Reading Time: 3 minutes

निवृत्ती नियोजन

मागील भागात आपण निवृत्ती नियोजनाची पाच महत्वाची कारणे बघितली. या भागात निवृत्ती नियोजन करण्याची उर्वरित ६ महत्वाच्या कारणांबद्दल माहिती घेऊया.

६. सेवानिवृत्तीसाठी नियोजन:

  • एक वाक्य तर तुम्ही नेहमीच ऐकलं असेल, चक्रवाढ व्याज हे जगातील आठवं आश्चर्य आहे. ज्याला ते समजतं तो कमावतो…ज्याला नाही तो गमावतो.”- अल्बर्ट आइंस्टीन.
  • निवृत्ती नियोजन करताना कितीही नियोजन केले तरी ते कमीच आहे. खूप आधीपासून नियोजन सुरू करून  पैसे बाजूला ठेवले आणि गुंतवणूक केली की सेवानिवृत्तीसाठी आपला मार्ग अधिक सुलभ होतोच.
  • निवृत्ती नियोजन करताना साठलेली १ कोटीची रक्कम आव्हानात्मक वाटू शकते. परंतु तुम्ही बचतीला जितका जास्त उशीर कराल तितकं हे ध्येय गाठण्याचे आव्हान वाढेल.
  • जितक्या लवकर बचतीची सुरवात कराल, १ करोड रुपयांचे ध्येय सध्या करण्यासाठी तुमच्या पगारावर तितका कमी ताण येईल हे खाली दाखवले आहे.

. निवृत्तीसाठीची बचत:

  • निवृत्तीसाठी बचत करावी इतके पैसेच नाहीत अशी परिस्थिती असूच शकत नाही. बचत हा आकड्यांपेक्षा मनाचा खेळ आहे.
  • शेवटी आपल्यासाठी महत्वाचे काय आहे? सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याला प्राधान्य दिलं की त्यासाठीचे बचतीचे मार्ग आपोआप समोर येतात.

८. आयुष्यातल्या सगळ्या आकांक्षा पूर्ण करण्याची सर्वोत्तम वेळ:

  • आपले आयुष्य एक सँडविच आहे –  कष्टानी भरलेले दिवस ज्याच्या मध्ये आहे आणि सुरवात आणि शेवट रमणीय अशा बालपण व निवृत्तीच्या काळाने झाकलेले आहेत.
  • कष्टाचा काळ हा  धावपळीचा, गोष्टी मिळवण्याचा तसेच जबाबदाऱ्या घेण्याचा. हा काळ वृद्ध पालक किंवा मुलांचे संगोपन करण्यात निघून जातो. बालपण निश्चिंत काळ आहे पण तेव्हा पालकांचा  धाक आणि आदेशाचे आपण बांधील असतो.
  • निवृत्तीची वेळ अशी आहे की, आपला वेळ किंवा पैसा आपण इच्छित असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो- जसं की, प्रवास, सामाजिक कार्यात योगदान किंवा बऱ्याच वर्षांपासून आपण संग्रहित केलेली पुस्तके वाचणे इ. मग इतक्या सुंदर काळात पैश्याची चिंता आणि कसं जागाव? असे प्रश्न सोडवण्यात वेळ कशाला घालवायचा? मग उरलेल्या काळात कोणत्या इच्छा पूर्ण होतील?

९. आर्थिक नियोजनाची योजना:

  • भूतकाळात/वर्तमानात आहेत त्याहून आधिक अडथळे भविष्यात तुमच्या समोर येऊ शकतात. संशोधन सांगते की, मनुष्य आशावादी प्राणी आहे. आपला विश्वास असतो की,आपले आयुष्य आहे त्याहून चांगले होईल.
  • मी ही आशावादी आहे. परंतु आशावादाला  नियोजनची जोड आहे का? गोंधळलात?  मी सेवानिवृत्ती काळाचा सर्व आशावाद सोडून देण्याविषयी बोलत नाही.  
  • भूतकाळात किंवा सध्याच्या काळात जितक्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागते त्याबद्दल विचार करा. एका विशिष्ट कालावधीसाठी आर्थिक नियोजनाची योजना असणे आणि त्याविषयी आशावादी असणे हे शक्य आहे. 
  • अमेरिकन ब्रँड प्रुडेंशियल हा एक ब्रँड जो काही सामाजिक प्रयोगाचा वापर करून सेवानिवृत्तीसाठी लोकांना वेगवेगळ्या प्रयोगांमधून जागृत करतो. त्यांनी छान सामाजिक प्रयोग केला, ज्याला चुंबक प्रयोग म्हणतात.
  • लोकांनी भूतकाळात घडलेल्या गोष्टी लिहून काढायच्या-चांगल्या गोष्टी पिवळ्या रंगत आणि वाईट गोष्टींनी निळ्या रंगात लिहायच्या. त्याचप्रमाणे,  त्यांनी लोकांना भविष्यामध्ये घडतील अश्या गोष्टी असेच रंग वापरून लिहायला सांगितल्या. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भूतकाळातील निळ्या आणि पिवळ्याचे मिश्रण होते तर भविष्य बोर्ड फक्त पिवळे होते.
  • आपल्यापैकी कोणी खरोखरच विचारही करू इच्छित नाही की आपली नोकरी जाईल? पण हे होऊ शकते, याचा विचार करा. उद्या काय होईल हे माहित नसल्याने डोळे उघडे ठेऊन बघणे नेहमीच चांगले असते.

