Reversal Chart Patterns
आज आपण शेअर बाजारात ट्रेडिंग व गुंतवणूक करताना ट्रेडिंगच्या धोरणानुसार वापरात येणाऱ्या काही महत्वाच्या रिव्हर्सल चार्ट पॅटर्न्सबद्दल (Reversal Chart Patterns) माहिती घेऊया.
यापूर्वी आपण चार्ट म्हणजे काय? शेअर बाजारात उपयुक्त असलेले चार्टचे अनेक प्रकार पाहिले. आज आपण पाहूयात चार्टमध्ये तयार होणारे आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न. हे पॅटर्न दोन प्रकारे दिसतात, एक रिव्हर्सल चार्ट पॅटर्न व दुसरे कॅन्टीनुशन चार्ट पॅटर्न. ज्या वेळी एखाद्या शेअर मध्ये तेजी किंवा मंदीचा ट्रेंड पूर्ण झाल्यावर, रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला तर त्यात आपणस किंमत रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात अपट्रेंड मध्ये जर बेरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला तर शेअरची किंमत खाली येते आणि जर मंदीच्या ट्रेंड मध्ये बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला, तर शेअर मध्ये तेजीचे संकेत मिळतात. चार्टमध्ये आपणस अनेक रिव्हर्सल पॅटर्न दिसून येतात. डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, रायजिंग वेज, फेलिंग वेज, राऊंडिंग बॉटम, इ.
डबल टॉप पॅटर्न (Double top Pattern)
- डबल टॉप हा पॅटर्न बेरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न असून, याचा आकार इंग्रजी शब्द m सारखा दिसतो. जेव्हा हा आकार बनतो तेव्हा,शेअर मधील तेजीचा ट्रेंड संपून मंदीची सुरुवात होते, ह्या पॅटर्नच्या दोन टॉप मध्ये 7 ते 10 कॅन्डलचे अंतर असावे. हा सर्व टाईम फ्रेम मध्ये आपणस दिसून येतो.
- खालील चार्ट मध्ये पाहिलं तर आपणास दिसते की, शेअरची किमंत दीर्घ अप ट्रेंड नंतर एका विशिष्ट लेव्हल पासून, खाली येते व पहिला टॉप तयार होतो नंतर ती किंमत खाली आल्यावर काही अंतरावरून पुन्हा वर जाते.
- शेअरची किमंत पुन्हा वाढून रिसिस्टंट लाईन पर्यत येते, पण त्या वेळी किमंत ती लाईन पार करत नाही व तेथून पुन्हा खाली येते. पुढे शेअर मध्ये तेजी येऊन ती किंमत रेसिस्टंट लाईन पर्यंत येते. पण पुन्हा मंदी येऊन ती किमंत रेसिस्टन्ट लाईन पासून खाली येते तेव्हा दुसरा टॉप तयार होतो.
- या दोन्ही टॉप म्हणजेच् डबल टॉप पॅटर्न होय. ह्या पॅटर्न मध्यें आपण नेकलाईन नंतर जेव्हा कॅण्डल खाली सपोर्ट घेते, तेव्हा आपण शॉर्ट सेल करू शकतो व आपल्या जोखीम क्षमतेनुसार टार्गेट व स्टोप लॉस ठेऊन ट्रेड केला तर आपणास खूप फायदा होऊ शकतो.
डबल बॉटम पॅटर्न (Double bottom Pattern)
- डबल बॉटम हा मंदीच्या ट्रेंड नंतर येणारा बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे.
- हा शेअर मधील मंदी संपून तेजीची सुरुवात करतो, हा जेव्हा तयार होतो. तेव्हा त्याचा आकार इंग्रजी शब्द W सारखा दिसतो.
- खालील चार्ट मध्ये आपणास दिसते की शेअर मध्ये ठराविक कालावधीतील मंदी नंतर शेअरची किमंत एक लेव्हल पासून वाढायला लागते. ती लेव्हल म्हणजे त्याचा पहिला बॉटम.
- पुढे ती किमंत थोडी वाढून काही कालावधीत पुन्हा खाली येते व मागच्या लेव्हल जवळ येऊन तेथून परत अप ट्रेंड ने वाढायला लागते आणि तेथे तयार होतो दुसरा बॉटम.
- हा तयार झाला की आपण नेक लाईनच्या वर खरेदी करून आपल्या रिस्क नुसार टार्गेट व स्टोप लॉस लावून ट्रेड करू शकतो.
हेड अँड शोल्डर पॅटर्न (Head and shoulder Pattern)
- हा बेरीश रेव्हर्सल चार्ट पॅटर्न असून शेअर मंदीमध्ये जाणार असल्याचे दर्शिवतो. याचा आकार माणसाचे डोके व दोन्ही खांदेखाली असा दिसतो.
- शेअरमध्ये येणाऱ्या प्रचंड तेजीनंतर वर जाऊन हा एक रेसिस्टंट बनवतो व तेथून खाली येऊन एक सपोर्ट बनवतो. त्याला डावा शोल्डर म्हटले जाते.
- किमंत तेथून आपट्रॅन्डने जाऊन पहिल्या शोल्डरच्या वर एक रेसिस्टन्ट बनवतो पुन्हा तेथून किमंत खाली येऊन मागील सपोर्टच्या लेव्हल वर थांबतो.
- तो थोडा वर खाली असू शकतो, पण पुन्हा त्या सपोर्ट पासून वर जाऊन, मागील लेफ्ट शोल्डरच्या किमंती इतका दुसरा राईट शोल्डर बनतो.
- हे दोन्ही शोल्डर ज्या ठिकाणी सपोर्ट घेतात त्यास नेकलाईन म्हणतात. यात हेड हा दोन्ही शोल्डरच्या वर आसावा.
- जेव्हा राईट शोल्डर नेक लाईनचा सपोर्ट तोडून खाली जातो तेव्हा शेअर मध्ये मंदी येते. तेव्हा शेअरमध्ये शॉर्ट सेल करून आपल्या जोखीम क्षमतेनुसार टार्गेट व स्टोप लॉस लावून ट्रेडिंग केल्यास खूप फायदा होऊ शकतो .
चार्ट पॅटर्न हे शेअरच्या भूतकालीन किंमतीच्या आधारावरून ठरविले जातात. याची प्रत्येक वेळी पुनरवृत्ती होईलच असे नाही, पण आज शेअर बाजारात हुशार चतूर ट्रेडर तांत्रिक इंडिकेटर व चार्ट पॅटर्न वापरून खूप नफा मिळवत आहेत. त्यामुळे आपण अभ्यास करून आपल्या रिस्क रिवार्ड रेशो नुसार खरेदी – विक्री केली तर आपणास नक्कीच अपेक्षित यश मिळेल.
शरद गोडांबे
9657980309
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Reversal Chart Patterns in Marathi, Reversal Chart Patterns Marathi Mahiti, Reversal Chart Patterns Marathi