LIC-IPO
- ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी आपल्याकडे म्हण आहे त्या जोडीला शेअर मार्केट मध्ये ‘कंपनी तितके IPO’ असे म्हटले तर वावगे होणार नाही. हे शेअर मार्केट आणि IPO म्हणजे नक्की काय ते थोडक्यात पाहू. शेअर म्हणजे एखाद्या कंपनीच्या मालकीचा हिस्सा आणि शेअर मार्केट म्हणजे जिथे शेअरची खरेदी – विकी होते ते मार्केट.
- एखाद्या कंपनीला जेव्हा व्यवसाय सुरु करायचा असतो किंवा सुरु असलेल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असतो तेव्हा भांडवल हवे असते. हे भांडवल त्यांना मित्र, नातेवाईक,बँकांकडून कर्ज इत्यादी स्वरूपात मिळू शकते ज्याची परतफेड कंपनीला नफा होवो किंवा तोटा व्याजासहित कधीना कधी करावीच लागते.
- याउलट भांडवल उभे करण्यासाठी कंपनीने जर शेअर मार्केटमध्ये आपले शेअर विक्रीस काढले तर त्या विक्रीतून जे पैसे उभे केले जातात ते परत करावे लागत नाहीत. त्यामुळे व्याज भरण्याचा प्रश्नही उरत नाही. अशा कंपनीचे शेअर्स विकत घेऊन लोकांना काय फायदा होतो, तर कंपनी आज ज्या भावात ते शेअर्स त्यांना विकत असते त्या शेअर्सचा भाव ती कंपनी नफ्यात आल्यानंतर वाढण्याची शक्यता असते. त्यावेळी लोक आपल्याकडील शेअर्स विकून नफा कमवू शकतात.
- अशा रीतीने जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स प्रथमच विक्रीसाठी भांडवल बाजारात आणले जातात तेव्हा त्याला Initial public offerings म्हणजेच आयपीओ (IPO) असे म्हटले जाते.
- LIC चा IPO आजपासून 3 दिवस खुला झाला आहे , त्याबाबतीत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
हेही वाचा – Five upcoming IPO : ‘या’ पाच लक्षवेधी आयपीओ मध्ये करा गुंतवणूक
LIC आयपीओबाबत सरकारचे धोरण
- लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही भारतातील एकमेव सरकारी मालकीची विमा कंपनी आहे. ‘एलआयसी’ हा जीवन विम्याचा समानार्थी शब्द म्हणावा इतकी ही विमा कंपनी जनमानसांत लोकप्रिय आणि विश्वासू आहे.
- LIC चे कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल या उद्देश्याने भारत सरकारने 2022 मध्ये LIC IPO लाँच करून LIC मधील आपली होल्डिंग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- LIC चा IPO चालू आर्थिक वर्षासाठी खूप महत्त्वाचा मानला जाईल, याचे मुख्य कारण 75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठणे हे आहे. एका माहितीनुसार, आतापर्यंत अनेक PSUs च्या निर्गुंतवणुकीतून केवळ 9,330 कोटी रुपये सरकारकडे जमा झाले आहेत.
आयपीओची तारीख
सध्या सर्वत्र चर्चेत व प्रतिक्षेत असलेला भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच ‘LIC’ चा IPO गुंतवणूकदारांन करिता सबस्क्रीप्शन साठी ४मे २०२२ ते ९मे २०२२ या कालावधी मध्ये उपलब्ध होणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी अगोदरच २मे २०२२ ला उपलब्ध झाला आहे.
भारत सरकारने प्रति इक्विटी शेअर ₹902 ते ₹949 प्राइस बँड निश्चित केला आहे.
याच बरोबर LIC पॉलिसी धारकांसाठी ₹६० व LIC कर्मचाऱ्यांकरिता ₹४५ सवलत देण्यात आली आहे.
भारत सरकार LIC मधील ३.५% शेअर्सची विक्री करणार आहे.या विक्री द्वारे २१,००० कोटींहून अधिक निधी उभारण्याची सरकारची अपेक्षा आहे.
विक्रीसाठी ऑफर
- LIC बोर्डाने लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कायद्याच्या कलम 5(9)(c) नुसार 316,249,885 इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरला मंजुरी दिली आहे. एलआयसीने शेअर्ससाठी प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य निश्चित केले आहे.
- बुक-रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर विमा मंडळ प्राइस बँडची घोषणा करेल. त्यानुसार पात्र कर्मचारी आणि पॉलिसीधारकांना सवलतही जाहीर केली जाईल.
अलॉटमेंट
- DRHP नुसार, कर्मचार्यांचा आरक्षणाचा भाग ऑफरनंतरच्या इक्विटी शेअर भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त नसेल. पॉलिसीधारक आरक्षणाचा भाग ऑफर आकाराच्या 10% पेक्षा जास्त नसेल.
- कर्मचारी आणि पॉलिसीधारक दोघांनीही हे लक्षात घ्यायला हवं की कर्मचारी आरक्षण भागातील प्रत्येक पात्र कर्मचार्याची आणि पॉलिसीधारक आरक्षण भागातील प्रत्येक पात्र पॉलिसीधारकाची कमाल बोली रक्कम रु. 2 लाखांपेक्षा जास्त नसेल.
- दरम्यान, नेट ऑफरच्या 50% पेक्षा जास्त qualified institutional buyers (QIBs) खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध असणार नाही. तथापि, QIB भागापैकी (अँकर गुंतवणूकदार भाग वगळून) 5% भाग केवळ म्युच्युअल फंडांच्या वाटपासाठी उपलब्ध असेल.
हेही वाचा – Insurance policy : ‘या’ आहेत सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी
मार्केट शेअर
- प्रीमियमच्या बाबतीत 1% मार्केट शेअर, नवीन बिझनेस प्रीमियमच्या बाबतीत 66.2% मार्केट शेअर, जारी केलेल्या वैयक्तिक पॉलिसींच्या संख्येच्या बाबतीत 74.6% मार्केट शेअर, गृप पॉलिसींच्या संख्येच्या बाबतीत 81.1% मार्केट शेअरसह LIC ही सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी आहे.
- भारतीय आयुर्विमा उद्योगाचा आकार FY21 मध्ये एकूण प्रीमियमच्या आधारावर रु. 6.2 लाख कोटी होता, जो FY20 मध्ये रु. 5.7 लाख कोटी होता. FY21 ला संपलेल्या पाच वर्षांत उद्योगाचा एकूण प्रीमियम 11% CAGR ने वाढला आहे. CRISIL रिसर्चने पुढील पाच वर्षांत उद्योगाचा एकूण प्रीमियम 14-15% CAGR दराने वाढून FY26 पर्यंत 4 लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे.
संभाव्य जोखीम
- DRHP च्या यादीप्रमाणे, सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीचा LIC च्या व्यवसायाच्या सर्व पैलूंवर विपरीत परिणाम होऊ शकतो, ज्यात LIC एजंट्सची कंपनीची उत्पादने विकण्याची क्षमता मर्यादित होणे समाविष्ट आहे.
- महामारीच्या काळात मृत्यूनंतर एलआयसी विम्याचे दावेही(claims) वाढले आहेत. FY19, FY20, FY21 आणि 30 सप्टेंबर 2021 पर्यंतचे, LIC चे देय लाभांमधील मृत्यूचे दावे अनुक्रमे रु. 17,129 कोटी, रु. 17,528 कोटी, रु. 23,927 कोटी आणि रु. 21,734 कोटी होते, जे एकूण विमा दाव्यांच्या अनुक्रमे 79%, 6.79%, ८.29% आणि 14.47% होते.
- सध्या तत्काळ गरज नसली तरीही एलआयसीला भविष्यात त्याच्या उपकंपनी IDBI बँकेत अतिरिक्त निधी भरावा लागेल असा उल्लेख आहे.
- LIC ला लोकप्रिय बनवणारी सार्वभौम हमी कायम राहील याची भारत सरकार खात्री देईल. तथापि, सरकार लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कायदा, 1956 मध्ये देखील बदल करत असल्याने, पॉलिसीधारकांवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.
- सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय एलआयसी व्यवस्थापनाकडून गुंतवणुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात की नाही याबद्दल असंख्य अनिश्चितता आहेत. नवीन टेक्नॉलॉजी कंपन्यांकडून स्पर्धा वाढल्याने बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या तरुण ग्राहकांसाठी LIC आपला बाजारातील हिस्सा टिकवून ठेवण्यास सक्षम असेल की नाही हे देखील अस्पष्ट आहे.
LIC IPO साठी अर्ज करण्यापूर्वी LIC पॉलिसीधारकांकडे काय असणं आवश्यक आहे?
- एलआयसी आयपीओसाठी पात्र होण्यासाठी पॉलिसीधारकांना त्यांचे पॅन कार्ड त्यांच्या एलआयसी पॉलिसीशी लिंक करावे लागेल.
- एलआयसी वेबसाइटवर किंवा एलआयसी एजंटांशी संपर्क करून ते त्यांचे पॅन एलआयसी पॉलिसीशी लिंक करू शकतात.
- त्याशिवाय, IPO मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येकाचे DEMAT खाते आणि पुरेसा निधी असलेल्या बँक खात्याशी एक सक्रिय UPI आयडी जोडलेला असावा.
LIC IPO करीता अर्ज करण्यासाठी
- आयपीओसाठी अर्ज करताना डीमॅट खाते केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे.
- सर्वप्रथम तुमच्या नेट बँकिंग खात्यामध्ये लॉग इन करा.
- लॉग इन केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट सेक्शन मधील ‘IPO/e-IPO’ पर्यायाची निवड करा.
- व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता बँक खाते डिटेल्स व इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
- व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘Invest In IPO’ पर्यायाची निवड करा.
- त्यानंतर अर्ज करण्याकरिता ‘LIC’ निवडून बीड प्राईस व शेअर्सची संख्या प्रविष्ट करा व सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर UPI किंवा दुसरा कोणताही ऑनलाइन पेमेंट पर्याय निवधून पेमेंट करा.
- IPO साठी अर्ज भरताना दिलेले नियम व अटी काळजीपूर्वक वाचावे.
हेही वाचा – LIC IPO : गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार करा
तुम्ही काय कराल?
लिस्टिंग तारखेच्या दिवशी फायदा होण्याच्या दृष्टीने एलआयसी आयपीओला अर्ज करा. लिस्टिंग नंतर एलआयसीचे शेअर्स मार्केट मध्ये उपलब्ध असणार आहेतच त्यामुळे कुठलीही घाई गडबड न करता निर्णय घ्या !
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies