Freelancer – फ्रिलान्सर
फ्रिलान्सर (Freelancer) म्हणजे अशी व्यक्ती जी इतर कोणाच्याही अधिपत्याखाली काम करत नाही, ती स्वतःच स्वतःची मालक असते. फ्रिलान्सर हे साधारणतः बी२बी (B2B) म्हणजे इतर व्यवसायांना सुरळीत चालण्यासाठी सेवा पुरवणारे घटक असतात. एकाचवेळी अनेक ग्राहकांसाठी काम करणे आणि आपल्या सेवा जास्तीत जास्त ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार पुरवण्याची संधी फ्रिलान्सर म्हणून काम करताना उपलब्ध होते.
‘फ्रिलांसींग’ ही संकल्पना तशी आपल्याला सुरुवातीपासूनच परिचयाची आहे. उदाहरणेच पाहायची झाल्यास प्रिंटिंग करून देणारे, वेबसाईट तयार करून देणारे, डिजिटल मार्केटिंग करणारे हे सर्व फ्रिलान्सर्सच आहेत, जे वेगवेगळ्या लोकांची कामे घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे पूर्तता करून देतात.
Resume update: रेज्युमे अपडेट ठेवण्यासाठी 10 महत्वाच्या टिप्स
Freelancer- फ्रिलान्सर असण्याचे फायदे:
१. अधोरेखित कौशल्य –
ज्या कौशल्यामध्ये आपल्याला निपुणता आहे आणि ज्याची व्यापार-उदीमात मागणी आहे, असे एक कौशल्य अधोरेखित झाले की त्यानुरूप कोणतेही सोपस्कार पूर्ण न करता लगेच ग्राहक शोधायला किंवा त्या क्षेत्रातल्या माहित असलेल्या व्यक्तींना संपर्क साधता येतो.
२. संपर्क –
यात तुम्ही कोणावरही अवलंबून नसल्यामुळे तुम्हाला लगेच सुरुवात करता येईल. तुमचा पहिला ग्राहक शोधण्यासाठी तुम्ही LinkedIn वर तुमची नवीन प्रोफाईल बनवू शकता, तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगू शकता, तुमच्या कामासंबंधित ओळखीच्या लोकांशी संपर्क साधू शकता आणि त्याद्वारे तुमचा पहिला ग्राहक मिळण्यासाठी प्रयत्न करू शकता.
३. महत्व –
वेगवेगळ्या आणि नवनव्या क्षेत्रांचा उगम होताना बाजारपेठेत दर्जेदार आणि प्रामाणिक फ्रिलान्सर्सची मागणी वाढत आहे. आजकाल अनेक कंपन्या एखाद्या कामासाठी कोणालातरी कायमस्वरूपी नोकरीवर ठेवण्यापेक्षा फ्रिलान्सर म्हणून नेमण्याला अधिक प्राधान्य देताना दिसतात.
४. मुभा –
इथे तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक असता. तुम्हाला हवे तिथे आणि हवे तसे काम करण्याची मुभा असते, फक्त ग्राहकाला अपेक्षित सेवा ठरलेल्या वेळेमध्ये उत्तम रितीने मिळाली म्हणजे झाले.
५. निर्णय स्वातंत्र्य –
कोणत्या ग्राहकांबरोबर काम करायचे हा तुमचा निर्णय असतो. सुरुवातीला कदाचित तुम्हाला मिळेल त्या ग्राहकांसोबत काम करावे लागेल, पण जशी तुमची प्रगती होत जाईल, तुमची त्या क्षेत्रामध्ये ओळख बनत जाईल तसे हे सर्वस्वी तुमच्यावर असेल की तुम्हाला कोणाचे काम करायचे आहे. तुम्ही इच्छा नसल्यास तुम्ही तुमच्या हिशेबाने एखाद्या ग्राहकासोबत काम करणे टाळू शकता किंवा गरज पडल्यास एखाद्या ग्राहकाला सेवा देणे बंदही करू शकता.
भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १
Freelancer- फ्रिलान्सर म्हणून प्रत्यक्ष काम सुरु कसे करायचे?
आजकाल अनेक फ्रिलान्स वेबसाइट्स पण उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ग्राहक शोधू शकता. पण फ्रिलान्सर म्हणून काम सुरु करताना काही गोष्टींवर तुम्ही विचार करणे आणि त्याप्रमाणे तयारी करणे गरजेचे आहे.
- LinkedIn सारख्या व्यवसायाशी निगडित वेबसाईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करणे किंवा आधीपासून असेल तर ती त्वरित अपडेट करावी.
- तुम्हाला कोणत्या क्षेत्रामधील ग्राहक हवे आहेत ते नीट विचारपूर्वक ठरवावे. तुमची ओळख तुम्हाला काय म्हणून निर्माण करायची आहे आणि तुमचे Unique Selling Proposition (USP), म्हणजे तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही तुमच्या ग्राहकाला वेगळे असे काय देणार आहात, हे ठरवावे.
- तुम्ही कोणकोणत्या स्वरूपाच्या सेवा तुमच्या ग्राहकांना पुरवणार आहात याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.
- तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून कसे पैसे घेणार आहात? या पैशांमधून तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे सर्व खर्च आणि शिवाय तुमच्या, कुटुंबाच्या गरजा हे सर्व भागवायचे आहे हे लक्षात ठेवून त्यानुसार हे ठरवावे लागेल.
भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २
Freelancer- फ्रिलान्सर्स काही महत्वाच्या टिप्स:
१. वेळ पाळणे –
घेतलेले काम ग्राहकाला ठरलेल्या वेळी, उत्तम परिणामांसह पूर्ण करून द्यावे.
२. कमी पैसे –
तुम्ही नुकतेच काम सुरु करत असताना तुमच्या गरजा कमी करून इतरांच्या तुलनेत थोडा कमी मोबदला घेऊन काम करून देण्याची तयारी ठेवली तर सुरुवातीला ग्राहक मिळणे सोपे जाईल.
३. वेळेचे नियोजन –
एकाचवेळी अनेक प्रकल्पांवर काम करत असताना कोणत्याही एकाच ग्राहकावर लक्ष केंद्रित करून चालत नाही अशा वेळी तुमच्या वेळेचे आणि कामाचे व्यवस्थित नियोजन केलेले असायला हवे आणि त्यानुसार ते पाळले ही गेले पाहिजे . याबाबत तुम्ही आग्रही असणे अत्यंत महत्वाचे आहे.
४. विनम्रता –
कोणत्याही क्षेत्रामध्ये विनम्रतेला खूप महत्व आहे. तुमच्या बोलण्यामध्ये माधुर्य, सामंजस्याची आणि सहकार्याची भावना, ग्राहकाचे ऐकून घेण्याची वृत्ती हे गुण असायलाच हवेत आणि नसतील तर ते अंगिकारण्याशिवाय पर्याय नाही
सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी (One Person Company)
नोकरी करत असताना, ‘नेमून दिलेले काम करणे’ इतकीच जबाबदारी तुमच्यावर असते, पण फ्रिलान्सर म्हणून काम सुरु केल्यावर तुमचा तो स्वभाव पूर्णपणे बदलणे फार महत्वाचे आहे. कारण आता तुमच्यावर काम मिळवण्यापासून ते काम पूर्ण करून देणे आणि सातत्याने तुम्हालाच काम मिळत राहील अशा प्रकारची सेवा देत राहणे, अशा अनेक जबाबदाऱ्या येतात. त्यासाठी वरील गोष्टी लक्षात घेऊन आचरणात आणल्यास तुमचा यशाचा मार्ग नक्कीच सुकर होईल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Freelance Marathi Mahiti, Freelancer in Marathi, Freelancer mhanje kaay?, Freelancer Marathi