Reading Time: 2 minutes

अक्षय्य तृतीया. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गणला जाणारा एक मुहूर्त. शुभ दिवस असल्याने नविन कामांची सुरूवात ह्यादिवशी करावी असं मानलं जातं. सणासुदीला, शुभ मुहूर्तांना सोने घेण्याचीही पद्धत आपल्याकडे आहे. अक्षय्य तृतीयेला तर सोन्याच्या दुकानांत लोकांची तोबा गर्दी बघायला मिळते. सोने खरेदीला अक्षय्य तृतीयेपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त नाही असा समज लोकांच्यात दिसून येतो. पण ह्यामागचा त्यांचा खरा हेतू बघितला तर सोने खरेदी म्हणजे चांगला मोबदला मिळवून देणारी गुंतवणूक असा आढळतो. हे पुर्वीच्या काळी खरेही होते. थोडी बचत करून सोने घेतले की त्याचे वधारणारे भाव बघता अडीअडचणीच्यावेळी ते विकून बऱ्यापैकी मोबदला मिळायचा. पण तेव्हा गुंतवणुकीचे इतर पर्यायही उपलब्ध नव्ह्ते किंवा उपलब्ध असून लोकांना त्याविषयी फारशी माहिती नसल्याचं दिसून यायचं.

गेल्या काही वर्षात मात्र परिस्थिती बदलेली पहायला मिळते. सोन्याचे भाव वाढत तर आहेतच, परंतु गुंतवणूक म्हणून सोनेखरेदीचा पर्याय फारसा उपयोगी पडताना दिसत नाही. शिवाय आता गुंतवणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध आहेत, ज्याविषयी लोकांना बऱ्यापैकी माहिती असते.

ह्यासगळ्याचा नीट अभ्यास केला असता स्टॉक्स किंवा इक्विटीसारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्याने सोन्यापेक्षा चांगला मोबदला मिळतो असे लक्षात येते. इकॉनॉमिक टाईम्स वेल्थचा पुढील तक्ता* पाहिल्यास हे सहज लक्षात येईल की आत्ताच्या परिस्थितीत सोनेखरेदी ही फायद्याची गुंतवणूक नाही.

खालील तक्त्याप्रमाणे दिलेल्या वर्षात अक्षय्य तृतीयेला तुम्ही १० ग्रॅम सोने घेतले असते तर..

याऐवजी तितक्याच रकमेची गुंतवणूक सेन्सेक्स स्टॉक्समध्ये केली असती तर..

हीच गुंतवणूक इक्विटीमध्ये केली असती तर सर्वाधिक रिटर्न्स मिळाले असते.

*सौजन्य- ET Wealth (https://bit.ly/2qFdmoM )

(चित्र सौजन्य- https://bit.ly/2Haf2xH, https://bit.ly/2EWPdPB

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…