Reading Time: 3 minutes

‘बीएसएनएल’ आणि ‘एमटीएनएल’ भारतातल्या दूरसंचार क्षेत्रातल्या सर्वात जुन्या कंपन्या. बीएसएनएलचे जाळे तर भारतातल्या गावागावात विस्तारलेले. सरकारी दूरसंचार क्षेत्रातल्या २ लाख पेक्षा जास्त कर्मचारी वर्गाने आजतागायत अतिशय मेहनत घेऊन आपले जे विस्तृत जाळे विणले, त्याने दूर दूरच्या लोकांना काही क्षणात एकमेकांच्या संपर्कात आणले. बीएसएनएलला 4G स्पेक्ट्रम मिळाले असते, तर आणखी मोठी झेप घेता आली असती. 

तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

दूरसंचार क्षेत्रातल्या या क्रांतीमध्ये सर्व कर्मचारी वर्गाचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. २५-३० वर्ष सेवा  करून आता ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे, त्यांच्यासाठी सेवाकाळ नक्कीच अभिमानास्पद राहिला. जर आपण आपल्या सेवाकाळाचा आढावा घेतला, तर लक्षात येईल की, गेल्या २५-३० वर्षात दूरसंचार क्षेत्राने किती प्रगती केली आणि त्या प्रगतीतील वेळोवेळी आपण केलेले योगदान आपल्याला निश्चितच खूप समाधान देऊन जाईल. 

आयुष्याचा आता नवीन टप्प्यावर आपणापैकी बऱ्याच जणांनी नक्कीच काहींना काही योजना आखल्या असतीलच. आयुष्याचा हा नवीन टप्पा अधिक आनंददायी करण्यासाठी आपण काय करू शकतो याचा आपण विचार करूया. 

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

  • “नोकरीत असेपर्यंत आपल्याला मिळत असलेले नियमित उत्पन्न म्हणजे आपला पगार, त्याचबरोबर आपल्या वैद्यकीय खर्चांसाठी कंपनीकडून आरोग्य विमाचे कवच होते. २-३ वर्षात कधी बाहेरगावी फिरायला जायचे, तर कंपनीकडून प्रवास भत्ता (LTC) मिळत होता. म्हणजेच नोकरीत असेपर्यंत आपले सक्रिय उत्पन्न व काही सेवा सुविधा आपल्याला मिळत होत्या.
  • निवृत्तीनंतर आपल्याला मिळणारे निवृत्तीवेतन आणि आतापर्यंत साठविलेल्या आपल्या बचतीवर आपल्या निवृत्तिजीवनाचे नियोजन करायचे आहे.  त्यासाठी आपण सर्व गुंतवणूक पर्यायांचा अभ्यास करून आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य पर्यायांचे संयोजन करायला हवे.” 
  • पोस्टाच्या योजना, प्रधानमंत्री वयोवंदन योजना, कर्जरोखे, कंपनी एफडी , म्युच्युअल फंड, शेयर बाजारातील समभाग असे निरनिराळे उत्तम पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. दीर्घ अनुभवी आर्थिक सल्लागाराकडून आपले निवृत्ती नियोजन करून घ्या.
  • साधारण ५ ते ६ महिन्याच्या पेन्शन इतका आकस्मिक निधी जो आपल्या बँकेच्या बचत खात्यात  कायम असावा, कोणत्याही आणीबाणी खर्चांसाठी योग्य अशी तरलता त्यात राहील.

चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन

  • उतारवयातील आजारपणाची तरतूद म्हणून आपण योग्य रकमेचा आरोग्यविमा घेणं अत्यावश्यक आहे. हल्ली तर मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्यानाही आरोग्य विमाचे कवच मिळते. उरलेल्या निधीतून काही रक्कम म्युच्युअल फंड आणि उच्च प्रतीच्या कंपन्यांच्या शेयर्स मध्ये गुंतवावी. हे दोन असे पर्याय आहेत जे आपल्याला दीर्घावधीमध्ये महागाईवर मात करणारा परतावा देतात. 
  • पेन्शनच्या जोडीला म्युच्युअल फंडाच्या हायब्रीड कॅटेगरी योजनांमधून ‘एसडब्लूपी’च्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवू शकता
  • आपला भारत देश जसजसा आर्थिक महासत्ता होईल, त्याप्रमाणे पुढील काही वर्षात व्याजदर हे आणखी खाली जातील त्यामुळे आपण काही गुंतवणूक म्युच्युअल फंड आणि शेयर्समध्ये करावी, कारण ह्या पर्यायांमध्ये अधिक जास्त परतावा देण्याची क्षमता असते. मात्र आपल्या अनुभवी आर्थिक सल्लागाराशी आपल्या जोखीमांकाची तपासणी करूनच योग्य अशा म्युच्युअल फंड योजनांची निवड करावी. 
  • म्युच्युअल फंड आपल्याला तब्बल ३६ प्रकारच्या योजना उपलब्ध करतात. कोणत्याही गुंतवणूक पर्यायांची निवड करताना तरलता आणि जोखीम याचा पूर्ण अभ्यास करावा. काळजीपूर्वक निवृत्तनियोजन केल्यास आपल्याला तणावमुक्त आयुष्य जगता येईल. 

निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना

  • आपल्या दैनंदिन जीवनात आपण जितके व्यस्त राहू तितके आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. आपल्या आवडीच्या नवीन कामाला वेळ द्या. नवीन कामातून पैसे किती मिळतात ह्यापेक्षा त्या कामातून आपल्याला आनंद किती मिळतो, ह्याला जास्त महत्व द्या. 
  • रोज किमान ५ पाने वाचन आणि किमान ५ किलोमीटर चालण्याचा संकल्प करा. आपल्या जवळच्या बागेत किंवा मैदानात पहाटे किंवा सायंकाळी नित्यनेमाने जा. अशा ठिकाणी आपल्याला नक्कीच एखाद्या जेष्ठ नागरिक संघाचे सभासद होण्याची संधी मिळेल. 
  • जेष्ठ नागरिक संघ म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याची उत्तम निगा राखण्याची संधी. तिथले निरनिराळे उपक्रम, गप्पा, व्यायाम, सहली ह्या सर्व गोष्टी आपल्याला कोणत्याही तणावापासून दूर ठेवतात. 
  • ज्यांना आपली गाण्याची हौस भागवायची आहे, त्यांच्यासाठी काही ठिकाणी ‘कराओके’ संगीताची सोय असते. नोकरीत असताना आपण आपल्या मुलांना हवा तसा वेळ देऊ शकलो नाही, आता आपण त्यांना जास्त वेळ देऊ शकू, मात्र जनरेशन गॅप न ठेवता मुलांच्या आवडीनिवडी सांभाळल्या, तर आपण जास्त आनंद मिळवू शकतो.  

गेल्या २-३ दशकांच्या दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीने झालेल्या भारताच्या आर्थिक प्रगतीतील तुमच्या महत्वपूर्ण योगदानाचा अभिमान बाळगा, योग्य तणावमुक्त आर्थिक नियोजन करा आणि आपल्या आयुष्याच्या नवीन टप्प्याचा मनमुराद आनंद घ्या. 

निवृत्ती नियोजनासाठी एक्सेल कॅल्क्युलेटर

आनंददायी निवृत्ती जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !!

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

– निलेश तावडे

9324543832 

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.