गृहकर्ज हस्तांतरण
गृहकर्ज हस्तांतरण हा खूप मोठा निर्णय असतो. तो घेताना बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. मुळात गृहकर्जे ही साधारणपणे 20 ते 30 वर्षे अशा दीर्घ कालावधीची असतात. बहुतांश वेळा कर्जदार आपल्या नोकरीच्या एकूण वर्षांतील किमान तीन चतुर्थांश वर्षे या कर्जाचे हप्ते फेडण्यात घालवतात. प्रति महिना जितकी रक्कम तुम्ही कर्जाचा हप्ता म्हणून भरणार असता, त्यातील किमान 50% वाटा हा व्याजाचा असतो आणि उर्वरित 50% मुद्दल असते.
हे नक्की वाचा: गृहकर्ज हस्तांतरणाची योग्य वेळ कोणती?
- सर्वसाधारणपणे राष्ट्रीय बँकांचे गृहकर्जासाठीचे व्याजदर हे 9 टक्के ते 11 टक्के इतके असतात. खाजगी बँकांचे दर हे त्याहून 1 ते 2 टक्के जास्त असतात. तसेच ज्या खाजगी आर्थिक संस्था कर्ज देतात, त्यांचे दर त्याहून अधिक असतात.
- जेव्हा रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व्याजदर कमी होतात तेव्हा पहिल्यांदा आपण आपल्या मूळ बँकेलाच विनंती करून सुधारित कमी व्याजदर लागू करण्यास सांगावे. मात्र तुम्हाला अशी सवलत न मिळाल्यास किंवा बँक तुमच्यासाठी नव्या धोरणानुसार कमी दराने व्याजदर आकारत ऩसल्यास तुम्ही उर्वरित कर्ज दुसऱ्या बँककडे हस्तांतरित करू शकता.
- नव्या बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे तुमचे कर्ज हस्तांतरित झाल्यानंतर नवी संस्था तुमची सर्व उर्वरित कर्जाची रक्कम पहिल्या बँकेला देते आणि तुम्ही नव्या संस्थेला कर्ज भरणा सुरू करता.
- तज्ज्ञांच्या मते, कर्जफेडीच्या सुरुवातीच्या 4 ते 5 वर्षात हस्तांतरण करणे हे फायद्याचे असते. कारण सुरूवातीच्या वर्षांतच व्याजाचा घटक खूप जास्त असतो.
महत्वाचा लेख: गृहकर्जाची वेळेआधी परतफेड करण्यापूर्वी या ८ गोष्टींचा विचार करा
गृहकर्ज हस्तांतरण करण्यापूर्वी विचारात घेण्याजोग्या ५ महत्वाच्या गोष्टी
१. जुन्या व नव्या व्याजदरातील फरक:
- बँकांकडून घेतल्यास गृहकर्ज रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर आधारित असतात.
- एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या) आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या मात्र आरबीआयच्या धोरणाचे अनुसरण करत नाहीत आणि त्यांची कर्जे बाजारपेठेच्या निकषांवर आणि त्यांच्यातील स्पर्धांवर आधारित असतात. म्हणून, तज्ज्ञ म्हणतात की कर्ज हस्तांतरित करण्यापूर्वी या दरांमधील फरकांची तुलना करणे आवश्यक आहे.
२. थकबाकीची एकूण रक्कम
- आपण भरत असलेला व्याज दर सध्याच्या बाजाराच्या दरापेक्षा जास्त असल्यास गृहकर्ज हस्तांतरित करावे म्हणजे तुमचा मासिक हप्ता कमी होईल.
- गृह कर्जाचे व्याज दर हे आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर सहसा सुधारित केले जातात.
हे नक्की वाचा: कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा या ५ महत्वाच्या गोष्टी
३. कर्ज हस्तांतरण शुल्क
- जर तुमच्या कर्जाची मुदत संपत आली असेल, म्हणजेच शेवटची 5 ते 7 वर्षे तर, शक्यतो कर्ज हस्तांतरित करू नये. कारण कर्जाची बहुतांश रक्कम तुम्ही पहिल्या बँकेला अदा केलेली असते.
- आता केवळ तुमचे मुद्दल दर महिन्याला हप्ता म्हणून वजा होत असते.
४. बाकी असलेली मुदत
- जर आपण नजीकच्या भविष्यात घर विकण्याचा करण्याचा विचार करत असाल तर मात्र नक्कीच आपले गृह कर्ज हस्तांतरित करू नये.
५. प्रक्रिया शुल्क –
- काही बँका हस्तांतरणाच्या प्रक्रियेत जादा शुल्क आकारतात.
- एक ठराविक रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून आकारल्यानंतरही जादा रक्कम घेतात, त्यामुळे अशी जादा रक्कम भरण्याचा सौदा फायद्याचा की तोट्याचा याची शहानिशा करुनच हस्तांतरण करण्याचा निर्णय घ्यावा.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies