Money Transfer alert
https://bit.ly/2Qr8F1w
Reading Time: 2 minutes

Money Transfer alert:

आजच्या लेखाचा “Money Transfer alert” हा विषय कोणत्याही फ्रॉडशी संबंधित नसून आपल्या नजरचुकीने अथवा निष्काळजीपणामुळे जर चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले तर काय? या विषयाशी संबंधित आहे. सन २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अगदी  भाजीपाल्यापासून ते महागड्या गॅजेट्स पर्यत सर्व वस्तूंची खरेदी करताना डिजिटल पेमेंट केले जाते. पण म्हणतात ना  “अतिघाई संकटात नेई”, तसंच काहीसं पेमेंट करताना होऊ शकतं. गुगल पे मुळे तर मोबाईल नंबर असला की सहज पैसे ट्रान्सफर करता येतात. पण, बँकेचे व्यवहार करताना विशेषतः कोणाच्या खात्यात पैसे भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. 

ऑनलाईन व्यवहार करताना चुकीचा खाते क्रमांक अथवा मोबाईल नंबर टाईप केला जाऊ शकतो. यामुळे भलत्याच माणसाच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होऊ शकतात. चुकून का होईना पण चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास पाठवणाऱ्या व्यक्तीलाच नुकसान सहन करावे लागते. जर रक्कम जास्त असेल, तर त्याच्यासाठी ते संकटापेक्षा कमी नसतं. अशावेळी  वाटतं की आपले  पैसे  आपण कायमस्वरूपी गमावले. त्यातही वैयक्तिक व्यवहार असेल तर ठीक आहे, परंतु कंपनीत किंवा कार्यालयात नोकरी करत असताना कंपनीचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले तर त्याच्यासाठी ते मोठं संकट असू शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक समस्येवर उपाय असतातच. रिझर्व्ह बँकेने याबद्दल काही तरतुदी केल्या आहेत.

Money Transfer alert: चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाल्यास काय कराल?

१. बँकेला संपर्क करणे –

  • समजा कोणाकडून चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले गेले असतील तर सर्वप्रथम संबंधित बँकेला फोन करून आणि ई-मेल करून कळवावे. ई-मेल यासाठी की यामुळे पुरावा जवळ राहील.

२. बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधणे –

  • अशा प्रकरणात  संबंधित व्यक्तीने बँकेच्या व्यवस्थापकास ताबडतोब भेटून झालेला प्रकार सांगावा कारण बँक मॅनेजर पैसे परत मिळवायला मदत करू शकेल.
  • चुकीच्या खात्यात भरणाझालेल्या पैशांची, संबंधित व्यवहाराच्या तपशीलाची माहिती (Transaction details) तारीख आणि वेळेसकट बँकेला द्यावी.

३. पुरावा सादर करणे –

  • ऑनलाईन व्यवहार करत असताना  त्याचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवावा.
  • याशिवाय ज्याच्या खात्यात चुकीने पैसे भरले आहेत, त्या खात्याच्या बँकेमध्येही लिखित स्वरूपात तक्रार नोंदवावी. तक्रार करताना बँकेला विनंती करावी की चुकून पाठवलेले पैसे स्वतःच्या खात्यात परत मिळावेत.
  • बँक आपल्या स्तरावर पुढील चौकशी आणि प्रक्रिया करेल. चुकून ज्या खात्यात पैसे गेले त्याच्या मालकाला बँक पैसे परत पाठवण्यासाठी सूचना करेल.

४. कोर्टाची पायरी –

  • चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे गेल्यास प्रथम वरील कृती करावी. ज्याच्या खात्यात  पैसे गेले आहेत त्या खाताधारकाला बँकेने सूचना करून देखील ती व्यक्ती पैसे परत करण्यास मनाई करत असेल तर पोलिसात तक्रार करावी.
  • बँकसुद्धा तक्रारकर्त्याच्या तक्रारी आधारावर पोलिसात  अथवा कोर्टात तक्रार करू शकते. 
  • रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार पीडिताला त्याचे पैसे परत मिळवून देणे ही पीडिताच्या बँकेचीही जबाबदारी आहे. 

५. काळजी घेणे आवश्यक –

  • कधीही ऑनलाईन व्यवहार करताना, पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. ‘ट्रान्स्फर’च्या पर्यायावर क्लिक करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासून घ्यावी.
  • मोबाईल क्रमांक, खाते क्रमांक, नाव, आयएफएसी क्रमांक , बँकेचं नाव, शाखा, इत्यादी माहिती  नीट भरावी.
  • याशिवाय मोठी रक्कम दुसऱ्याच्या खात्यात भरण्याआधी प्रथम थोडे रुपये संबंधित खात्यात भरावेत व त्या व्यक्तीचा मोबाईल/खाते क्रमांक व संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
  • उदाहरणार्थ प्रथम ५० रुपये भरावेत. ते पैसे संबंधित व्यक्तीच्या खात्यात पोहचले असल्याची खात्री करावी. ती खात्री झाल्यावरच बाकी मोठी रक्कम खात्यात भरावी.
  • कुठल्याही बँकेचे ऑनलाईन व्यवहार करताना मग ते नेटबँकिंग (Net banking), मोबाईल बँकिंग (Mobile Banking), आयएमपीएस (IMPS) किंवा इतर कुठलाही पर्याय असो  “प्रिवेंशन इज बेटर दँन क्युअर” हे नेहमी लक्षात ठेवावे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Remedies for Money Transfer to wrong account in Marathi, Remedies for bank Transfer to wrong account Marathi Mahiti

Share this article on :
2 comments
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.