Reading Time: 2 minutes
- आजकाल आपण अनेक ऑनलाईन सुविधा वापरत असतो. विशेषतः पैशांचे व्यवहार असतील तर युपीआय द्वारे पैसे पाठवण्यासाठी, हॉटेल बिले भरण्यासाठी पटकन QR कोड वापरतो. तरीही असे किती तरी लोक आहेत की ज्यांना हातात प्रत्यक्ष पैसे असले तरच छान वाटते.कोणाला पैसे ट्रान्सफर करण्याऐवजी एटीएम वापरून रोख रक्कम काढण्यातच त्यांना सुरक्षित वाटते. म्हणून सेविंग अकाउंटमध्ये खूप जास्त पैसे विनाकारण ते ठेवतात.
- तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्मार्ट असाल तर मात्र तुम्ही व्याजाचा विचार करता. आर्थिक बाबतीत जागरूक नागरिकांना हे माहिती असते की सेविंग अकाउंट मध्ये पैसे साचवून त्यावर फक्त 3.5% दराने वर्षभरात व्याज मिळणार आहे. तेव्हा तुमच्या आवडत्या सेविंग्स खात्यात साचवलेल्या बचतीतून तुमची दीर्घकालीन स्वप्ने खरोखर पूर्ण होणार आहेत का ?
- तर मग यावर मार्ग काय? काळजी करू नका, मार्ग नक्कीच आहे. हेच पैसे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये योग्य कालावधीसाठी ठेवले तर जवळपास 6% ते 8% परताव्याची अपेक्षा तुम्ही करू शकता. सध्या असे अनेक म्युच्युअल फन्ड्स आहेत की जे तुम्हाला सेविंग अकाउंट पेक्षा जास्त चांगला परतावा देऊ शकतात.
- आपण एक उदाहरण बघूया. ₹ १ लाख १ वर्षासाठी बँकेत सेविंग खात्यात ठेवले तर ३. ५ % ने मिळणारा परतावा ₹ ३,५०० इतका होतो आणि तेच ₹ १ लाख १ वर्षांसाठी चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये टाकले तर ७% ने मिळणारा परतावा ₹ ७,००० इतका होतो.
महत्वाचे ! पैसे वाचवायचा ११ महत्वपूर्ण टिप्स !
- तुम्ही तुमच्या बचत केलेल्या पैशातून सगळेच पैसे बँकेत ठेवण्यापेक्षा काही पैसे बँकेत आणि काही पैसे म्युच्युअल फंडामध्ये ठेवू शकता. यामुळे तुमच्या गरजेनुसार पैसे काढणं सोयीचे होईल तसेच बचतीच्या पैशातून काही चांगला परतावा ही मिळू शकेल. फंडामधून हे पैसे काढणे देखील सोयीस्कर असते.ऑनलाईन पद्धतीने तुमच्या अकाउंटला पैसे डायरेक्ट पाठवले जातात.
- म्युच्युअल फ़ंडात गुंतवणूक करण्याचा SIP हा देखील एक चांगला पर्याय आहे.यामध्ये तुम्ही दर महिना काही पैसे ठरवून दिलेल्या तारखेला गुंतवणूक करू शकता. यात तुम्ही दरमहा किती रुपये टाकायचे आणि किती वर्षासाठी हे तुम्ही तुमच्या दीर्घकालीन ध्येयांचा विचार करून ठरवा.
- पारंपरिक पद्धतीने पैसे सांभाळून आणि साठवणूक करून वर्षानुवर्षे वाढणाऱ्या महागाईला सामोरे जाणे आजकाल सर्वासाठीच अवघड होत आहे.
- अकाउंट मध्ये किंवा घरी पडून राहणारे पैसे, आहेत म्हणून खर्च करणारे लोकही असतातच की! मग छोटा फ्रिज विकून मोठा फ्रिज घेतला जातो, छोट्या टीव्ही ची जागा मोठा टीव्ही घेतो. बाजारात मोबाइलचे विविध प्रकार येतच राहतात तेव्हा अशा गोष्टी गरज नसतांना पण पैसे नको त्या गोष्टीत गुंतवले जातात.
- तेव्हा नक्कीच थोडे पैसे आपत्कालीन वेळेसाठी बाजूला ठेवले तर ? नुकत्याच कोविड च्या विळख्यातून निघणाऱ्या आपल्या सारख्या अनेक लोकांनी नवीन गोष्टी शिकून त्या आत्मसात करणे गरजेचे आहे. तेव्हा आजपासूनच तयारीला लागा !
महत्वाचे ! वॉरेन बफे यांची बचत व गुंतवणुकीचे महत्व सांगणारी २० विधाने !
तुम्ही काय कराल ?
- नियमितपणे मासिक बजेट तयार करायची महान सवय लावा.
- तुमच्या आर्थिक नियोजनानुसार किमान ६ महिन्यांच्या खर्चाइतका इमर्जन्सी फ़ंड बाजूला काढून ठेवा. सदर आणीबाणी निधी मुदत ठेवी किंवा लिक्विड फ़ंडात ठेवा.
- गरजेपुरतेच पैसे सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये ठेवा.
- बचतीचे पैसे SIP द्वारे उत्तम म्युच्युअल फ़ंडात गुंतवा.
- आर्थिकरित्या तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या गोष्टीचा आणि माणसांचा विचार करून पैशाचे नियोजन करा.
- वेळोवेळी आढावा घेऊन बचत कमी जास्त प्रमाणात चालू ठेवा !
हे ही वाचा ! Financial Planning- पहिल्या नोकरीपासून असे करा आर्थिक नियोजन !
Share this article on :