Loss of Capital gains
भांडवली मालमत्तेचे हस्तांतरण केल्याने भांडवली नफा किंवा तोटा होतो. याचे दोन प्रकार आहेत अल्पमुदतीचा भांडवली नफा / तोटा आणि दीर्घ मुदतीचा भांडवली नफा / तोटा. वेगवेगळ्या मालमत्तांच्या हस्तांतरणानंतर केल्यानंतर मिळणारा निव्वळ नफ्यावर वेगवेगळ्या दराने कर आकारणी केली जाते. अशी मालमत्ता कोण, कशासाठी आणि किती कालावधीसाठी धारण करीत आहे त्यावर वेगवेगळ्या दराने कर आकारणी केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या दृष्टीने ज्या भांडवली मालमत्ता आहेत अशा अनेक गोष्टी कायद्याच्या दृष्टीने भांडवली मालमत्ता नाहीत. त्यामुळे त्यावर कोणतीही करआकारणी होत नाही यासंदर्भात अनेक समज / गैरसमज आहेत ते दूर होण्याच्या दृष्टीने, विविध मालमत्तांच्या हस्तातरण केल्यानंतर मिळणारा निव्वळ भांडवली नफा त्यावर होणारी करआकारणी याचा विचार आपण करूयात.
हेही वाचा – Insider Trading : इन्साईडर ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर बाजारात इन्साईडर ट्रेडिंग बेकायदेशीर का आहे?
यासाठी सर्वप्रथम भांडवली मालमत्ता म्हणजे काय? ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
- व्यक्तीने नावे असलेली 17त्याच्या वैयक्तिक व कुटुंबातील सदस्यांच्या वापरात असलेली किंवा नसलेली तसेच त्याच्या व्यवसायाचा भाग नसलेली कोणतीही चल/ अचल मालमत्ता. ही व्याख्या खूपच संदिग्ध आहे आणि यातील काही गोष्टी वगळण्यात आल्याने तज्ञ व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता असते.
- स्वतः अथवा कुटुंबातील सदस्य वापरात असलेल्या चल मालमत्ता ज से वापरातील दागिने, परंपरागत संग्रहातील ऐतिहासिक वस्तू, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू. वाहन, शिल्पाकृती इ यातील दागिने यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम, हिरे, मौल्यवान खडे, यापासूनच्या वस्तू. यात जरी आशा मौल्यवान गोष्टी फर्निचरवर लावल्या असतील तर ते वापरात असो अथवा नसो भांडवली मालमत्ता समजल्या जातील.
- सेबी कायदा 1992 मध्ये समावेश असलेले रोखेप्रकार म्हणजेच – शेअर्स, बॉण्डस, इटीएफ, इनव्हीट, रिटस, युनिट इ यास काही अपवाद आहेत. ते असे
- रोखे गुंतवणुकीसाठी लोकांच्यावतीने धारण करणाऱ्या देशी विदेशी वित्तीय संस्था
- युलीप योजनेचे युनिट 10(10D) 4 आणि 5
- गुंतवणूकदार म्हणून नाही तर निव्वळ व्यवसाय म्हणून व्यापारी हेतूने नियमित रोखे खरेदी विक्रीसाठी असलेल्या विविध मालमत्ता.
- स्वतः अथवा कुटुंबातील सदस्य वापरात असलेल्या काही चल मालमत्ता जसे उंची वस्त्रे, फर्निचर, वाहन यासारख्या वस्तू.
- 10000 लोकसंख्याहून कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिका हद्दीतील शहर विकास किंवा राखीव कारणासाठी ठेवलेली जमीन वगळून असलेली शेतजमीन. 10 हजाराहून जास्त परंतू 1 लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या,1 लाखाहून अधिक परंतू 10 लाखांहून कमी लोकसंख्या11Q we wa असलेल्या, 10 लाखाहून अधिक लोकसं we Aqख्या असलेल्या भागातील अनुक्रमे 2,6,8 किमी परिधक्षेत्र वगळून असलेली शेतजमीन. लोकसंख्येचा विचार करताना शेवटच्या जनगणनेद्वारे जाहीर करण्यात आलेली लोकसंख्या ही त्या गावाची अधिकृत लोकसंख्या म्हणून विचारात घेतली जाईल.
- सरकारने वेळोवेळी काढून हमी दिलेले सार्वभौम सुवर्ण रोखे.
- सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुवर्ण संचय योजनीतील जमा सोने.
- व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल आणि विक्रीसाठी साठवलेला तयार माल.
हेही वाचा – Share Market Tips for Beginners : शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी टाळा ‘या’ चुका
या सर्व मुद्याचा विचार करताना व्यावसायिक हेतूने धारण केलेली वस्तू भांडवली मालमत्ता समजली जाईल. म्हणजेच एखादी व्यक्ती कार स्वतःसाठी वापरत असेल तर ती भांडवली मालमत्ता समजली जाणार नाही त्याचा कार भाड्याने देण्याचा व्यवसाय असेल तर ती त्याची भांडवली मालमत्ता होईल.
भांडवली मालमत्ता
स्वदेशी किंवा परकीय वित्तीय संस्थांनी बाजारातील नोंदणी केलेल्या रोख्यांऐवजी थेट खाजगी भांडवली गुंतवणूक भागीदारीच्या हेतूने केली असता ती त्यांची भांडवली मालमत्ता होईल.
याचाच अर्थ असा-
एकसारखा दिसणारा व्यवहार कोण कशासाठी करीत आहे यावर त्यातून मिळणारे उत्पन्न हे भांडवली उत्पन्न असेल की व्यावसायिक उत्पन्न असेल ते ठरवण्यात येते. उदाहरणार्थ सागरने डोंबिवली येथे एप्रिल 2021मध्ये घेतलेला ₹ साठ लाखाचा फ्लॅट मे 2022 मध्ये पासष्ठ लाख रूपयास विकला व्यवहारात झालेला नफा हा ₹ पाच लाख सागरचा भांडवली नफा समजण्यात येईल. तर याच प्रकारचा व्यवहार विजय यांनी केला. विजय हे रिअल इस्टेट व्यावसायिक असून त्याने एप्रिल 2021 रोजी अंबरनाथ येथे घेतलेला फ्लॅट मे 2022 ला विकल्यास यातून मिळणारा ₹ पाच लाख नफा हा त्याचे व्यावसायिक उत्पन्न समजले जाईल.
हेही वाचा – Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणुकीचे वास्तव आणि मृगजळ
हे आहेत भांडवली नफ्याचे प्रकार
भांडवली नफ्याचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन प्रकार आहेत. बहुतेक सर्वच मालमत्ता तीन वर्षांनी विकल्या तर त्यातून मिळणारा भांडवली नफा हा दीर्घकालीन भांडवली नफा समजून त्यावर विशेष दराने कर आकारणी होते. असा नफा काढताना महागाईचा विचार करून काही ठिकाणी इंडेक्ससेशनची सवलत मिळते काही ठिकाणी मिळत नाही.
यापेक्षा कमी कालावधीचा नफा अल्पकालीन समजला जाऊन त्यावर बहुतेक नियमित दराने तर काही व्यवहारात विशेष दराने कर आकारणी होते.
यास दोन अपवाद आहेत-
- शेअरबाजारात नोंदलेले शेअर्स किंवा ज्याच्या मालमत्तेत 65% हून अधि22क गुंतवणूक शेअर्समध्ये आहे असे म्युच्युअल फंड युनिट्स, सरकारने नोटिफिकेशन काढून मान्यता दिलेले 12 ते 36 महिने कालावधीचे कर्जरोखे किंवा शून्य व्याजदाराचे रोखे यासाठी हा कालावधी 12 महिने एवढा असून त्यापेक्षा व इतर कमी काळात मिळालेला नफा हा अल्पमुदतीचा तर त्याहून अधिक कालावधीचा नफा हा दीर्घ मुदतीचा समजला जातो.
- अशीच गुंतवणूक खाजगी कंपन्यांच्या बाजारात न नोंदवलेल्या शेअर्समध्ये असल्यास किंवा जमीन, इमारत, गाळा, फ्लॅट यासारख्या अचल मालमत्तामध्ये असल्यास मिळणारा निव्वळ नफा 24 महिन्याच्या आत असल्यास अल्पमुदतीचा आणि त्याहून अधिक काळ धारण केल्यास दीर्घ मुदतीचा आहे.
या सर्व गोष्टी विस्ताराने समजून घेतल्यास अधिक चांगल्या तऱ्हेने समजण्यास मदत होईल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies