Term Insurance
भविष्यातील अनिश्चिततेचा विचार करता टर्म इन्शुरन्सचे महत्व लक्षात आले आहे. बचत व गुंतवणूक याचबरोबर विमा संरक्षणास प्राधान्य देणे देखील तितकेच महत्वाचे आहे. अनपेक्षित घटना काही सांगून घडत नाहीत म्हणूनच आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित घटनेमध्ये आर्थिक बॅकअप असणे महत्वाचे आहे. व याच मुळे आपल्या आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मुदत विमा खरेदी करणे हा अत्यंत फायदेशीर निर्णय ठरतो. विमा कंपनी पॉलिसी कालावधीत पॉलिसी धारकाच्या अकाली दुर्देवी मृत्यूनंतर भरलेल्या ठराविक प्रीमियम च्या बदल्यात पॉलिसीच्या नॉमिनीला डेथ बेनिफिट म्हणजेच पूर्वनिर्धारित विम्याची रक्कम प्रदान करते. जेणेकरून पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर देखील कुटुंबास आर्थिक समस्यांचा सामना करणे कठीण जात नाही.
हेही वाचा – Term Insurance : टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी ‘ही’ घ्या काळजी
टर्म इन्शुरन्स खरेदी का करावा याची ६ कारणे खालील प्रमाणे:
१)आर्थिक संरक्षण – कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अनपेक्षित दुर्देवी मृत्यू झाल्यास परिवारास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मुदत विमा योजना पॉलिसी कालावधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम पॉलिसी धारकाच्या कुटुंबास मिळते. दिवसेंदिवस वाढणारी महागाई तसेच वाढणारा जीवनावश्यक खर्च या सर्व गोष्टींचा विचार करता पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी व कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी मुदत विमा योजना खरेदी करणे उपयुक्त आहे.
२)परवडणारा प्रीमियम – मुदत विमा योजनेमध्ये विमा कंपनी पॉलिसीधारकाने भरलेल्या प्रीमियमच्या बदल्यात जीवन विमा संरक्षण प्रदान करते. मुदत विमा योजनेमध्ये कमीत-कमी प्रीमियम भरून जास्तीत-जास्त विमा संरक्षण मिळते तसेच मुदत विमा योजनेचे प्रीमियम इतर विमा योजनांपेक्षा कमी असल्याने मुदत विमा योजना ही इतर अनेक विमा योजनांपैकी परवडणारी आहे. पॉलिसी धारका त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार विचार करून प्रीमियमच्या रक्कमेची निवड करू शकतात.
३)कर लाभ – मुदत विमा योजना ही विशिष्ट कालावधीसाठी जीवन विमा संरक्षण प्रदान करते. याचा आणखीन एक फायदा म्हणजे मुदत विमा योजनेच्या भरलेल्या प्रीमियम वर कर लाभ देखील घेता येतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत भरलेल्या प्रीमियम वर १.५ लाख रु. पर्यंत कर कपातीचा दावा करता येतो. याच बरोबर कलम १०डी(१०डी) अंतर्गत पॉलिसी धारकाच्या मृत्यू नंतर नॉमिनीला मिळणाऱ्या विम्याच्या रक्कमेवर देखील कर लाभ मिळतो.
हेही वाचा – Term Vs. Personal Accident Insurance : मुदत विमा व वैयक्तिक अपघात विमा यांमधील फरक काय?
४)वयानुसार कमी प्रीमियम – मुदत विमा योजनेचा प्रीमियम हा आरोग्य, पॉलिसी धारकाचे वय व मुदत विमा योजनेचा कालावधी यावर अवलंबून असतो. मुदत विमा योजना खरेदी करताना पॉलिसी धारकाचे वय जितके कमी असेल तितका कमी प्रीमियम असतो. यामुळे मुदत विमा योजना घेण्यासाठी जेवढा विलंब कराल तेवढाच जास्त प्रीमियम भरावा लागतो. म्हणून कमी वयातच मुदत विमा योजना खरेदी करून कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे फायदेशीर आहे.
५)अतिरिक्त रायडर्स – मुदत विमा योजनेमध्ये अतिरिक्त रायडर्स चे फायदे देखील उपलब्ध असतात. मुदत विमा योजना खरेदी करताना पॉलिसी धारकास नाममात्र शुल्क देऊन गरजेनुसार अतिरिक्त रायडर्स ची निवड करता येते.
मुदत विमा योजनेमध्ये अपंगत्व, गंभीर आजार, प्रीमियम सूट व अपघाती मृत्यू बेनिफिट इत्यादी लोकप्रिय रायडर्स उपलब्ध आहेत. पॉलिसी धारकाने मुदत विमा योजना खरेदी करताना आपल्या आवश्यकतेनुसार रायडर्सची निवड करावी.
६)ऑनलाइन पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय – मुदत विमा योजना या ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करता येतात.ऑफलाइन पद्धतीने म्हणजे एजंट कडून देखील मुदत विमा योजना खरेदी करू शकता तसेच ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही एजंट शिवाय मुदत विमा योजना खरेदी करता येते. कोणताही पर्याय निवडताना व्यवस्थित माहिती घेऊन मुदत विमा योजना खरेदी करावी.
मुदत विमा योजना जेवढ्या लवकर खरेदी करता येईल तेवढे फायदेशीर असते. उत्पन्न स्थिर असताना मुदत विमा योजना खरेदी करावी कारण रिटायरमेंट नंतर नियमित स्थिर उत्पन्न नसते व यामुळे प्रीमियम भरणे कठीण जाऊ शकते म्हणून कमी वयात मुदत विमा घेण्याचा सल्ला दिला जातो.
हेही वाचा – Term Insurance Plan : मुदत विमा योजना निवडताना ‘या’ गोष्टी घ्या विचारात
वरील मुदत विमा योजनेचे फायदे बघता जेवढ्या लवकर मुदत विमा योजना खरेदी करता येईल तेवढे उत्तम आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies