Arthasakshar Home Loan Transfer Marathi
https://bit.ly/30khjCl
Reading Time: 3 minutes

Home Loan Transfer: होम लोन ट्रान्स्फर 

होम लोन ट्रान्सफर (Home Loan Transfer) म्हणजेच आपले गृहकर्ज आपल्या सोयीसाठी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित करणे. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली अवघड स्थिती, सामाजिक, आर्थिक अनिश्चितता, मानसिक तणाव अशा अनेक समस्यांना आपण सर्वचजण सामोरे जात आहोत. अशा परिस्थितीत आपण घेतलेल्या ‘होम लोन’चे हप्ते भरणे नक्कीच कठीण जात असणार. तुम्ही ‘होम लोन ट्रान्स्फर’ चा पर्याय निवडून यामध्ये थोडी बचत नक्कीच करू शकता. 

कार लोन रिपेमेंट केल्यावर या गोष्टी विसरू नका !

Home Loan Transfer: ‘होम लोन ट्रान्स्फर’ कधी करतात ?

  • जेव्हा दुसऱ्या एखाद्या फायनान्शिअल इंस्टीट्यूट किंवा बँकेकडून सध्याच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल, तर तुम्ही तुमचे होम लोन कमी व्याज आकारणाऱ्या बँकेकडे ट्रान्स्फर करू शकता.
  • आज अनेकजण या पर्यायाचा विचार करताना दिसत आहेत. परंतु हे करत असताना काही महत्वाच्या गोष्टी नक्कीच विचारात घेतल्या गेल्याच पाहिजेत. 

‘होम लोन ट्रान्स्फर’ – महत्वाच्या गोष्टी (Home Loan Transfer: Things to remember)

१. व्याजदरामध्ये सूट:

  • होम लोन ट्रान्स्फर करून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या शुल्क द्यावे लागते.
  • अशा वेळी तुम्ही तुमच्या सध्याच्या बँकेसोबत तुमच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्याबाबत नक्कीच बोलू शकता.
  • तुम्ही त्यांचे जुने ग्राहक असाल व वेळेवर हप्ते भरत असाल, तर पूर्व परिस्थिती लक्षात घेता ते नक्कीच तुमच्या या प्रस्तावाचा विचार करून व्याजदर कमी करू देऊ शकतील.

स्वप्नातल्या वस्तू खरेदी करण्याचा उत्तम पर्याय – कन्झ्युमर ड्युरेबल लोन (Consumer durable loan)!.

२. कर्जाचा शिल्लक कालावधी:

  • तुमच्या कर्जफेडीच्या कालावधीला फक्त शेवटची पाच किंवा त्यापेक्षाही कमी वेळ राहिला असेल आणि तुम्ही जर होम लोन ट्रान्स्फरचा विचार करत असाल, तर मात्र हे तुमच्या फायद्याचे ठरणार नाही.
  • याचे महत्वाचे  कारण म्हणजे तुमच्या कर्जावर तुम्ही मोठ्या प्रमाणात व्याज भरलेले असते. आता जर हा पर्याय निवडायचा झाला तर त्यासाठी प्रीपेमेन्ट म्हणजे वेळेआधी कर्जफेड करत असल्यास त्याची फी, प्रोसेसिंग फी, ट्रान्स्फर, फॉरक्लोजर चार्जेस वगैरे इतरही अनेक शुल्क भरावे लागेल. 

३. तुमचा क्रेडिट स्कोअर:

  • होम लोन ट्रान्स्फरची प्रक्रिया करताना तुमचा क्रेडिट स्कोअर सर्वांत महत्वाचा असतो.  त्याच्या आधारावरच तुम्हांला होम लोन ट्रान्स्फर करता येऊ शकते.
  • वेळेवर कर्जाचे हप्ते देणे हा चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी सर्वात महत्वाचा घटकअसतो. तसे न झाल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खालावू शकतो.
  • त्यामुळे भविष्यात बँकेसमोर तुमची पत चांगली ठेवण्यासाठी आणि बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळत राहावे यासाठी बँकेची कर्जे, कर्जाचे हप्ते वेळेवर भरलेले असायला हवेत.

कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

४. ‘रेपो’शी लिंक असलेले होम लोन:

  • रेपो रेट हा रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार ठरत, बदलत असतो.
  • अशा प्रकारच्या लोनला रेपो-रेट लिंक्ड लेन्डिंग रेट (RLLR) असं संबोधतात.
  • रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केला, तर बँका याच्याशी संबंधित कर्जाचे व्याजदरही कमी करतात.
  • यामध्ये कर्जदारासोबत बँकेचे असलेले व्याजदरासंबंधीतील व्यवहार जास्त पारदर्शक मानले जातात, कारण हा व्याजदर संपूर्णतः ‘आरबीआय’च्या निर्णयांवर अवलंबून असतो.
  • सद्य परिस्थितीतही रिझर्व्ह बँकेने त्यांचा रेपो रेट कमी केला आहे, परिणामी तुमच्या होम लोनचा हप्ताही कमी होईल आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला होम लोन ट्रान्स्फरच्या पर्यायाचीही गरज नाही पडणार.

५. फॉरक्लोजर किंवा बॅलन्स ट्रान्सफर चार्जेस:

  • अनेक बँका होम लोन दुसऱ्या बँकेकडे ट्रान्सफर करण्याचे काही चार्जेस आकारतात.
  • यामध्ये प्रोससिंग फी, ॲप्लिकेशन फी, ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस, इन्स्पेक्शन फी, इत्यादी शुल्कांचा समावेश होतो. 
  • तुम्हाला इतरत्र व्याजदर कमी वाटले तर होम लोन ट्रान्स्फरचा पर्याय निवडणे उलट जास्त खर्चिक ठरू शकते.
  • बॅलन्स ट्रान्स्फरसाठीचे सर्व चार्जेस आणि शिल्लक असलेले व्याज याचा एकदा ताळेबंद करून मग त्यावरून होम लोन ट्रान्स्फरचा पर्याय तुमच्या फायद्याचा आहे ते पाहावे ?
  • अशा प्रकारच्या कोणत्याही ‘होम लोन ट्रान्स्फरच्या कॅल्क्युलेटर’वर तुम्ही हा ताळेबंद करून पाहू शकता. 

उत्सव काळात मिळणाऱ्या कर्ज सवलती आणि वस्तुस्थिती

६. वास्तूच्या मालकी हक्काची कागदपत्रे:

  • सामान्यतः होम लोन हे मोठ्या रकमेचे कर्ज असते त्यामुळे या संदर्भातील सर्व कागदपत्रे अत्यंत महत्वाची असतात.
  • ही सर्व कागदपत्रे तुमच्या वैयक्तिक कागदपत्रांसहित एकदा नीट तपासून पहा ज्यामुळे तुमच्या होम लोन ट्रान्स्फरच्या कार्यपद्धतीमध्ये काहीही अडथळा निर्माण होणार नाही.
  • तुम्ही तुमच्या सध्याच्या कर्जदात्याला भेटून त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे तुमच्या नवीन कर्जदात्याकडे सुपूर्द करण्याविषयीच्या सर्व बाबींचा लिखित नोंद घ्यावी. तसेच, त्यामध्ये सदर ट्रान्सफर प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी देखील नमूद करायला सांगा. 

७. फायनल प्रिंट एकदा नीट वाचून समजून घेणे:

  • एकदा तुम्ही होम लोन ट्रान्स्फरचा निर्णय घेतल्यावर नवीन कर्जदात्याची तुमच्या व्यवहारासंदर्भातील सर्व कागदपत्रे एकदा नीट वाचून त्यातल्या नियम व अटी नीट समजून घेणे गरजेचे आहे.
  • यामध्ये तुमच्यावर कोणतेही छुपे खर्च आकारण्यात आलेले आहेत का ते तपासून पहा. 

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

होम लोन ट्रान्सफर (Home Loan Transfer) प्रक्रिया तशी कठीण नाही, जर यातून तुम्हाला फायदा  होणार असेल तर, यासंदर्भात विचार करायला काहीच हरकत नाही. परंतु, त्याआधी काळजीपूर्वक सर्व नियम व अटी व्यवस्थित समजून घ्या. 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Home Loan Transfer Marathi Mahiti, Home Loan Transfer in Marathi, Home Loan Balance Transfer Marathi Mahiti, Home Loan Balance Transfer in Marathi, Home Loan Balance Transfer Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…