Financial planning
Financial planning
Reading Time: 3 minutes

तुमच्या पहिल्या नोकरीपासून सुरुवात करत आहात? यशस्वी होण्यासाठी करा आर्थिक नियोजन !

नोकरीला लागणे  हा आपल्या करिअर मधला टर्निंग पॉईंट असतो. इथूनच करिअरची खरी सुरुवात होते. पहिल्या पगाराचा चेक हातात मिळाल्यावर होणारा आनंद हा काही वेगळाच असतो.आपल्या पहिल्या पगारातून आपण स्वतःसाठी कुटुंबासाठी भेटवस्तू खरेदी करतो. मिळणाऱ्या पगारातून स्वत:च्या  इच्छा आकांक्षा पूर्ण करतो, हे सगळं थोड्या कालावधीसाठी योग्य आहे. परंतु सुरवातीपासूनच  स्वतःला आर्थिक नियोजनाची सवय लावणे देखील गरजेचे आहे.

हेही वाचा – Rules Of Financial Planning : आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम… 

नोकरीला लागणे म्हणजे लाईफ सेट झाली असे वाटत असले तरी तसे नाहीये, कितीही चांगला पगार देणारी नोकरी लागली असेल तरी देखील वेगाने वाढणारी महागाई, वैद्यकीय जोखीम या सर्वांचा विचार करता भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे.

नोकरीच्या सुरवातीच्या काळात सर्वजण बचत व आर्थिक नियोजन याकडे दुर्लक्ष करतात. आत्तापासूनच बचत करण्याची काय गरज आहे असे वाटणे हा गैरसमज आहे. कारण बचत व आर्थिक नियोजन हे यशस्वी होण्याचे दोन मार्ग आहेत त्यामुळेच आजचा तरुण वर्ग हा आर्थिक नियोजनाला जास्त प्राधान्य देतो.

आर्थिक नियोजनावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी :

इमर्जन्सी उद्भवणे – भविष्यात काय होईल ते आत्ताच सांगता येत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीसाठी आर्थिक दृष्ट्या तयार असणे गरजेचे आहे. कोणती अनपेक्षित घटना, अपघात, मेडिकल इमर्जन्सी यांसारख्या घटना तुमचा खिसा रिकामा करू शकतात त्यामुळे तुमचा आर्थिक ताण वाढू शकतो.

महागाई – जग वेगाने पुढे जात आहे आणि त्याचबरोबरच महागाई सुद्धा. जीवनावश्यक वस्तूंची वाढती किंमत तुमच्या ठरलेल्या बजेटवर परिणाम करू शकते. वाढत्या महागाईमुळे बचत करणे अवघड होत चालले आहे.ह्या सगळ्याचा विचार करता तुम्ही बचत कशी करता येईल व आपले उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

उच्चशिक्षणासाठी नियोजन – नोकरीला लागणे याचा अर्थ शिक्षण थांबवणे असा नसतो. काही जण शिक्षण करता करता नोकरीदेखील करतात.आज भरपूर  विद्यार्थी उच्चशिक्षणास  प्राधान्य देतात. नोकरीनंतर शिक्षण चालू ठेवतात. परंतु आज शिक्षणाचा खर्च  भरपूर महागला आहे. उच्चशिक्षण आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आर्थिक नियोजन असणे गरजेचे आहे.

आर्थिक नियोजनासाठी स्मार्ट टिप्स:

बजेट तयार करा – बजेट तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. बजेट केल्यामुळे आवश्यक खर्च व वायफळ खर्च यांमधला फरक कळून येण्यास मदत होते. तसेच आपल्या उत्पन्नामधून किती बचत होते याचा देखील अंदाज येतो. बजेट तयार केल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आर्थिक नियोजन करण्यास मदत मिळते.

