हिंडेनबर्ग रिसर्च ही एक अमेरिकन संस्था आहे. “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही गोष्टींचा त्रास होण्यापूर्वी त्यावर घेतलेली खबरदारी ही कधी पण चांगली असते असा त्यामागे अर्थ असतो. हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेचे काम असंच आहे. नाथन अँडरसन यांनी वर्ष 2017 मधे हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था स्थापन केली.
- हिंडेनबर्ग रिसर्च ही एक प्रकारची गुंतवणुक संशोधन संस्था असून शेअर संबंधी विविध कंपन्यांचा अभ्यास करून त्यांच्या संदर्भात एक अहवाल तयार करून तो प्रसिद्ध करत असते.
- यामधे मुख्यत्वे कंपनीने काही गैर व्यवहार किंवा कुठल्याही प्रकारचा घोटाळा केला असल्यास त्याबद्दल आरोप केलेले असतात.
- या सर्व प्रक्रियेमागे कंपन्यांच्या चुकीच्या व्यवहारामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये आणि होणार असेल तर ते आधीच कळावे हा यामागचा हेतू आहे.
- अर्थात या प्रकारची संस्था सुरू करावी या मागे कारणही तसेच होते. हिंडेनबर्ग या प्रकारात मोडणाऱ्या एका विमानाचा झालेला अपघात याला कारणीभूत आहे आणि म्हणूनच त्यांनी संस्थेचे नाव देखील त्याला अनुसरून ठेवले आहे.
- हिंडेनबर्ग या प्रकारात मोडणाऱ्या एका विमानाचा हायड्रोजन गळतीमुळे झालेला अपघात हा मानवनिर्मित होता आणि तो टाळता येऊ शकत होता, या आधारावर अँडरसन यांनी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था स्थापन केली.
भारताशी संबंधित विचार केला तर जानेवारी 2023 मध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांवर हिंडनबर्ग रिसर्च कंपनीने एका अहवाल तयार केला. या अहवालानुसार अदानी समूहावर तीन आरोप केले गेले, या आरोपांमुळे अदानी समूहाचे 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.
- यापैकी एक म्हणजे अदानी समूहाच्या कंपन्यांचे मूल्य हे त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मूल्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या शेअरची प्राईस देखील अधिक म्हणजे जवळपास 80% ने जास्त आहे,असे आरोपामधे लिहिले आहे.
- दुसरे म्हणजे कंपनीने शेअरचे मूल्य हे गैरव्यवहाराने वाढवले आहे. शेअरचे मूल्य फुगवून दाखवले आहे आणि यामुळे कंपनी नफ्यात आहे हे गुंतवणूकदारांना दाखवून दिशाभूल केले आहे असा आरोप होता. अर्थात शेअरचे मूल्य हे कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असते, ज्याला आपण प्राईस अर्निंग रेशो असे म्हणतो. हा प्राईस अर्निंग रेशो देखील अधिक आहे असे म्हटले आहे.
- अदानी समूहाने क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतले असून काही गोष्टी गहाण ठेवल्या आहेत. तसेच या कर्जाची परतफेड करण्यासाठी अदानी समूहाकडे कंपनीच्या शेअर्स शिवाय काहीच नाही असे तिसऱ्या आरोपात म्हटले आहे.
- यावर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याननंतर, सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मधे अदानी समूहाविरोधामधले आरोप फेटाळले होते. आणि या निर्णयामुळे हा अदानी समूहाचा आणि सत्याचा विजय झाल्याचे मानले गेले.
मात्र वर म्हटल्याप्रमाणे “ प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ” या विचारांशी मिळते-जुळते काम करणारी हिंडनबर्ग रीसर्च आता “कुंपणानेच शेत खाणे ” या म्हणीप्रमाणे काम करतेय असे समोर येत आहे. ते कसे –
- हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या या आरोपांमुळे अदानी समूहाच्या शेअर्सचे भाव खाली कोसळले.अर्थात कुठलीही वाईट बातमी कंपनीच्या शेअरसाठी नुकसानकारक ठरते, हे जसे 100% खरे आहे तसेच या गोष्टीचा फायदा घेत हिंडनबर्गने शॉर्ट सेलिंग करत नफा कमावला असे म्हंटले जात असून त्यांच्या कामावर शंका निर्माण झालीय, कसे ते आपण बघू.
- अदानी समूहाचा अहवाल देण्याआधी अदानी समूहाचे शेअर्स हिंडनबर्गने चढ्या भावाने विकले आणि नंतर जेव्हा आरोपांमुळे अदानी समूहाचे शेअर्स भरपूर प्रमाणात खाली आले तेव्हा कमी झालेल्या भावावर शेअर्स विकत घेतले.
- आता, आधी विकणे आणि नंतर खरेदी करणे या प्रकाराला शेअर मार्केट मधे शॉर्ट सेलिंग असे म्हटले जाते. या व्यवहारांमध्ये होणारा नफा हा शॉर्ट सेलिंग पद्धतीने मिळवला जातो. हिंडनबर्ग रिसर्चने शॉर्ट सेलिंगमधून 4 मिलियन डॉलर्स इतका नफा कमावल्याचे समोर येत आहे.
आता अजून या हिंडेनबर्गच्या आरोपांमधे भर पडली असून हे आरोप -प्रत्यारोपाचे जाळे सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या पर्यंत पोचले आहे.या सगळ्याचा शेअर बाजारावर परिणाम होतोच,पर्यायाने गुंतवणूकदारांचे ही नुकसान होते.
#हिंडेनबर्ग
#शॉर्ट सेलिंग
#नाथन अँडरसन