Reading Time: 3 minutes

मागील भागात आपण पाहिले, आयकर कायदा कलम १४३(१) नुसार आयकर रिटर्न भरल्यानंतर त्याची आयकर विभागाकडून कम्प्युटर प्रोग्रॅमद्वारा तपासणी केली जाते व त्यासंबंधित सूचना करदात्याला पाठवली जाते. .

सूचनांमध्ये आपल्याकडून सादर केलेल्या परताव्याचे तपशील आणि आयकर विभागाकडे उपलब्ध असलेले तपशील यांच्यामध्ये काही फरक आढळला असल्यास त्यासंबंधीची नोंद असते.

जर करदात्यास यासंदर्भात कोणत्याही शंका असतील अथवा या सूचना मान्य असतील तर संबंधित सूचनांनुसार दुरुस्ती करून पुन्हा रिटर्न भरावा लागतो तसेच आकारण्यात आलेल्या कराची जादा रक्कम भरावी लागते.

दुरुस्त करता येण्यासारख्या चुका

  • आयकर रिटर्नमध्ये स्पष्ट चूक झाल्यास चुका सुधारण्यासाठी कलम १५४(१) च्या अंतर्गत विनंती अर्ज आयकर विभागाकडे सादर करावा लागतो.
  • बँक खाते अथवा पत्ता बदलला असल्यास त्याबद्दलची दुरुस्ती  करण्यासाठी कलम १५४(१)अंतर्गत विनंती करता येणार नाही.
  • या कलमाअंतर्गत-
    • गणिती चुका (an arithmetic mistake)अथवा छोट्या क्लेरिकल चुका
    • टायपिंग चुका
    • काही कायद्यातील तरतुदींमुळे होणाऱ्या चुका
    • परिस्थितीजन्य चुका (an error of fact)
    • उदाहरणार्थ
      • भांडवली नफ्यासंदर्भातील अतिरिक्त फायदे रिटर्न भरताना नमूद केलेले नसल्यास
      • टॅक्स क्रेडिटसंदर्भातील चुका
      • आगाऊ कराच्या रकमेबाबतच्या चुका  
      • फ़ॉर्म भरताना चुकीचे लिंग (gender ) भरले गेले असल्यास

दुरुस्ती कधी दाखल केली जाऊ शकते?

  • कलम १५४(१) अंतर्गत विनंती अर्ज केवळ ज्या रिटर्न्सची तपासणी प्रक्रिया (सीपीसी, बॅंगलोरमध्ये येथे) केली गेली आहे. अशाच रिटर्न्ससाठी दाखल केली जाऊ शकते.
  • चुका सुधारल्यामुळे जर उत्पन्नामध्ये बदल होत असेल तर दुरुस्तीसाठी विनंती करू नये. त्यासाठी रिव्हाईज रिटर्न दाखल करावा.
  • दुरुस्तीसाठीच्या विनंती अर्जात कोणतीही नवीन करवजावट अथवा करमाफी नमूद केलेली असल्यास ग्राह्य धरली जाणार नाही.
  • करदाता अथवा आयकर विभाग यापैकी कोणीही स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी दुरुस्ती अर्ज करू शकते.
  • जर रिटर्न ऑनलाईन भरलेले असतील तर दुरुस्ती अर्जही ऑनलाईन दाखल करावा लागेल.

ऑनलाईन दुरुस्ती (Rectification )करण्याची पद्धत

१. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे.

२. नंतर ई- फाईल (E- file ) हा पर्याय निवडावा

 ३. ज्या  असेसमेंट इअरसाठी दुरुस्ती करायची आहे ते निवडून त्यामध्ये ‘सीपीसी बँगलोर’कडून मिळालेल्या ऑर्डरवर नमूद केलेला रेफरन्स नंबर एंटर करावा. जर एकापेक्षा जास्त ऑर्डर नंबर असतील तर नवीन (latest )नंबर एंटर करावा.  validate या पर्यायावर क्लिक करावे.

४. त्यानंतर करदात्याने दुरुस्ती करणानुसार  “दुरुस्ती विनंती प्रकार” (‘Rectification Request Type) निवडावा.  यामध्ये करदाता जास्तीत जास्त १० पर्याय निवडू शकतो.

  • करदाता टॅक्स क्रेडिट संदर्भात दुरुस्ती करत असल्यास Tax Credit mismatch only’ हा पर्याय निवडावा. हा पर्याय निवडल्यावर मॅच बॉक्स मध्ये ३ चेकबॉक्स दिसतील
  • करपात्र उतपन्नाचे स्रोत (Tax Collected at Source ),  करवजावट (TDS) आणि रिटर्नमध्ये नमूद केलेला आयकर (Income Tax). यापैकी जिथे दुरुस्ती आवश्यक आहे तो पर्याय निवडावा.

  • करदात्याने दुरुस्तीचे कारण रिटर्नमध्ये बदल करण्यासाठी योग्य त्या कारणाचा पर्याय निवडावा. यासाठी XML अपलोड करावे लागेल. यामध्ये करदाता जास्तीत जास्त चार पर्याय निवडू शकतो.

  • करदाता टॅक्स क्रेडिट मिसमॅच अथवा टॅक्स / व्याज मिसमॅच हा पर्यायही निवडू शकतो. याशिवाय रिप्रोसेसिंगची गरज असल्यास तो पर्यायही करदाता निवडू शकतो.

५. शेवटी submit पर्यायावर क्लिक करून दुरुस्ती विनंती सादर करावी. यानंतर टीडीएस (TDS ) एंट्रीसाठी फॉर्म २६एएस (26AS) नुसार एक पॉप अप समोर दिसेल. त्यावर असणाऱ्या ‘Ok’ या पर्यायावर क्लिक करावे.

६. फॉर्म सबमिट झाल्यानंतर रेफरन्स नंबर मिळतो आणि फॉर्म सीपीसी बँगलोर येथे पाठवला जातो. दुरुस्ती विनंती अर्जाची  (Rectification Request) प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कलम १५४ नुसार दुरुस्ती ऑर्डर जारी केली जाते.

अशाप्रकारे घरबसल्या कलम १५४(१) अंतर्गत दुरुस्तीसाठी विनंती अर्ज दाखल करता येतो. 

विविध आयकर नोटीस आणि  त्यांचे अर्थ,

आयकर खात्याचे हेल्पलाईन नंबर,

इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.