जानेवारी 2021 पासून बदलणारे हे 9 नियम
नवीन वर्षात अनेक गोष्टी बदलणार आहेत. याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रातही बरेच बदल होणार आहेत. चेक पेमेंट, एलपीजी सिलिंडरच्या किंमती आणि जीएसटी फाइलिंग पर्यंतचे अनेक नियम 1 जानेवारी 2021 पासून बदलत आहेत. कारण हे नियम प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले आहेत, म्हणूनच आपल्याला या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
सन 2020 सुरु झाले तेव्हा आपल्यापैकी बहुतांश लोकांनी कित्येक नवनवीन योजना आखल्या असतील परंतु कोरोनामुळे बऱ्याच योजना तशाच राहून गेल्या असतील. येणाऱ्या नवीन वर्षात महामारी संपेल आणि आपले दैनंदिन आयुष्य पूर्वपदावर येईल अशी आशा मनात धरून गेले कित्येक दिवस आपण 2021 कधी उजाडतंय, याची आतुरतेने वाट बघत आहोत.
हे नक्की वाचा: 1 ऑक्टोबर 2020 पासून बदललेले महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का ?
जानेवारी 2021 पासून बदलणारे 9 महत्वपूर्ण नियम-
- जानेवारी 2021 पासून आरबीआयने कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहारांसाठीची मर्यादा दोन हजार रुपयांवरून 5,000 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्ड व यूपीआयमार्फत नियमितपणे होत असलेल्या व्यवहारांसाठी ई-आदेश दिले आहेत.
- सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहक डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. गेल्या काही महिन्यात यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.
- ग्राहकांना मिळणाऱ्या डिजिटल व्यवहारांच्या सुविधांमध्ये वाढ करून कोरोनाच्या काळात वाढलेले डिजिटल व्यवहार पुढेही कायम राहावेत म्हणून आरबीआयने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
2. चेक पेमेंट
- बँक व्यवहारांमध्ये होणाऱ्या फसवणूकींवर आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 जानेवारी 2021 पासून चेक पेमेंटसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ आणण्याचा निर्णय घेतला आहे.
- पॉझिटिव्ह पे सिस्टीमनुसार रु.50,000 पेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी मुख्य तपशिलाची पुष्टीकरण (re-confirmation) करावे लागण्याची शक्यता आहे.
- ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ ही सुविधा घेण्याचा निर्णय हा संपूर्णपणे खातेदारांचा असेल.
- बँका 5 लाख आणि त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ बंधनकारक करण्याबद्दल विचार करत आहेत.
हे नक्की वाचा: शेअर ट्रेडिंग: मार्जिन प्लेज व अनप्लेज – नवीन नियम
3. सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य केले आहे.
- 1 डिसेंबर 2017 पूर्वी विकल्या जाणार्या ‘एम’ आणि ‘एन’ वर्ग चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य असेल.
- 6 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये यासंदर्भात दुरुस्ती (amendment) करण्यात आली आहे.
4. कारच्या किंमती
- 1 जानेवारीपासून ‘मारुती सुझुकी’ आणि ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या दोन्ही कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवायचा निर्णय घेतलाआहे.
- तुम्हाला कार खरेदी करायची असल्यास 1 जानेवारीपूर्वीच करा.
5. जीएसटी-नोंदणीकृत लघुउद्योग
- 5 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या व्यवसायांना जानेवारीपासून 12 ऐवजी केवळ 4 जीएसटी विक्री परतावा किंवा जीएसटीआर -3 बी दाखल करावे लागतील.
- या बदलाचा परिणाम सुमारे 94 लाख करदात्यांना होणार आहे (एकूण: संपूर्ण जीएसटी कर बेसच्या सुमारे 92%.)
- याचबरोबर लघुउद्योग असणाऱ्या करदात्यांना वर्षाला फक्त आठ रिटर्न (चार जीएसटीआर-3 बी आणि चार जीएसटीआर -१ रिटर्न) दाखल करावे लागणार आहेत.
6. निवडक ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअॅप सुविधा मिळणार नाही
- १ जानेवारीपासून ठराविक ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. यासंदर्भात व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीजमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे.
- यापुढे व्हाट्स अप फक्त पुढील ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या फोनवरच वापरता येईल- iPhone running iOS 9 and newer; Android running OS 4.0.3 and newer; and select phones running KaiOS 2.5.1 newer, including JioPhone and JioPhone 2.
7. गूगल पे वेब अॅप
- 1 जानेवारी 2021 पासून गूगल पे मार्फत त्याच्या ‘वेब अॅप वापरकर्त्याना त्वरित पैसे हस्तांतरणासाठी चार्जेस लागू करण्यात येणारआहेत.
- आतापर्यंत ग्राहक मोबाइल अॅपवरून किंवा pay.google.com वरून व्यवहार करत होते. गुगलच्या अलीकडील सूचनेनुसार, वेबअॅप साइट जानेवारी 2021 पासून बंद करण्यात येणार आहे.
8. एलपीजी किंमती
- दर महिन्याच्या पहिल्या दिवशी क्रूड ऑइल कंपन्या जागतिक बाजारात क्रूड ऑइल दराच्या आधारे एलपीजीच्या किंमती सुधारित करतील.
9. लँडलाईन ते मोबाइल फोन कॉल
- लँडलाईनवरून मोबाइल फोनवर कॉल करण्यासाठी आपल्याला ‘0’ उपसर्ग आवश्यक असेल.
- टेलिकॉम विभागाने नवीन प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जानेवारी 2021 पर्यंत आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलली आहेत.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Rules changing from January 1 Marathi Mahiti, Rules changing from 1 January 2021 in Marathi, new Rules in Marathi, Cheque Rule 2021 Marathi, GST Rule 2021 Marathi, New Changes in 2021 Marathi