Arthasakshar PMVVY Extention Marathi mahiti
Reading Time: < 1 minute

PMVVY – प्रधानमंत्री वय वंदन योजनेला मुदतवाढ

PMVVY -Pradhan Mantri Vaya Vandana Yojana scheme extended

प्रधानमंत्री वय वंदन योजना ही जेष्ठ नागरिकांना उतारवयात स्थिर उत्पन्नाची निश्चिती उपलब्ध करून देणारी योजना आहे. या योजनेला नुकतीच ३ वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढीसोबतच काही महत्वपूर्ण बदल या योजनेत करण्यात आलेले आहेत.   

प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY)

  • सदर योजनेमध्ये ६० वर्ष पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते. 
  • ही योजना १० वर्षे मुदतीची असून गुंतवणूकदारांना वार्षिक, सहामाही, त्रैमासिक व मासिक व्याज घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा ६० वर्षे असून कमाल वयोमर्यादेची कुठलीही अट नाही.
  • या योजनेचे किमान खरेदीमुल्य १,४४,५७८ रु. असून कमाल खरेदीमुल्य १४,४५,७८३ रु. इतके आहे.
  • मासिक व्याजाचा पर्याय निवडीच्या बाबतीत मात्र किमान १.५ लाख व कमाल १५ लाख खरेदीमुल्य आहे. 

प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY) –अर्ज:

  • या योजनेसाठी जेष्ठ नागरिक https://eterm.licindia.in/onlinePlansIndex/pmvvymain.do या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. 
  • अर्जासोबत पॅन कार्डची प्रत, रहिवासी पुराव्याची प्रत (आधार किंवा पासपोर्ट) तसेच ज्या बँक खात्यात पेंशन हवे त्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत जोडणे आवश्यक आहे. 
  • योजनेत गुंतवणूक करून ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकीवर कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अशा कर्जाची कमाल रक्कम ही गुंतवणीकीच्या ७५ टक्क्यांपर्यंतच असू शकते. 

प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY) –  महत्वपूर्ण बदल:

  • या योजनेला मुदतवाढ मिळाली असून मुदत ३१ मार्च २०२० पासून वाढवून ३१ मार्च २०२३ करण्यात आलेली आहे. 
  • गुंतवणूकीच्या रकमेची कमाल मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवली आहे 
  • दहा वर्षांच्या जवळपास ८% पर्यंत मिळणाऱ्या स्थिर व्याजदराला रद्द करण्यात आले असून व्याजदर वर्षाच्या सुरुवातीला ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
  • चालू वर्षात या योजनेत गुंतवणूकीवर ७.४०% व्याजदर देण्यात येणार आहे. 

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…