Reading Time: 2 minutes

सध्या व्हॉट्सॅपवर पुढील मेसेज धुमाकूळ घालत आहे :

” D-Mart is giving FREE INR2500 shopping voucher to celebrate it’s 17th anniversary, click here to get yours : http://www.डी-मार्टındia.com/voucher Enjoy.”

हे असे मेसेज नेहेमी येतात. अमेझॉनने जुना माल खपवण्यासाठी 50 रुपयांत जीन्स विकायला काढल्यात, एअरटेलने कॅशबॅक ऑफर आणलीये, वगैरे वगैरे.

ह्या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आपण अगदी मूळ, खऱ्या कंपनीच्या वेबसाईटवर आल्यासारखं वाटतं. हुबेहूब डिझाइन कॉपी करून एक वेगळी सिंगल-पेज वेबसाईट तयार केलेली असते. लोगो, रंगसंगती इतकी हुबेहूब असते की ही मूळ वेबसाईट नसून फेक लँडिंग पेज आहे हे कळतही नाही.

मग अश्या पेजवर एकतर तुमच्याकडून ऑर्डरच्या निमित्ताने पैसे घेतले जातात किंवा तुमचे कार्ड / नेटबँकिंग डिटेल्स सेव्ह केले जातात. किंवा तुमचा पत्ता, फोन नंबर, इमेल सेव्ह केला जाऊन  ही माहिती विविध मार्केटिंग कंपन्यांना विकली जाते.

आपण दरवेळी चांगल्या भावनेने लिंक्स फॉरवर्ड करत असताना,  इतरांसाठी व स्वतःसाठी सुद्धा असा खड्डा खोदतोय हे आपल्याला कधी कळत नाही.

त्यामुळे असं कशावरही क्लिक करताना खबरदारी घ्यायला हवी.

ही खबरदारी घ्यायची म्हणजे काय,

  1. तर ज्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या पेजवर गेला आहात, ती लिंक कशी दिसते, त्यात कोणती अक्षरं आहेत हे तपासून बघा.
  2. मूळ कंपनी (अमेझॉन, एअरटेल, डिमार्ट) ची वेबसाईट गुगल करून शोधा.
  3. दोन्ही लिंक एकसारख्या आहेत का हे बघा.
  4. मूळ कंपनी च्या वेबसाईटवर जाऊन तिथे अशी स्कीम दिसतोय का बघा.

ह्या डिमार्ट मेसेजवाल्यांनी जी लिंक तयार केली आहे ती ब्राऊजर वर “dmartindia.com” अशीच दिसते. पण ती कॉपी करून दुसरीकडे पेस्ट केल्यावर खरी लिंक दिसते :

http://www.xn--dmartndia-zpb.com

म्हणजेच ही खोटी(फेक) लिंक आहे.

आणि हा मेसेज खोटा आहे ह्याची पावती खुद्द डिमार्ट ने दिली आहे. डिमार्टच्या वेबसाईटवर (dmartindia.com) पुढील संदेश जाहिर केलेला आहे-

“Dear Customers, There are certain miscreants forwarding link to a fake website which purportedly is giving out D-Mart Shopping voucher. Please note that we at D-Mart have not issued any such voucher. Please do not fall prey to such offers. Team D-Mart.”

म्हणजेच, काही लोक खोट्या वेबसाईटच्या लिंकसोबत डिमार्टच्या व्हाउचर्स देण्याबद्दल ऑफर असणारा मेसेज फॉरवर्ड करत आहेत.  डिमार्टने अशी कोणतीही योजना बाजारात आणलेली नाही.

खुद्द डी-मार्ट ला स्पष्टीकरण द्यावं लागलं, ह्यातच सदर फ्रॉडचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात येते.

त्यामुळे कृपया अश्या लिंकवर कुठल्या डिटेल्स देताना खबरदारी बाळगा. ९९.९९% शक्यता अशीच आहे की ही लिंक खोटी आहे. वर सांगितलेल्या कृतीनुसार वागून, पूर्ण खात्री बाळगूनच कुठल्याही वेबसाईटवर आपली माहिती द्या.

सावध रहा, जागरूक रहा.

स्वतः तर फसू नकाच, असे मेसेज फॉरवर्ड करून इतरांच्याही फसवणुकीचं कारण होऊ नका.

(पूर्वप्रसिद्धी-  http://www.inmarathi.com/d-mart-fraud-message/ )

(चित्र सौजन्य- https://bit.ly/2lmLxzv )

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

मोटार अपघाताची नुकसान भरपाई?? व्हॉट्सॅप मेसेजने केलेली दिशाभूल..

Reading Time: 2 minutes काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला होता; पोळी का करपते? दूध…