१०.  वारसा हक्क नेहमी अनिश्चित असतो:

  • तुम्ही विचार करत असाल की आमच्या पालकांनी चांगले कमावले किंवा पुरेसे जतन केले असेल तर आपल्याला बचतीची आवश्यकता नाही.
  • प्रथम, सेवानिवृत्तीसाठी आपल्या वारसा हक्कावर अवलंबून असणे धोकादायक आहे कारण हे तुम्ही स्वतः साठी काय करू शकता यावर उठवलेल प्रश्न चिन्ह आहे.
  • दुसरे म्हणजे, वारसा हक्क कधी आणि किती मिळेल? हे आपल्याला कधीही कळू शकत नाही,  तर आपण त्यावर अवलंबून कसे राहू शकता?

११. कौटुंबिक जीवन अधिक आनंदी करण्याचा प्रयत्न करत राहू शकता

  • आपल्या निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबाच काय चित्र तुम्हला दिसतं? कदाचित देशभरात किंवा जगभरात पसरलेली मुले आणि नातवंडे. भेटवस्तूच्या स्वरुपात लोकांवर प्रेमभावना दाखवणं मी नेहमीच पसंत करते.
  • जेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा असेल तेव्हा तिकिटे काढून प्रवास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य अनुभवू इच्छित नाही का?  
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा एखाद्या नातवंडाला खूप दिवसांपासून हवी असणारी गोष्ट भेट देऊ शकता. गाठीशी बचत असेल तर वृद्धापकाळातसुद्धा खर्च करण्याइतके तुम्ही सक्षम आहात.
  • तुम्ही जर सेवानिवृत्तीचा विचार काही सेकंदा पेक्षा जास्त वेळ केला नसेल तर एकटे किंवा जोडीदारा सोबत बसा, पेपर, पेन आणि जोडीला कॉफीचे कप घ्या.
  • आपण निवृत्तीचा काळ कसा घालवू इच्छिता या बद्दल बोला आणि लिहून काढा. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की निवृत्ती ही अशी गोष्ट आहे की ज्या बद्दल आपण विचार केलाच पाहिजे, तेव्हा पासून निवृत्तीनंतरच्या काळाचे योजना करा आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या पैशाची योजना करा.

माझा आदर्श सेवानिवृत्तीचा काळ कसा असावा याचा मी एक डिजिटल व्हिजन बोर्ड बनविला आहे. यात एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आहे.  ज्यात फक्त एक स्लाइड आहे. समुद्र किनारी एका कॅफे मध्ये एक निरोगी आणि आनंदी जोडपं, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळाचा आनंद घेत आहेत. आपल्याला पुढचे आयुष्य असे हवे आहे हे जेव्हा शोधण्याचा प्रयत्न कराल आणि त्यासाठी बचत करायला सुरवात कराल तेव्हा सेवानिवृत्तीची कल्पना अधिक वास्तविक, आकर्षक होईल.

(वरील लेख अपर्णा आगरवाल यांचा https://elementummoney.com/ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद आहे. अपर्णा या प्रमाणित आर्थिक योजनाकार (Certified Financial Planner) असून विविध आर्थिक विषयांवर तज्ञ ब्लॉगर म्हणून ओळखल्या जातात.त्यांना तुम्ही [email protected] या ईमेल आय.डी. वर आणि Elementum Money या फेसबुक पेजवर संपर्क करू शकता.)

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2MWnxAa)

 सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी – मुदतपूर्तीनंतरचे विविध पर्याय,

उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस ,

 गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग २

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
1 comment
  1. नमस्कार मॅडम/ सर
    आपला लेख नक्कीच आमच्या ज्ञानात भर पडणारा आहे आणि त्यामुळे आमच्या मनात पण त्याविषयी जागृती निर्माण होत आहे. आपण वरील लेखात जे माहिती पुरवली आहे ती खूप सखोल आहे पण मला एक शंका अशी आहे आपण निवृत्तीसाठी आताच बचत करायला पाहिजे ती आपल्या पगारातून आणि आपण वेळोवेळी ती करतोही पण पुढे चालून मुलाचं शिक्षण मुलीच लग्न ह्या गोष्टी करताना त्याच बजेट जरा कोलमडते, मग आपण बचत करून जर हे खर्च भागवले तर सरतेशेवटी अपल्या कडे तुटपुंजी रक्कम राहील मग आपण कसे नियोजन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…