गुंतवणूक करा – जेवढ्या लवकर तुम्ही  गुंतवणूक करण्यास सुरुवात कराल तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळेल. कोणत्या गुंतवणुकीचा पर्याय आपल्यासाठी योग्य आहे व केवढी गुंतवणूक आपल्याला करता येईल हे पाहून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

हेही वाचा  – Financial Planning: आयुष्यात येणाऱ्या या ४ कठीण प्रसंगांसाठी तुम्ही तयार आहात का?…

 

आर्थिक  उद्दिष्ट्ये  ठरवा – श्रीमंत होण्याचे ध्येय तर सगळेच ठेवतात त्यासाठी मर्यादा निश्चित करणे कठीण असते. तुम्हाला स्वतःच  घर किंवा गाडी घ्यायची असेल तर ते काही लगेच शक्य होत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्ही आर्थिक उद्दिष्ट ठरवल असेल तर त्याप्रमाणे बचत करण्यास मदत होते. आर्थिक उद्दिष्टे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसे की सेवानिवृत्तीनंतर  बचत करण्याचे आर्थिक उद्दिष्ट सुद्धा तुम्ही आधीच ठरवू शकता. आर्थिक उद्दिष्टे ठरवल्यामुळे तुम्हाला आर्थिक नियोजन व बचत करण्यास मदत होते.

बचत- “थेंबे थेंबे तळे साचे” असे म्हणतात त्याचप्रमाणे थोड्या-थोड्या केलेल्या बचतीचे रूपांतर संपत्तीमध्ये होऊ शकते. कोणतेही मोठे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आधीपासूनच बचत करणे गरजेचे असते. तुम्ही अगदी लहान रक्कमेपासून सुद्धा बचत करण्यास सुरुवात करू शकता. कारण जेवढ्या लवकर तुम्ही बचत करण्यास सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होतील.

विमा पॉलिसीची निवड करणे – विमा पॉलिसी असणे ही आज काळाची गरज आहे. कारण कोणतीही अनपेक्षित घटना तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकते. अशावेळेस विमा पॉलिसी आर्थिक सहाय्य प्रदान करते. अपघात किंवा अगदी छोटासा आजार देखील महागात पडू शकतो. वाढत्या वैद्यकीय खर्चाचा विचार करता आरोग्य विमा सारख्या योजनांमुळे संरक्षण मिळते. जेवढ्या लवकर विमा पॉलिसी खरेदी कराल तेवढा कमी वार्षिक प्रीमियम भरण्याची  सुविधा  तुम्हाला मिळते. त्यामुळे योग्य विमा पॉलिसी खरेदी करणे आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरेल.

कर वाचवणे – सहसा सुरुवातीला कोणी कर वाचविणाल्या प्राधान्य देत नाही. परंतु कर बचतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे यामुळे तुमचे डिस्पोजेबल उत्पन्न वाढते. अगदी सुरुवातीपासूनच करबचतीमध्ये मदत करणाऱ्या पर्यायांबद्दल माहिती करून ठेवणे फायद्याचे ठरेल. चांगला कर लाभ मिळवण्यासाठी कोणत्या गुंतवणुकीचा पर्याय योग्य आहे याची माहिती आधीच असेल तर गुंतवणूक करताना तुम्हाला फायदा होईल.

हेही वाचा – Types of Financial Planning: आर्थिक नियोजनाचे हे ७ महत्वाचे प्रकार, तुम्हाला माहिती आहेत का?…

 

वरील सर्व गोष्टी तुम्हाला चांगले आर्थिक नियोजन करण्यास नक्कीच मदत करतील. थोड्या कालावधीतच यशस्वी होण्यासाठी जेवढ्या लवकर आर्थिक नियोजन कराल तेवढ्या लवकर तुमची स्वप्न तुम्ही पुर्ण करु शकता. आर्थिक नियोजन केल्यामुळे आर्थिक दृष्ट्या सेटल होण्यास नक्कीच मदत मिळेल.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

UPI : युपीआय म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती…

गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

Reading Time: 3 minutes तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…