अॅडव्हान्स टॅक्स- हप्त्यांचा तक्ता

Reading Time: 2 minutes

मंडळी, चालू  आर्थिक वर्ष  २०१८-१९ चे उत्पन्न  पुढील आकारणी  वर्षामध्ये  म्हणजे सन २०१९-२० मध्ये करपात्र असते. परंतु, आर्थिक  वर्ष चालू असतानाच या उत्पनावरील देय आयकर आगाउ कराच्या स्वरूपामध्ये चार हप्त्यात भरावा  लागतो.

सन २०१८-१९ मध्ये मिळणाऱ्या करपात्र उत्पन्नावरील आयकरात अगाउ कराचा पहिला हप्ता १५ जून, २०१८ पर्यंत भरावा लागेल. उर्वरीत तीन हप्ते १५ सप्टेंबर, २०१८ १५ डिसेबर, २०१८ आणि १५ मार्च २०१८ पर्यंत भरावे लागतील.

अगाउ कराची एकंदर रक्कम ठरविण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये होऊ शकणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज घ्यावा लागतो. यामध्ये व्यवसाय, घरभाडे, पगार, भांडवली नफा, व्याज, लाभांश, इ. सर्व प्रकारच्या उत्पन्नाची अनुमानीत रक्कम ठरवावी. त्यामधील करमुक्त  उत्पन्न वगळावे, म्हणजे उरते ते करपात्र उत्पन्न. यामधून गुंतवणूक व उत्पन्नावर आधारित वाजावटींची रक्कम वजा करावी.

उदा – कलम ८०सी नुसार भविष्य निर्वाह निधी, आयुर्विमा, घराच्या कर्जाचा हप्ता, राष्ट्रीय बचत पत्रके, इ. गुंतवणुकीची वजावट, बँक ठेवींवरील व्याज, तसेच देणगी दिल्याने मिळणारी वजावट अशी एकंदर रक्कम. तसेच, मागील वर्षांमध्ये काही तोटा  झालेला असल्यास व तो वजावटपात्र असल्यास उत्पन्नाच्या रकमेमधून तो वजा करावा. उर्वरीत रक्कम म्हणजे अगाउ करपात्र उत्पन्न. अशा उत्पन्नावर आयकराच्या दरानुसार देय आयकराची रक्कम ठरवावी. या रकमेमधून होणारी करकपात वजा करता, उरते ती रक्कम म्हणजे या वर्षासाठीचा अगाउ कर.

अगाउ कराची रक्कम रु. १०,००० पेक्षा अधिक असल्यास तो चार हप्त्यांमध्ये भरावा लागतो. यामध्ये दिरंगाई झाल्यास दर महा ९% या दराने व्याज भरावे लागते .१५ जूनला देय असलेल्या पहिल्या हप्त्यामध्ये एकंदर अगाउ कराच्या किमान १५% रक्कम भरावी लागेल.
 
   
                आगाउ कराचे हप्ते

क्र

 प्रमाण    
अंतिम दिनांक
पहिला १५%  
 १५ जून
दुसरा ४५%
१५ सप्टेंबर
तिसरा ७५%
१५ डिसेंबर
शेवटचा १००%
१५ मार्च

                     

एखाद्या हप्त्यामध्ये कर भरल्यानंतर अंदाज बदलल्यास उर्वरीत हप्त्यामध्ये कमी/अधिक रक्कम भरून  घट/वाढ याचा विचार करता येतो. १५ मार्चनंतर ३१ मार्चपर्यंत भरलेला कर हा अगाउ कर समजण्यात येतो. अर्थात, दिरंगाईची किंमत दर महा ९% व्याजाच्या रूपाने चुकवावी लागते. 

अ)  नैसर्गिक व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब आयकराचे दर करपात्र उत्पन्न

रुपये  वय ६० पर्यंत  वय ६०-८० वय ८० चे वर
२,५०,००० पर्यंत  
२,५०,०००-३,००,०००   ५%
३,००,०००-५,००,००० ५% ५%
५,००,०००-१,००,००००     २०% २०% २०%
१,००,०००० चे वर ३०% ३०% ३०%

  

ब ) भागीदारी पेढी, कंपनी, एल एल पी ३०%

आयकरावर आधीभाग उत्पन्न अधिक असल्यास एकंदर करावर ३% सेस भरावा लागतो.

(चित्र सौजन्य- https://bit.ly/2sJe1GA )

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *