय कर्मचार्‍याला काहीही द्यावे लागत नाही.
 • कंपनीला  पीएफ साठी 3.67%, ईपीएस साठी 8.33% किंवा 1250 रुपये आणि ईडीएलआय साठी 0.5% किंवा 75 रुपये इतके योगदान द्यावे लागते.

ईडीएलआय योजनेसाठी पात्रता निकष –

 • ज्या कर्मच्रर्‍यांना सरासरी रुपये 15000 पर्यन्त मासिक पगार असतो असे सर्व या योजनेसाठी पात्र असतात. जर सरासरी पगार ही रुपये 15000 पेक्षा जास्त होत असेल तर जास्तीत जास्त रुपये 6 लाखांपर्यंत लाभ मिळेल.  
 • या योजनेचा लाभ ईपीएफ योजनेंतर्गत विमाधारकाच्या वारसदार म्हणून उल्लेख केला गेलेल्या व्यक्तीस, वारसदाराचा उल्लेख केलेला नसल्यास कुटुंबातील सर्व सदस्य आणि जर कुटुंबातील सदस्य नसतील तर जे कोणी कायदेशीर वारस आहेत त्यांना मिळतो. तसेच वारसदार जर अल्पवयीन असेल, तर त्याच्या पालकाला अल्पवयीन वारसदाराच्या वतीने मिळतो. 

EDLI : आवश्यक कागदपत्रे –

ईडीएलआय योजने अंतर्गत वारसदारस रक्कम मिळविण्यासाठी फॉर्म 5 भरावा लागतो आणि त्या फॉर्म सोबत पुढील कागदपत्रे सादर करावी लागतात.-

 • विमा धारकाचे मृत्यूचे प्रमाणपत्र
 • कायदेशीर वारसदार असल्यास वारसा प्रमाणपत्र
 • वारसदार अल्पवयीन असल्यास पालकत्व प्रमाणपत्र
 • बँक खात्याच्या रद्द केलेल्या चेकची प्रत .

महत्वाचा लेख: माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१: जाणून घ्या नवीन नियम व अटी

ईडीएलआय कसा आणि किती मिळतो –

 • एखाद्या मृत सदस्याच्या वारसांना मिळणारी विमा रक्कम शेवटच्या 12 महिन्यांच्या रोजगाराच्या सरासरी मासिक पगाराच्या 30 पट मोजली जाते. 
 • उदा. समजा एखाद्या सदस्याची महिन्याचा सरासरी पगार रु. 15000 आहे. त्याच्या 30 पट म्हणजेच 15000*30 = रु. 450000 इतकी असेल. याशिवाय दावेदारास रु. 2,50,000 पर्यंत बोनस रक्कम दिली जाते. म्हणजेच दावेदारस एकूण रुपये रु. 7 लाख रक्कम मिळेल.

मित्रांनो आता आपणा सर्वांना ईडीएलआय योजना समजली असणार! अनिकेतने हॉल मध्ये नजर फिरवली. सर्वांचे सकारात्मक चेहरे पाहून त्याला आपले प्रेझेंटेशन यशस्वी झाल्याची  खात्री पटली.

आपल्यापैकी बहुतेक जणांना ईडीएलआय बद्दल माहिती या लेखातून मिळाली असणार. ही इतकी महत्वाची माहिती असून आपण यापासून दूर राहिलो जातो. तेव्हा ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर कराल ही खात्री आहे.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: EDLI Marathi Mahiti, EDLI in Marathi, EDLI mhanaje kay?, EDLI Marathi

One thought on “EDLI: आकस्मित मृत्यूपश्चात साथ देणारी ‘ईडीएलआय’ योजना

 1. Respected Sir,
  Just my son Dhananjay death in this month. He was member of epfo last three years.
  please brief EDLI scheme 1976

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!