शेअर बाजारात गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर विकत घेताना त्याचा अभ्यास करणे गरजेचे असते. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार असाल तर ध्येय ठरवून गुंतवणूक करायला हवी. शेअर बाजारातील मूलभूत गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते.
शेअरची खरेदी करण्यापूर्वी तो पोर्टफ़ोलिओमध्ये व्यवस्थित बसतो का नाही त्याची तपासणी सर्वात आधी करायला हवी. गुंतवणूकदार फक्त कंपनीचे शेअर विकत घेत नाहीत तर कंपनीचे काही अंशी मालक असतात. शेअर विकत घेण्यापूर्वी कंपनीचे खालील १० घटक गुंतवणूकदाराला माहिती असणे आवश्यक आहे.
१. शेअर मध्ये किती काळ गुंतवणूक करायची याची माहिती असणे –
सर्वप्रथम शेअर विकत घेण्यापूर्वी त्याची गुंतवणूक किती काळासाठी करायची आहे हे गुंतवणूकदाराला माहित असायला हवे. यामुळेच शेअरची खरेदी करायचे का नाही हे समजते. गुंतवणूकदारांच्या आर्थिक उद्दिष्टांवर आधारित आपत्कालीन, मध्यम मुदतीचा आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या शेअर संदर्भातील निर्णय घेतला जातो.
- अल्पकालीन गुंतवणूक –
- ‘पी हळद आणि हो गोरी’ हा नियम शेअर बाजारात चालत नाही. शक्यतो शेअर्समध्ये अल्पकालीन गुंतवणूक नकोच. गरज असल्यास बँकांच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करा परंतु शेअरमध्ये अल्पकाळासाठी पैसे टाकू नका.
- मध्यम काळापुरती गुंतवणूक –
- गुंतवणूकदार मध्यम काळापुरती गुंतवणूक करणार असेल तर ती गुंतवणूक १ ते १० वर्षापर्यंत करावी लागते.
- मध्यम काळापुरती गुंतवणूकदाराने नवीन कंपन्यांचे शेअर्स आणि मध्यम जोखीम असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हवी.
३. दीर्घ काळापुरती गुंतवणूक –
- दीर्घ काळापुरतीची गुंतवणूक १० वर्षापेक्षा जास्त काळ करावी लागते.
- दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यावर परतावाही चांगला मिळतो.
२. गुंतवणुकीचे धोरण –
- शेअरची खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूक धोरणांचा अभ्यास करणे गरजेचे असते. गुंतवणूकदाराला गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे गरजेची असते.
- यशस्वी गुंतवणूकदारांकडून खालील तीन प्रमुख धोरणांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
- मूल्य आधारित गुंतवणूक – मूल्य आधारित गुंतवणूक म्हणजे कंपनीच्या मूलभूत बाबींचा अभ्यास करणे. कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती, भविष्यातील संधी, व्यवस्थापनाचा ट्रॅक रेकॉर्ड अशा गोष्टींचा अभ्यास या मध्ये करणे आवश्यक असतो. वॉरेन बफेट यांनी नफा मिळवण्यासाठी मूल्य आधारित गुंतवणुकीचा वापर केला होता.
- मुल्याधिष्ठीत गुंतवणूक – मूल्याधिष्ठित गुंतवणुक हा असा प्रकार आहे जो संबंधित कंपनीच्या महसुलाच्या प्रमाणात वाढत जातो.. गुंतवणूकदारांचा विश्वास असतो की या समभागांमध्ये नफ्याचा दर कायम राहतो आणि चांगल्या परताव्याची संधी मिळते.
- लाभांशावर आधारित गुंतवणूक – गुंतवणूकदारांनी लाभांश देणारे दर्जेदार शेअर शोधून गुंतवणूक करायची पद्धतही लोकप्रिय आहे. शेअर्समधून मिळालेले लाभांश उत्पन्न मिळवून देतात. त्यामधून चांगली कमाई मिळवण्यासाठी पुन्हा गुंतवणूक करता येते. गुंतवणूक करण्यापूर्वी त्या शेअर्समधून किती परतावा मिळणार आहे याचा गुंतवणूकदाराने विचार करायला हवा.
३. शेअरची खरेदी करण्यापूर्वी मूलभूत गोष्टींची तपासणी करा –
- प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी साध्या शेअर्समधील गुंतवणुकीतूनही चांगले पैसे कमावले आहेत.
- शेअर विकत घेण्यापूर्वी विचारात घेण्यासारखी महत्वाची गुणोत्तरे
- किंमत ते कमाई गुणोत्तर (PE Ratio) – किंमत ते कमाई गुणोत्तर प्रति शेअर कमाईशी शेअरच्या किंमतीची तुलना केली जाते.
- कर्ज ते इक्विटी गुणोत्तर (Debt Equity Ratio) – कर्ज ते इक्विटी गुणोत्तर रेशो गुणोत्तर कंपनी भांडवलाच्या तुलनेत किती कर्जात आहे हे समजून येते. कर्ज कंपनीने जास्त घेतलेले असल्यास दिवाळखोरीचे संकेत दिले जातात.
- किंमत ते खरेदी मूल्य गुणोत्तर – किंमत ते खरेदी मूल्य गुणोत्तर शेअरच्या किंमतीला कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेच्या मूल्याशी तुलना करतात.
४. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत शेअरची कामगिरी –
- गुंतवणूकदारांनी हे देखील तपासायला हवे की शेअर्सने कशी कामगिरी केली आहे.
- Moneycontrol आणि Google Finance सारख्या वेबसाईट कंपन्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांशी तुलना करून माहिती पुरवतात.
नक्की वाचा : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ कसा बनवाल?
५. शेअर धारकांचा पॅटर्न –
- गुंतवणूकदारांनी शेअरची खरेदी करण्यापूर्वी शेअरहोल्डिंग पॅटर्न तपासावे.
- शेअर मध्ये गुंतवणूक करताना देशांतर्गत गुंतवणूकदार, उच्च परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार कंपन्यांमध्ये किती मालकी राखून आहेत हे तपासूनच गुंतवणूक करावी.
- जेवढी प्रवर्तकांची शेअर होल्डिंग जास्त तेवढा शेअर सुरक्षित असल्याचे मानले जाते. .
६. म्युच्युअल फंड होल्डिंग –
- एखादा शेअर अनेक म्युच्युअल फंड कंपन्या विकत घेतात तेव्हा कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये नसलेल्या इतर समभागांच्या तुलनेत तो चांगला शेअर समजला जातो.
- म्युच्युअल फ़ंड कंपन्या खूप अभ्यास करूनच शेअर निवडतात. तुम्ही गुंतवणूक करत असलेला शेअर चांगला आहे कि नाही हे तपासून पहायचा हा एक सोपा मार्ग आहे.
७. कंपनीचा आकार –
- शेअरची खरेदी करताना गुंतवणूकदाराने त्या कंपनीचे आकारमान किती आहे यावरून त्यामध्ये गुंतवणूक करायची का नाही हा निर्णय घ्यायला हवा. यामध्ये खरेदी करताना जोखीम किती घ्यायची हा निर्णय ठरवला जातो.
- रिलायन्स इंडस्ट्रीज, ब्रिटानिया, टाटा मोटर्स या कंपन्या त्यांच्या क्षेत्रातल्या दादा कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. अगदीच अपरिचित माहिती नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे टाळा.
नक्की वाचा : शेअर बाजारात ६ गोष्टींपासून कायम लांब राहा
८. लाभांशाचा इतिहास –
- अनेक कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही भाग गुंतवणूकदारांना लाभांश स्वरूपात देत असतात.
- गुंतवणुकीतून उत्पन्नाचे धोरण अवलंबणाऱ्या गुंतवणूकदारांनी लाभांश समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करावा.
- गुंतवणूकदारांना शेअर्स मधून नफा मिळवायचा असेल तर त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी लाभांशाचा इतिहास तपासून पाहावा.
- शेअर्समधून मिळणाऱ्या नफ्याच्या तुलनेत जास्त उत्पन्न हव्या असलेल्या गुंतवणूकदारांनी लाभांश उत्पन्नाकडे लक्ष द्यावे.
९. महसूल वाढ –
- शेअरची खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी महसुली वाढ होणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी करावी.
- त्या कंपन्यांचा महसूल आणि आणि वाढत्या नफ्याचा अभ्यास केल्यास शेअर मधून फायदा मिळू शकतो.
१०. अस्थिरता –
- शेअर बाजारात जास्त किमतीचे असणारे शेअर्स तेजीच्या दिवसांमध्ये झटपट वाढतात आणि मंदीच्या दिवसात अचानक कमी होत जातात.
- जर तुम्ही स्थिर शेअर्समध्ये गुंतवणूक करणार असाल तर वाढीच्या काळामध्ये गुंतवणूकदार चांगला नफा कमवू शकतो.
निष्कर्ष :
- गुंतवणूकदाराने कोणत्याही शेअरची खरेदी करण्यापूर्वी सर्वोत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करावा. गुंतवणूकदाराने शेअर बाजाराचा अभ्यास आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानेच शेअर बाजारात गुंतवणूक करावी. शेअर बाजारात कमी जोखीम स्वीकारून सुरुवातीला गुंतवणूक करावी.
1 comment
Nice information this useful points definitely helpful to take decision about stocks purchasing.
Tnx sir