हे ३० पासवर्ड्स चुकूनही वापरू नका
डिजिटल दुनियेमध्ये पासवर्ड (Password) अत्यंत महत्वाचा असतो. पासवर्ड कुठला ठेवावा यापेक्षा पासवर्ड कुठला वापरू नये हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत इंटरनेट म्हणजे आजच्या काळातील एक मूलभूत गरज झाली आहे. सोशल मीडिया असो वा ऑनलाईन व्यवहार, इ-मेल वापरणे असो किंवा शॉपिंग वा मनोरंजनाची वेबसाईट इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
सिम स्वॅप फ्रॅाड – सुरक्षिततेचे उपाय
आजच्या डिजिटलायझेशनच्या जमान्यात अगदी वाणसामानापासून (grocery) महागड्या दागिन्यांपर्यत प्रत्येक गोष्ट ऑनलाईन खरेदी करणे सहज शक्य झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक ना हजार वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहे. नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.
- डिजिटलाझेशनसोबत सायबर क्राईमची संख्याही वाढू लागली आहे. अनेकदा पासवर्ड ‘हॅक’ करून तुमच्या अकाऊंटला लॉग-इन करून तुमची गोपनीय माहिती मिळविली जाते. म्हणूनच पासवर्ड निवडताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
- आजकाल बहुतांश इंटरनेट अकाउंट्सना पासवर्ड सेट करताना काही नियमांचे पालन करावे लागते. त्यामध्ये प्रामुख्याने किमान अल्फा न्यूमरिक पासवर्ड ठेवावा लागतो. तसेच त्यामध्ये एक कॅपिटल लेटर व एक सिम्बॉल (सांकेतिक चिन्ह) वापरावे लागते.
- “सतराशे साठ अकाउंट्सचे पासवर्ड लक्षात कसे ठेवणार?” त्यामुळे जे सहज सोपं लक्षात राहण्यासारखं आहे तेच शब्द पासवर्ड म्हणून ठेवले जातात. अनेकांना स्वतःचे, जोडीदाराचे, मुलांचे अथवा कोणत्याही निकटच्या व्यक्तीचे नाव पासवर्ड म्हणून ठेवायची सवय असते.
- परंतु हे चुकूनही करू नका. तुमच्या महत्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स तुम्ही अनेक ठिकाणी देत असता. त्यामुळे यावरून तुमच्या निकटवर्तीयांचे नाव शोधणे हे फारसे कठीण नसते. त्यामुळे स्वतःच्या अथवा निकटवर्तीयांच्या नावाचा पासवर्ड चुकूनही ठेवू नका.
- अनेकांना ‘Password’ हा शब्दच पासवर्ड म्हणून ठेवायची सवय असते. पण हे अत्यंत चुकीचे आहे. हॅकर हा पासवर्ड सहज हॅक करू शकतात.
इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १
- वेगवेगळ्या इ -मेल अकाउंट्सचे पासवर्ड लक्षात ठेवणे ही तशी कठीण गोष्ट आहे. यासाठी गुगलची पासवर्ड मॅनेजर सुविधा वापरा. यामध्ये गुगल तुमचे पासवर्ड स्टोअर करून ठेवते. यासाठी तुम्हाला फक्त एक पासवर्ड लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
- काही वेबसाईट पासवर्डऐवजी ‘ओटीपी’ची सुविधा देतात. शक्य असल्यास या पर्यायाचा वापर करा.
- तथापि अनेक बँकिंग वेबसाईट ठराविक कालावधीनंतर पासवर्ड बदलायला सांगतात. अनेकजण पासवर्ड बदलताना जुन्या पासवर्डच्या अक्षरांमध्ये बदल करून व त्यात काही आकडे लिहून तोच पासवर्ड पुन्हा वापरतात. हा पासवर्ड बदलण्याचा अगदी चुकीचा मार्ग आहे. याने काही फारसा फरक पडत नाही फक्त पासवर्ड बदलला जातो व पूर्वीचा पासवर्ड अगदीच कमी लांबीचा असेल तर ‘लॉग इन’ पेजवर पासवर्ड वीक (Weak) ऐवजी स्ट्रॉंग (Strong) दिसतं एवढंच.
खालील पासवर्ड कधीही वापरू नका
sr. no | PASSWORD |
1 | password |
2 | password 1 |
3 | 12345 |
4 | 123456 |
5 | 1234567 |
6 | 12345678 |
7 | 1234567890 |
8 | 98765431 |
9 | 121212 |
10 | 11111111 |
11 | abc123 |
12 | abcdefghijkl |
13 | qwerty |
14 | qwerty123 |
15 | football |
16 | princess |
17 | login |
18 | welcome |
19 | solo |
20 | admin |
21 | flower |
22 | dragon |
23 | sunshine |
24 | Incorrect |
25 | loveme |
26 | monkey |
27 | superman |
28 | iloveyou |
29 | hottie |
30 | master |
इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग २
पासवर्ड वापरासाठी महत्वाच्या टिप्स:
- पासवर्डमध्ये किमान १२ कॅरेक्टर्स असावीत. यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, सांकेतिक चिन्ह (symbol) व आकड्यांचे कॉम्बिनेशन असावे. तुमचापासवर्ड ‘कॉप्लेक्स’ म्हणजे सहजी ओळखता येणार नाही असा असावा.
- वैयक्तिक किंवा कोणतीही माहिती देणारे शब्द किंवा सर्वसामान्य वापरातले शब्द कधीही वापरा नका.
- वेगवेगळ्या लॉग इन साठी एकच पासवर्ड वापरणं टाळा.
- डिक्शनरी मधले शब्द पासवर्ड म्हणून अजिबात ठेवू नका. कारण असे शब्द शोधणं अजिबात कठीण नसतं. जर एखाद्या शब्दाने ‘लॉग इन’ झाले नाही तर हॅकर्स ‘डिक्शनरी हॅकिंग टूल’ किंवा ‘पासवर्ड गेसिंग टुल’ वापरून तुमचा पासवर्ड सहज हॅक करू शकतात.
- उदा. Dog या शब्दासाठी-
-
- Dog
- Dogs
- Dog1
- Dog2
- Dog3
- Dog4
- Dogma
- Dogmatic
- Dogmatized
- Dogcatcher
- Dogcatchers
- Dogberry
- Dogberries
- असे अनेक शब्द ‘डिक्शनरी टूल’ सुचवते.त्यामुळे डिक्शनरीतले शब्द वापरणे टाळा.
इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग ३
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये दिलेल्या उदाहरणांवरून ‘स्ट्रॉंग’ पासवर्ड कसा ठेवायचा याचा तुम्हाला अंदाज येईल.
OK Passwords | Better Passwords | Excellent Passwords |
kitkat | 1Kitkat | 1Ki7tKa7t |
sushant | Sushant88 | .sushant88 |
jellyfish | jelly99fish | jelly99fi$h |
usha | !usha | !ush3a |
ilovemyPet | !LoveMyPet | !Lov3MyPet |
MyLogin | MyLogin17 | MyLogin!7 |
आपला पासवर्ड सेट करणं हे आपल्या हातात असतं. पासवर्ड सेट करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जाता जाता एक गमतीदार निरीक्षण –
- भारतामध्ये बहुतांश लोकांचे पासवर्ड दोन गोष्टींवर आधारित असतात- ‘Love’ & ‘Luck’.
- पासवर्ड सेट करताना दोन गोष्टींना अचानक महत्व प्राप्त होते – ‘आठवण’ आणि ‘अध्यात्म’
Research says; Only 10% of the Lovers become Spouses Rest Become Passwords…….
For suggestions and queries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies