Reading Time: 2 minutes
आर्थिक सर्वेक्षण अहवाल:
आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत ३१ जानेवारी २०२० रोजी मांडण्यात आला. यामध्ये अर्थव्यवस्थेसंबंधी विविध आकडेवारी मांडण्यात आली आहे.
Budget 2020 : देशाचा आर्थिक सर्व्हे म्हणजे काय?
- २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ६ ते ६.५% राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- सरकारने चालू वित्तवर्षासाठी म्हणजे आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी दर ५% राहील असा अंदाज वर्तवला आहे. पुढील वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये तो ६ ते ६.५ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज मांडण्यात आला आहे.
यावर्षीचा आर्थिक सर्वेक्षण डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : आर्थिक सर्वेक्षण २०१९-२०
अर्थसंकल्पाचा (बजेटचा) इतिहास
आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२० मधील ठळक मुद्दे:
- आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, दिल्लीमध्ये नवीन रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी ३६ परवानग्या लागतात. यापेक्षा कमी परवानग्या बंदुकीच्या परवाना मिळवताना गरजेच्या असतात.
- परदेशी पर्यटकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढले असून, हा आकडा २०१५ मध्ये ४.४५ लाख प्रवाश्यांवरून २३.६९ लाखांपर्यंत २०१८ पर्यंत पोहोचला आहे.
- आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, २०१४ पासून महागाईच्या दरात सातत्याने घट होत आहे. महागाईचा दर एप्रिल २०१९ मध्ये ३.२ टक्के होता. डिसेंबरमध्ये तो २.६ टक्क्यांवर आला आहे.
- कच्च्या तेलाचे दर कमी राहिल्याचा देशाला फायदा झाला आहे.
- २०१९-२० या वित्तवर्षातील दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासाची गती वाढली. त्यासाठी प्रमुख १० क्षेत्रांचे योगदान मोठे आहे.
- देशाच्या आर्थिक विकासावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी २०२० ते २०२५ या काळात पायाभूत विकास क्षेत्रावर १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज आहे, असेही आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
- देशाला आर्थिक विकासात मोठी प्रगती करायची असेल, तर कुशल बँकिंग क्षेत्राची आवश्यकता आहे.
- ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे ध्येय गाठण्यासाठी देशातील व्यापार धोरणाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
- ‘एसेम्बल इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या योजनेला ‘मेक इन इंडिया’ या योजनेशी जोडावे लागेल, अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे. यामुळे जगातील निर्यात क्षेत्रातील भागीदारी २०२५ पर्यंत ३.५ टक्क्यांवर तर २०३० पर्यंत ६ टक्क्यांवर जाईल, अशी आशा वर्तवण्यात आली आहे.
- ‘एसेम्बल इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या योजनेमुळे साल 2025 पर्यंत उत्तम रोजगाराच्या ४ कोटी व साल २०३० पर्यंत ८ कोटी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
- सरकारी कर्जमाफी योजनांमुळे वित्त बाजारावर चुकीचा परिणाम होऊन खऱ्या लाभार्थ्यांना वित्त पुरवठा होत नाही.
- भारताची राखीव परकीय चलन गंगाजळी ४६१.२१ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
- शाळा सोडण्याचे जास्त प्रमाण व न परवडणारे उच्च शिक्षण यावर सर्वेक्षणात चिंता दर्शवली आहे.
- स्थानिक उद्योजकता वाढीसाठी शिक्षणाचा संबंध सर्वेक्षणात जोडला आहे. भारताच्या पूर्वभागात शिक्षणाचा दर केवळ ५९.६% असल्याने उद्यमशीलतासुद्धा कमी असल्याचे म्हंटले आहे.
- आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी सरकारने त्वरीत सुधारणा करायला हव्यात, असे या आर्थिक सर्वेक्षण अहवालात सुचवले आहे.
घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/
Share this article on :