Reading Time: < 1 minute
PMVVY – प्रधानमंत्री वय वंदन योजनेला मुदतवाढ
PMVVY -Pradhan Mantri Vaya Vandana Yojana scheme extended
प्रधानमंत्री वय वंदन योजना ही जेष्ठ नागरिकांना उतारवयात स्थिर उत्पन्नाची निश्चिती उपलब्ध करून देणारी योजना आहे. या योजनेला नुकतीच ३ वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढीसोबतच काही महत्वपूर्ण बदल या योजनेत करण्यात आलेले आहेत.
प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY)
- सदर योजनेमध्ये ६० वर्ष पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते.
- ही योजना १० वर्षे मुदतीची असून गुंतवणूकदारांना वार्षिक, सहामाही, त्रैमासिक व मासिक व्याज घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा ६० वर्षे असून कमाल वयोमर्यादेची कुठलीही अट नाही.
- या योजनेचे किमान खरेदीमुल्य १,४४,५७८ रु. असून कमाल खरेदीमुल्य १४,४५,७८३ रु. इतके आहे.
- मासिक व्याजाचा पर्याय निवडीच्या बाबतीत मात्र किमान १.५ लाख व कमाल १५ लाख खरेदीमुल्य आहे.
प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY) –अर्ज:
- या योजनेसाठी जेष्ठ नागरिक https://eterm.licindia.in/onlinePlansIndex/pmvvymain.do या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्जासोबत पॅन कार्डची प्रत, रहिवासी पुराव्याची प्रत (आधार किंवा पासपोर्ट) तसेच ज्या बँक खात्यात पेंशन हवे त्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- योजनेत गुंतवणूक करून ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकीवर कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अशा कर्जाची कमाल रक्कम ही गुंतवणीकीच्या ७५ टक्क्यांपर्यंतच असू शकते.
प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY) – महत्वपूर्ण बदल:
- या योजनेला मुदतवाढ मिळाली असून मुदत ३१ मार्च २०२० पासून वाढवून ३१ मार्च २०२३ करण्यात आलेली आहे.
- गुंतवणूकीच्या रकमेची कमाल मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवली आहे
- दहा वर्षांच्या जवळपास ८% पर्यंत मिळणाऱ्या स्थिर व्याजदराला रद्द करण्यात आले असून व्याजदर वर्षाच्या सुरुवातीला ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- चालू वर्षात या योजनेत गुंतवणूकीवर ७.४०% व्याजदर देण्यात येणार आहे.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :