Loan Rejection
कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज मिळेल की नाही याबाबतची भिती वाटते कारण काही वेळा सगळी कागदपत्रे असूनही बँकेकडून कर्ज मंजूर केले जात नाही (Loan Rejection). सर्वसामान्य माणसाला आयुष्यात कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घ्यावेच लागते. कर्ज घेताना अर्थातच काही नियम व अटी असतात आणि त्यांची पूर्तता करणे आवश्यक असते. कर्ज मंजूर होताना तुमच्या भूतकाळातील किंवा वर्तमानकाळातील परिस्थितीचा व आर्थिक घटकांचा विचार केला जातो. काही गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. त्या कदाचित आपल्याला माहितही नसतात.
हे नक्की वाचा: तारणकर्ज – सुरक्षित कर्जाचा एक प्रकार
Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे –
१. मासिक उत्पन्न
- घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात की नाही हे पाहण्यासाठी बँक तुमचं मासिक उत्पन्न तपासून पाहते.
- साधारणतः प्रत्येक बँकांच्या मासिक उत्पन्नाविषयीच्या अटी निश्चित असतात.
- कर्जाची रक्कम पात्रतेच्या जास्त असेल तर कर्ज मंजूर होत नाही. अशावेळी तुम्ही नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांमधून कर्ज घेऊ शकता तिथे वार्षिक उत्पन्न जास्त महत्त्वाचे नसते.
२. चुकीची कागदपत्रे
- कर्ज घेताना संबधित कर्जासाठी बँकेकडून मागण्यात आलेली सर्व कागदपत्रे बँकेत द्यावी लागतात. अर्ज भरल्यानंतर आपली माहिती व कागदपत्रे दोनदा तपासण्यात येतात.
- अर्जातील नमूद केलेली माहिती अपुरी असल्यास किंवा सर्व कागदपत्रे उपलब्ध नसतील किंवा दिलेल्या माहितीमध्ये काही विसंगती असेल, तर तुमचं कर्ज मंजूर केलं जात नाही.
३. कमी क्रेडिट स्कोअर :
- सर्व बँका कर्ज देताना पत तपासून पाहतात. इथे क्रेडिट स्कोअर मह्त्वाची भूमिका बजावतो.
- क्रेडिट स्कोअरवरून तुमच्या व्यवहाराविषयी माहिती मिळते. सामान्यतः ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असणारा सिबिल स्कोअर चांगला समजला जातो. कमी सिबिल स्कोअर असल्यास कर्ज नामंजूर होऊ शकते.
महत्वाचा लेख: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?
४. नोकरीतील स्थैर्य
- बऱ्याच बँका स्थिर नोकरी असणाऱ्यांनाच कर्ज देतात. वारंवार नोकरी बदलणे हे कर्ज नामंजूर होण्याचे लक्षण आहे.
- परतफेडीची क्षमता तपासून पाहण्यासाठी बँकांना ठराविक मासिक उत्पन्नाचा स्रोत कागदपत्रांसोबत सादर करणे महत्त्वाचे असते.
- थोडक्यात तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये सातत्य असायला हवे. अन्यथा तुमचे कर्ज मंजूर होत नाही.
५. कर्जाची थकबाकी
- बँक तुमची आर्थिक पार्श्वभूमी पाहून तुम्ही कर्जासाठी पात्र आहेत की नाही यासंदर्भात निर्णय घेते. जर तुमच्या नावावर इतर कर्ज किंवा थकबाकी असेल, तर कर्ज मंजूर होत नाही.
- जर तुम्ही उपल्ब्ध असलेले सर्व क्रेडिट वापरून व्यवहार केला असेल आणि कर्जाची रक्कम भरली नसेल, तर तुमचे नाव डिफॉल्ट यादीत जाते. अशावेळी क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी जुने कर्ज पूर्णपणे फेडल्यानंतरच नवीन कर्जासाठी अर्ज करावा.
६.वय
- तुमच्या वयानुसार कर्जाच्या अटी बदलू शकतात. म्हणजे जर तुम्ही निवृत्तीच्या दरम्यान कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर बँक तुम्हाला कर्ज देताना पुन्हा विचार करेल.
- कमी रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळू शकते तसेच याचे ईएमआय (हप्ते) जास्त रकमी असतात. वैयक्तिक कर्जासाठी वय मर्यादा २१ ते ६० वर्षे आहे.
७.सही चुकीची असल्यास किंवा बदल वाटल्यास
- कर्जाचा अर्ज दाखल करताना सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवरील सही, तसेच अर्जावर केलेली सही जुळवून पाहिली जाते.
- सही चुकीची वाटल्यास किंवा काही फरक आढळल्यास कर्ज मंजूर होण्यास अडचणी येतात किंवा मंजूर होत नाही.
८. आयकर
- तुमच्या नियोक्ताकडून फॉर्म-१६ मिळतो. तो फॉर्म भरणे आवश्यक असते. कर्जासाठी अर्ज करताना आयकर विवरणपत्र भरलेले असणे आवश्यक आहे.
- कर्ज मंजूर करताना मागील २ वर्षांत तुम्ही आयकर रिटर्न फॉर्म भरला आहे का, ते तपासण्यात येते.
विशेष लेख: कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा…
९. इतर कर्ज
- जर तुम्ही एकाच वेळी बरीच कर्ज घेतली असतील, तर तुमची आर्थिक पार्श्वभूमी तपासताना या गोष्टी समोर येताना. यामुळे हे कर्ज व हप्ते सोडून उर्वरित रक्कम तुमचं निव्वळ उत्पन्न समजली जाते.
- यामुळे तुमचं उत्पन्न कमी होत व कर्ज घेण्यासाठी उत्पन्नाच्या अटींची पूर्तता होत नाही म्हणून कर्ज नामंजूर होऊ शकते.
१०. ना हरकत प्रमाणपत्र
- जुने कर्ज न फेडता तुम्ही नवीन कर्जासाठी अर्ज करत असाल तर जुन्या बँकेकडून किंवा संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे असते. याशिवाय नवीन कर्ज मंजूर केले जात नाही.
११. डिफॉल्ट यादीतील पत्ता
- गृहकर्ज घेत असाल तर घराचा पत्ता नमूद करणे आवश्यक असते.
- तुमच्या नवीन घराच्या अगोदरच्या मालकाने क्रेडिट कार्डची किंवा इतर बिले चुकवली असतील किंवा त्याच्या नावावर कर्जाची थकबाकी असल्यास जर त्याने हा पत्ता दिला असेल, तर यामुळे सुद्धा तुमचं गृहकर्ज मंजूर होत नाही.
कर्ज न मिळण्याची काही कारणे प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळी असू शकतात.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Loan Rejection Marathi Mahiti, Loan Rejection in Marathi, Loan Rejection Marathi, Loan Rejection karane, Maze Loan Reject ka zale?