डिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात. मागील भागात आपण पाच महत्वाच्या डिजिटल वॉलेट्सची माहिती घेतली. या भागात अजून काही डिजिटल वॉलेट्सबद्दल माहिती घेऊया.
भारतात वापरली जाणारी डिजिटल वॉलेट्स – भाग १
६. भीम ॲप
- हे अँप वापरण्यासाठी ‘आरबीआय’कडून मान्यता मिळाली आहे, तसेच ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन’ कडून लाँच करण्यात आले आहे.
- हे ‘युपीआय’ वर आधारित असणारे लोकप्रिय डिजिटल वॉलेट आहे ज्याद्वारे क्यूआर स्कॅन वापरून आर्थिक व्यवहार केले जातात.
- भीम अँप देशातील बँकांच्या खात्यांशी जोडता येते व महत्वाची गोष्ट म्हणजे ‘व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस‘ वापरून तुम्ही पैसे पाठवू शकता किंवा मिळवू शकता.
- यासाठी तुमच्या खात्याची सगळी माहिती देण्याची गरज लागत नाही. भारताला कॅशलेस अर्थव्यवस्था बनवण्यासाठी भीम ॲपने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
७. वोडाफोन एम -पैसा
- अलीकडच्या काळात एम-पैसा हे ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे. याद्वारे मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज,पैसे पाठवणे किंवा मिळवणे यासारखे व्यवहार होऊ शकतात.
- इतर डिजिटल वॉलेट पेक्षा हे ॲप वेगळी सेवा देते .जेव्हा एम -पैसा वॉलेट मध्ये पैसे येतील तेव्हा ते एम-पैसा आउटलेट मधून काढता येतात. ही सेवा १,२०,०००ओउटलेट्सना देण्यात आली आहे.
- एम -पैसा ॲप प्रत्येक व्यवहारावर सध्या कॅशबॅक देते. जर तुम्हाला एम -पैसा ॲपद्वारे पैसे पाठवायचे असतील, तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि पूढे ४ अंकी गुप्त कोडे प्रविष्ट करा, संबंधित व्यक्तीला पैसे मिळाले की त्या व्यक्तीला ‘एसएमएस’द्वारे जवळच्या एम-पैसा आउटलेटमधून पैसे काढण्यासाठी आय-डी प्रूफ असणे आवश्यक आहे. . या डिजिटल वॉलेटद्वारे तुम्ही सुरक्षित व जलद व्यवहार करू शकता.
- वोडाफोन एम -पैसा वापरण्यासाठी संपूर्ण केवायसी असणे आवश्यक आहे.
कॅश – लेसकॅश ते कॅशलेस
८. एअरटेल पेमेंट बँक
- भारती एअरटेल ही कम्युनिकेन क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. एअरटेल पेमेंट्स बँक ही भारती एअरटेलची सहाय्यक कंपनी आहे. आरबीआयकडून मान्यता मिळवणारी ही पहिली कंपनी आहे,ही कंपनी भारती एअरटेल लिमिटेड आणि कोटक महिंद्रा बँक लि. यांनी संयुक्तपणे चालू केली असून कोटक महिंद्राचे यातील भाग-भांडवल सुमारे १९.९%एवढे आहे.
- एअरटेल पेमेंट्स बँक अॅपचे वापरकर्ते सहजपणे प्रीपेड किंवा पोस्टपेड मोबाईल रिचार्ज करू शकतात. तसेच तुमच्या एअरटेल डिजिटल वॉलेटमध्ये पैसे भरले, तर तुम्ही ऑनलाईन खरेदीसुद्धा करू शकता. सुरक्षेच्या कारणास्तव हे डिजिटल अँप वापरताना ४अंकी गुप्त कोड असणे आवश्यक आहे.
९. ओला-मनी
- ‘ओला’ हे भारतातील वेगवान चालणाऱ्या स्टार्टअपपैकी एक आहे. २०१५ सालापासून याचा वापर वाढला आहे.ओला हे असे ॲप आहे ज्याद्वारे आपण प्रवासासाठी लागणारी कार किंवा गाडी बुक करतो हे आपल्याला माहित आहेच.
- नुकतेच ‘ओला मनी ॲप’ हे ओलाचे डिजिटल ॲपसुद्धा आलं आहे, याद्वारे कॅशलेस प्रवास, विमान तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग, किराणा सामानाची ऑनलाईन खरेदी अशा गोष्टींचे व्यवहार करता येतात.
- ओला मनी वॉलेट मधून पैसेही पाठवले जाऊ शकतात.
१०. जिओ -मनी
- ‘जिओ -मनी’ या डिजिटल ॲपचा वापर व वैशिष्ट्ये इतर डिजिटल वॉलेट प्रमाणेच आहेत. जिओ-मनी वरून व्यवहार करण्यासाठी दोन प्रकारची खाती देण्यात येतात.
- एक ज्याद्वारे १०,०००/- पर्यंत व्यवहार केले जातात व दुसऱ्या प्रकारच्या खात्यातून महिन्याला १,००,०००/- पर्यंतचे व्यवहार करता येतात.
- जिओकडून कुठलेही व्यवहार शुल्क आकारले जात नाही. अलीकडे, जिओ-मनी ने सुमारे ५०,००० ई-कॉमर्स वेबसाइट्स सोबत करार केला आहे. ऑनलाईन खरेदी व इतर ऑनलाईन व्यवहारांसाठी हे अँप योग्य आहे.
आपल्या आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?
११. विविध बँकिंग ॲप
- बँकाकडूनही काही डिजिटल वॉलेट्स लॉन्च करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने “एसबीआय बडी” हे डिजिटल वॉलेट सुरू केले आहे.
- आयसीआयसीआय बँकेने “आयसीआयसीआय पॉकेट्स” हे डिजिटल वॉलेट आणलं आहे.
- “लाईम मोबाइल वॉलेट” हे ॲक्सिस बँकेकडून सुरू करण्यात आले आहे.
- सिटी बँकेने “सिटी मास्टरपास” नावाचं डिजिटल वॉलेट सुरु केले आहे.
- “पे झ्याप (Payzapp)” हे ॲप एडीएफसी बँकेतर्फे लॉन्च करण्यात आलं आहे.
या प्रत्येक डिजिटल वॉलेट्सच्या आर्थिक व्यवहाराच्या ठराविक मर्यादांनुसार आपण सुरक्षितरित्या व्यवहार किंवा पेमेंट्स सोप्या आणि जलदगतीने करू करू शकतो.
टीम अर्थसाक्षरतर्फे सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/