Budget 2020 : देशाचा आर्थिक सर्व्हे म्हणजे काय?

Reading Time: < 1 minute

आर्थिक सर्व्ह :

  • आर्थिक सर्व्हेक्षण हा अर्थ मंत्रालयाचा महत्वाचा अहवाल आहे व अर्थव्यवस्थेचा अधिकृत अहवाल समजला जातो. 
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा सर्व्हे दोन्ही सभागृहात सादर केला जातो.

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?

समाविष्ट बाबी :

  • मागील १२ महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा आढावा 
  • मुख्य विकास कार्यक्रमांचा आढावा 
  • विकास दराचा अंदाजही लावण्यात येतो. अर्थव्यवस्थेचा वेग मंदावणे किंवा वाढण्याची कारणंही सर्व्हेमध्ये सांगितली जातात. 
  • आर्थिक सर्व्हेमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं, त्यांना सामोरे जाण्यास उचलायची पावले विस्ताराने सांगितली जातात. 
  • गेल्या आर्थिक वर्षातील घटनाक्रमाचा आर्थिक सर्व्हेमध्ये अभ्यास केला जातो.
  • आर्थिक वर्षामध्ये सरकारच्या विकास योजनांचा काय परिणाम झाला, याचा सारांश सर्व्हेमध्ये सांगण्यात येतो.

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?

आर्थिक सर्वेक्षण कोण तयार करतं?

अर्थ मंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांसोबत आर्थिक तज्ञांच्या टीमकडून आर्थिक सर्व्हे केला जातो. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी यावर्षीचा आर्थिक सर्व्हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सादर केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच अर्थमंत्र्यांनी आर्थिक सर्व्हे संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे सादर केला.

Budget 2020 : सर्वेक्षण अहवालातील महत्वाच्या १५ गोष्टी

Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या १० खास गोष्टी

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *