आपण देशतील, जगातील श्रीमंत लोकांकडे पाहतो आणि सहज विचार येतो की, हे श्रीमंत आहेत कारण यांचे पूर्वज श्रीमंत होते किंवा त्यांनी पुढच्या पिढ्या श्रीमंत व्हाव्यात याची सोय खूप पूर्वीच करून ठेवली होती. आपण श्रीमंत नाहीत कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी फार कोट्यवधी रुपये कमवून ठेवले नाहीत. पण हे साफ चूक आहे. कित्येक श्रीमंतानी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे.
श्रीमंत होण्यासाठी पूर्वापार संपत्ती किंवा लॉटरीच तिकीट किंवा खजिना सापडावा लागत नाही. गरज आहे ती काही सवयी स्वतः मध्ये रुजवण्याची. मग दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा आणि महिना १०,००० रुपये कमावणारा माणूस देखील बिलगेट्स, अंबानी, अदानी होऊ शकतो.
जाणून घ्या श्रीमंत माणसांच्या बचतीचे कानमंत्र.
१. पैसे कमावण्याची सवय-
कोणतेतरी आर्थिक जबाबदारी किंवा बांधिलकी पूर्ण करायची आहे आणि केवळ त्याकरिता पैसे कमावणं वेगळं. परंतु यशस्वी लोक त्यांच्या कडे पैशाची आवक कशी चालू राहील याचा विचार करतात. खूप पैसा मिळवणे चांगलेच आहे, परंतु आपण बचतीवर मिळणाऱ्या व्याजांचा फायदा घेत आहोत का हेही तपासा. जसे उच्च व्याज बचत खाते किंवा प्रमाणपत्रे (डीडी) जे आपल्या पैशांना सुरक्षित ठेवताना मदत करतात.
२. अधिक पैसे वाचवा-
तुमच्या एकूण पगाराच्या सुमारे १०% बचती मध्ये ठेवल्यास तुमच्या भविष्यातील गरजा भागविण्यासाठी एक उत्तम सोय होते. दुसरीकडे, श्रीमंत लोक प्रत्येक पगाराच्या २०% पेक्षा अधिक बचत करण्याचा ध्येय ठेवतात. तुम्हाला वाटेल की त्यांचा पगार वाढला असेल, परंतु इतरांप्रमाणे त्यांचाही पगार स्थिर असतो. पण त्याचं ध्येय सतत पैशाची बचत करण हेच असत.
३. ऑनलाईन पे करून पैसे वाचवा-
आपले खाते मोबाइल ॲप्सचा वापर करून नियमितपणे तपासा. एक बचत खाते खास बिलांची भरपाई जसे की, वीजबिल, पेपर, गॅस कनेक्शन, टीव्ही, मोबाईल बिल्स इत्यादी करण्यासाठी तयार करा. आणि याच बचत खात्यातून नियमित बिले भरवित. म्हणजे महिन्याच्या ठराविक खर्चाचा अंदाज येतो आणि इतर खर्चामध्ये नियमित व्यवहार व्यत्यय आणत नाहीत.
४. उधळपट्टी नको-
हातात फार पैसे नसताना सेलिब्रिटीज सारखं राहणीमान ठेऊन जीवन जगणं त्रासदायक ठरू शकते. श्रीमंत लोक सुरवातीपासूनच महागडे आणि उंची कपडे, चपला यांच्या मागे लागले असते तर ते कधीच श्रीमंती मिळवू शकले नसते. पैसे खर्च करणे ज्या ठिकाणी गरजेचे आहेत, त्या ठिकाणी खर्च करा उधळपट्टी न करता सर्व गरजा भागवून बराचसा भाग बचतीच्या खात्यात जाईल, अशी सावधगिरी बाळगा.
५. छंद जपा-
छंद जोपासण्यासाठी पैशाची गरज असतेच असे नाही. आनंद घेण्यासाठी छंद जपावा. श्रीमंती मिरवण्यासाठी नाही. महिन्यातून एखादी गाण्याची मैफिल काही क्षण आनंदित करतात आणि त्यासाठी लाखो रुपये खर्चाची गरज नाही. तेव्हा आपल्याला समृद्ध करणारे अनुभव मिळवण्यासाठी पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही.
६. कुपन्स किंवा पास-
खरे वाटणार नाही पण महिन्याचा एकदम पास किंवा जेवणाची कुपन असा एकदाचा खर्च तुमचे बरेच पैसे वाचवू शकतो. वारंवार वस्तू वापरात असू तर पैसे देण्यासाठी कूपनचा वापर करतात अशा प्रकारे खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर आपण पैसे वाचवू शकता. हाच वाचलेला पैसे बचत खात्यात अधिक संपत्ती तयार करण्यास मदत करते.
ह्या फक्त काही सवयी आहेत ज्या यशस्वी लोकांना पैसे वाचविण्यास आणि पैसे कमविण्यास मदत करत आल्या आहेत. सध्या सोप्या सवयी बाळगा आणि झटपट नाही पण दीर्घकाळासाठी श्रीमंत बनण्याचे मार्ग मोकळे करा.
काटकसर म्हणजे नक्की काय?, काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला? ,
बचत आणि आर्थिक शिस्तीचे ७ सोपे मार्ग , पगारच पुरत नाही…बचत कशी करू?
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.