परकीय गुंतवणूक
परीकय गुंतवणूक (Foreign Investment),थेट परकीय गुंतवणूक (FDI) व भांडवली परकीय गुंतवणूक (FPI)या अर्थशास्त्रामधील संज्ञा अनेकांना केवळ नावानेच माहिती असतील. या लेखात आपण या अर्थशास्त्रीय संज्ञांबद्दल माहिती घेऊया.
आपली आयात निर्यात विषम आहे आणि निर्यातीपेक्षा आयात जास्त, त्यातही जवळपास ८५% आयात ही खनिज तेल आणि सोने यासाठी केली जाते. आयात व्यवहार प्रामुख्याने डॉलर या चलनात होतात. त्यामुळे आपल्या चालू खात्यात तूट येते त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला विविध माध्यमातून डॉलर्स मिळवावे लागतात. यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज, अन्य देशातून कर्ज किंवा मदत, परदेशी वित्तसंस्थाना भांडवल बाजारात व्यवहार करण्याची परवानगी इत्यादी. याशिवाय थेट परकीय गुंतवणूक (FDI) व भांडवली परकीय गुंतवणूक (FPI) दोन अन्य प्रकारात केली जाते. ही गुंतवणूक कोणकोणत्या क्षेत्रांत करता येईल त्याची कमाल किमान मर्यादा किती असेल ते आपल्या परकीय गुंतवणूक धोरणावर अवलंबून असते.
‘वापरा’वरील खर्च विरुद्ध ‘गुंतवणुकी’वरील खर्च…
- जरी FDI आणि FPI दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकी या परकीय गुंतवणुकी असल्या तरी त्यात काही साम्ये आणि फरक आहेत.
- या गुंतवणुकीचा मुख्य हेतू हा त्या त्या देशातील कायदेशीर तरतुदींचे पालन करून अधिक नफा मिळवणे हा असतो. त्यातून अपेक्षित परतावा हा स्वतः च्या देशांतर्गत व्यवसाय किंवा गुंतवणूक करून मिळणाऱ्या परताव्यातून अधिक असेल तरच केली जाते.
- त्याचप्रमाणे जर अशा किफायतशीर संधी भविष्यात त्यांच्या देशात अथवा अन्य देशात उपलब्ध झाल्या, गुंतवणूक केलेल्या देशाचे परकीय गुंतवणूकीसंबंधी अनुकूल धोरण नसल्यास, नैसर्गिक आपत्तीत किंवा कररचनेतील मोठ्या बदलासारख्या कोणत्याही कारणाने अनुकूल नसल्यास, भविष्यात तोटा होण्याच्या भीतीने काढून घेतली जाऊ शकते.
रिलायन्स जिओ -फेसबुक मधील डिलचे परिणाम…
थेट परकीय गुंतवणूक (FDI):
- थेट परकीय गुंतवणूक ही प्रामुख्याने स्थिर मालमत्तेत, उद्योगात, एखादा अस्तित्वात असलेला उद्योग ताब्यात घेण्यास, मूळ कंपनीची उपकंपनी स्थापन करण्यास केली जाते किंवा स्थानिक उद्योगाबरोबर सक्रीय भागीदारीत केली जाते.
- थेट परकीय गुंतवणूक ही तुलनेने दीर्घकालीन असते तर भांडवली परकीय गुंतवणूक अल्पकालीन असते.
- या गुंतवणूकीची किंमत, स्थावर मालमत्ता व सक्रिय सहभागात असल्याने त्याची किंमत मोठ्या प्रमाणात वरखाली होण्याची शक्यता कमी असल्याने कमी तरल असते.
- थेट परकीय भांडवली सहभाग १०% हून अधिक परंतू उद्योगाच्या एकूण जास्तीत जास्त विहित मर्यादेत असतो
रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय?…
परकीय भांडवली गुंतवणूक (FPI):
- परकीय भांडवली गुंतवणूक ही समभाग, कर्जरोखे, इ टी एफ किंवा म्युच्युअल फंड यासारख्या अप्रत्यक्ष चल मालमत्ता प्रकारात केली जाते.
- भांडवली गुंतवणूक भांडवल बाजारात नोंदवलेली असल्याने मागणी पुरवठ्यानुसार त्याची किंमत मोठ्या प्रमाणात वरखाली होत असते तुलनेने त्यास रोकडसुलभाताही अधिक असते.
- परकीय भांडवली गुंतवणूक १०% हून कमी परंतू अन्य गुंतवणूकदारांसह एकत्रितपणे २४% हून अधिक असू शकत नाही. कर्जरोख्यातील गुंतवणूक कर्जाच्या ३०% हुन अधिक नसेल
पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणजे काय?…
सरकारी परवानगी:
- भारतात थेट परकीय गुंतवणूक करण्यास सरकारी परवानगीची गरज असते.
- जर सक्रीय भागीदारीत उद्योग करायचा असेल तर १०% हून अधिक भांडवली सहभाग असावा लागतो तो नोंदणी न केलेल्या शेअर्समध्ये ही करता येतो. याहून कमी सहभाग असल्यास ती परकीय भांडवली गुंतवणूक समजली जाते मात्र ती नोंदणीकृत सिक्युरिटीजमधेच करता येते.
- यातील गुंतवणूक १०% हून अधिक झाल्यास व ती त्यापुढील ५ दिवसात विहित मर्यादेखाली न आल्यास ती परकीय भांडवली गुंतवणूक न समजता थेट परकीय गुंतवणूक समजली जाते.
- तीन वर्षाकारिता कर्जरोख्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या परकीय भांडवल गुंतवणुकदारांना रिझर्व बँकेने वेगळा गुंतवणूक प्लेटफॉर्म (VRR) उपलब्ध करून दिला आहे.
- अलीकडेच याहून अधिक काळ गुंतवणूक करण्याची सवलत देण्यात आली आहे.
गुंतवणूकसंच व्यवस्थापन (Portfolio Management) योजना…
जोपर्यंत परकीय गुंतवणूकदार आकर्षित होतील तोपर्यंत या माध्यमातून डॉलर्स येत राहून परकीय चलनाची तूट आपल्याला जाणवणार नाही.
– उदय पिंगळे
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Foreign Investment Marathi Mahiti, FDI Marathi Mahiti, FDI Marathi, What is Foreign Investment in Marathi