Reading Time: 3 minutes

आयुष्यात प्रत्येकवेळी वाटेवर  गुलाबाच्या पाकळ्याच येतील असा नाही,असे बरेच प्रसंग येतात जिथे कसून प्रयत्न करावे लागतात. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या वाटेला कसलंही दुःख येऊ नये असं प्रत्येक पालकाला वाटणे अगदी साहजिक आहे.

  • सध्याचा  पालक वर्ग मुलांना चांगले शिक्षण,  चांगली जीवनशैली मिळावी म्हणून झटत असतो. कधी मुलांचे हट्ट पुरवावे लागतात, तर कधी त्यांच्या शाळेच्या आणि क्लासेसच्या फीज  भराव्या लागतात. एकदा मुलं मोठी झाली की या ना त्या कारणाने पैसा लागतच असतो. मग अशा वेळी सगळा आर्थिक भार त्या पालकांवर पडलेला असतो. 
  • आई आणि वडील दोघेही नोकरी करत असली, तरी वाढत्या शैक्षणिक आणि इतर खर्चामुळे व ऐनवेळी लागणाऱ्या पैशांमुळे पालकवर्ग गोंधळून जातो.  
  • शिक्षणासोबतच सणवार, वाढदिवस साजरे करणे ,हल्लीच्या पद्धतीप्रमाणे पार्ट्या वगैरे गोष्टी आपण आपल्या मुलाच्या आनंदासाठी करत असतो. 
  • मुलांचा हट्ट किंवा हौस म्हणून सुद्धा या गोष्टींची पालकांसमोर खूप मोठी यादी असते. ती यादी आणि आपलं बजेट या दोन गोष्टीचा समतोल साधावा लागतो.  
  • योग्य नियोजन केल्यास या गोष्टीसुद्धा कुठल्याही आर्थिक भाराशिवाय आनंदाने पेलता येऊ शकतात या लेखामध्ये आपण आपल्या पाल्याच्या भविष्याचं आर्थिक नियोजन कस करू शकतो, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. 

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १

मुलांचे  शिक्षण, करिअर आणि लग्न-

आपल्या मुलांचे  शिक्षण, करिअर आणि लग्न याविषयी प्रत्येक पालकांची काही स्वप्ने असतात. त्यानुसार सगळं काही व्हावं असंही वाटत असतं. यात काही चूक नाही,  पण त्यासाठी नियोजन हवं. आता हे सर्व नियोजन कसं करायचं हे आपण काही उदाहरणांद्वारे लक्षात घेऊ.

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २

उदाहरण १- 

  • श्री देसाई यांचा मुलगा आता ३ वर्षांचा आहे. साधारण पुढच्या १५ वर्षानंतर तो पदवी अभ्यासक्रम पूर्ण करेल. 
  • देसाई यांना वाटत त्यांच्या मुलाने इंजिनियर व्हावे. इंजिनीरिंगमध्ये पदवी घेण्यासाठी सध्याचा खर्च ५ लाख एवढा आहे. तर, त्याच्या शिक्षणासाठी श्री देसाई यांना १५ वर्षांनंतर साधारण किती पैसे लागतील?  
  • आता येणारा ५ लाख रुपये एवढा खर्च, महागाईमुळे १५ वर्षांनी तो २०.८८ लाख एवढा येईल.
  • याच वर्षीपासून गुंतवणूक चालू केली आणि दर महिना १२% व्याजदर पकडले, तर श्री देसाई यांना प्रत्येक महिन्यात ४१८०/- गुंतवावे लागतील; पण जर गुंतवणुकीसाठी ५ वर्ष जरी उशीर केला, तर प्रत्येक महिना डबल म्हणजे प्रत्येक महिन्यात साधारण ९,०७९/- एवढी गुंतवणूक करावी लागेल .
मुलाचे वय  ३ वर्ष
सध्याचा शैक्षणिक खर्च  रु. ५ लाख
पदवी मिळण्यासाठी लागणारा काळ  १५ वर्षे
महागाईचा वार्षिक दर  १०%
१५ वर्षांनंतर येणार शैक्षणिक खर्च  रु. २०.८८ लाख 
श्री देसाई  यांना महिना गुंतवावी लागणारी रक्कम  रु. ४,१८० 

 

मुलांना अर्थसाक्षर कसे बनवाल?

उदाहरण २

  • सौ .जोशी यांना २ वर्षांची मुलगी आहे. पुढच्या २२ वर्षात मुलीचे लग्न करता येईल यासाठी त्यांनी काही रक्कम जमा केली आहे. 
  • सध्या त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्या मुलीच्या लग्नासाठी रु. ३ लाख खर्च करू इच्छितात, तर २२ वर्षांनी होणाऱ्या खर्चासाठी त्यांना सध्या महिना किती पैसे गुंतवावे लागतील ?
  • सौ. जोशी या सध्याच्या काळात त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ३ लाख खर्च करू इच्छितात. वाढत्या महागाईचा विचार केला, तर पुढच्या २२ वर्षात हा खर्च १३,२०,०००/- एवढा होऊ शकतो. यानुसार मासिक १२% दराने,सौ जोशी यांना प्रति महिना ९,५१६ रुपये एवढी गुंतवणूक करावी लागेल. आणि गुंतवणुकीसाठी ५वर्ष उशीर केला तर,प्रति महिना १८,४६४ रुपये गुंतवावे लागतील. 
मुलीचे वय २ वर्ष
सध्याचा लग्नाचा खर्च रु. ३ लाख
लग्नासाठीचा वेळ २२ वर्षे
महागाईचा वार्षिक दर १०%
२२ वर्षांनंतर येणारा लग्नाचा खर्च  रु.१३.२० लाख 
सौ जोशी यांना करावी लागणारी मासिक गुंतवणूक  रु. ५,००० 

 

मुलांना आर्थिक नियोजन शिकवणारे ‘किड्स सेव्हिंग अकाउंट’

  • मुलांच्या भविष्यासाठी तरतूद म्हणून गुंतवणूक करताना योग्य पर्यायांची निवड करणे ही बदलत्या आणि महागाईच्या काळाची गरज आहे. जेणेकरून आपला सुधारित पोर्टफोलिओ मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करू शकेल. 
  • हल्ली आपण पाहिलं तर, गुंतवणुकीवर बँकांचे व्याजदर पहिल्यापेक्षा खूप कमी झाले आहेत. यामुळे आपल्या खात्यातील गुंतवणुकीवर फारसे उत्त्पन्न मिळणार नाही, हे लक्षात घेऊन पुढील काही वर्षात आपली आर्थिक धये गाठण्यासाठी पुरेशी जमापुंजी असणे आवश्यक आहे. 
  • शेअर बाजारात वारंवार येणाऱ्या अस्थिरतेमुळे अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास कचरत आहेत. शेअर बाजार हा पर्याय जरी वगळला तरी गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना ईक्विटी, ईटीएफ गोल्ड, मालमत्ता खरेदी या पर्यायांचा विचार करून तुम्ही आर्थिक नियोजन करू शकता.
  • मालमत्ता खरेदी हा इथे योग्य पर्याय असू शकतो कारण वाढत्या महागाईचा विचार करून आता कमी असलेले जागेचे भाव भविष्यात नक्की वाढू शकतील.यातूनच पुरेसा पैसा तयार होऊन मुलांच्या भविष्याची आपण ठरवलेली आर्थिक उद्दिष्ट्ये नक्कीच साध्य होऊ शकतील.
  • जर तुमची मुलं लहान आहेत किंवा तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी १० वर्षांपेक्षा जास्त वेळ आहे तर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये काही समभागांद्वारे गुंतवणूक करू शकता, मात्र त्यासाठी योग्य स्टॉक निवड निवडीचे सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे. अन्यथा इतर गुंतवणूकदारांसाठी इक्विटी संबंधित म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून इक्विटी मार्केटमधील संधींचा फायदा घेऊ शकतात. 
  • पुरेसा वेळ हातात असल्यास पोर्टफोलिओमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करता येतात मात्र ३-१० वर्षांचाच वेळ असेल तर गुंतवणूक करताना पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि कर्जांच्या साधनांचा विचार करू शकता. यामध्ये उत्पादनाची योग्य रक्कम शिल्लक ठेवण्यासाठी विभाजन करताना इक्विटीचे प्रमाण ४०-५०% असू शकते तर १०-१५% सोन्याचे असू शकते. 
  • आपल्याकडे फक्त ३ वर्षाचा वेळ असेल, तर अशा परिस्थितीत १००% जोखीम घेणे भाग पडते. अशा वेळी इक्विटी किंवा सोने खरेदी सारखे पर्याय कमी येत नाहीत. मग कर्ज घेणे हा एकच पर्याय उरतो. यानुसार पोर्टफोलिओमध्ये आवश्यक असणारे बदल करून घ्यावेत. म्हणूनच आपल्या मुलांच्या सुरक्षित आणि आनंददायी भविष्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य गुंतवणुकीचा पर्याय निवडून गुंतवणूक चालू ठेवावी ,मग ऐनवेळी कर्ज काढावे लागणार नाही. 

‘विशेष’ मुलांच्या भविष्याची तरतूद

वाढती महागाई आणि बदलतं आधुनिक जग यांचा विचार करून आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात असतात. त्यावर वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स सुद्धा देऊ केल्या जातात. याचा लाभ घेऊन पालक आपल्या मुलांसाठीची आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करू शकतात. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…