सोने हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे का?
https://bit.ly/3jd1LqK
Reading Time: 3 minutes

भारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचे आकलन

कोव्हीड-१९ च्या कालावधीत सोन्याचे वाढलेले दर पाहता अनेकजण सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत. परंतु, सर्वसामान्यांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे का?

भारतीयांचे सोन्यावरील प्रेम हे जगाच्या इतर भागाच्या तुलनेत समजण्यापलिकडे आहे. तिथे याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जाते. हजारो वर्षांपासून, भारतीय कुटुंबांमध्ये एक विशेष आणि अलंकारीक मालमत्ता म्हणून सोन्याला एक विशेष स्थान आहे. ही भावना आजही खरेदीदारांच्या मनामध्ये कायम आहे. भारतात सोने खरेदी करणाऱ्यांपैकी बहुतांश लोक याकडे पुन्हा विक्री न करता येणारी भौतिक संपदा म्हणून पहातात. ती गुंतवणूक नसून परंपरेचा एक भाग आहे, असा त्यांचा दृष्टीकोन असतो.

तुम्हाला हे लेख देखील वाचायला आवडतील:       गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड

सोन्याची दरवाढ अजून कुठपर्यंत?

भारतातील सोन्याची सरासरी वार्षिक मागणी ८०० ते १००० टनांमध्ये असते. तसेच कोरोना साथ आणि यासंबंधी प्रवासावरील निर्बंधांमुळे प्रत्यक्ष सोन्याच्या मागणीवर तीव्र परिणाम झाला आहे. पण भारतीयांना सोने खरेदीसाठी इतर गैर भौतिक गुंतवणुकीचा पर्यायही वापरता येईल. तरुण व्यावसायिकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणायचे आहे. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात लोक सर्वच मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असल्याने, सोन्यावर अनेक विशेष ऑफर आहेत.

सर्वसामान्यांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे का?

सध्याचा कल: 

 • बाजारातील अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, चलनवाढीचा कल वाढत असतानाही सोन्याची कामगिरी चांगली असल्याने गुंतवणूकदारांसाठी सोने हा अत्यंत सोपा पर्याय ठरतो. 
 • केवळ मागील दशकातच, आर्थिक मंदीच्या काळात सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूक करण्यासाठी लोकांनी सोन्यालाच पसंती दिली. 
 • २०१९ मध्ये फक्त डिसेंबरपासूनच सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आपण पाहिली आहे. १० ग्राम सोन्याचे दर सुमारे ५४,००० रुपयांवर पोहोचले आहेत. 
 • २०१९ मधील सर्वाधिक दर ३०,००० रुपये होते. (सीएमपी: एमसीएक्स गोल्ड फ्युचर्सचे २८ जुलै २०२० रोजीचे दर ५२,४७७/ १० ग्राम एवढे होते.) 
 • गेल्या काही महिन्यातच सोन्याच्या गुंतवणुकीसाठी आलेल्या गुंतवणूकदारांना दोन आकडी परतावा मिळाला आहे. 
 • एकूणच, भारतीय बाजारपेठ भौतिक मालमत्ता म्हणून सोन्यावर अवलंबून आहे. ग्राहकांना स्वत:चे दागिने असावेत, अशी गरज दिवसेंदिवस वाढत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढत आहे. 
 • देशातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी ६०% वापर फक्त दक्षिण भारतीयांकडून होतो. उर्वरीत ४०% मध्ये उर्वरीत भागांचा समावेश होतो. तसेच उपरोक्त खरेदीपैकी ७०% सोने खरेदी ही दागिने तयार करण्याच्या उद्देशाने केलेली असते. 
 • दक्षिण भारतातील ही मागणी त्यांची संस्कृती आणि पारंपरिक वारशामुळे आहे. तेथे कौटुंबिक कार्यक्रम तसेच सण-उत्सवांना मौल्यवान धातू खरेदीसाठी गर्दी होते. परिणामी किंमतीही वाढत राहतात.

हे नक्की वाचा: शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

सोने गुंतवणूक पर्याय: 

 • वरील सर्व मुद्दे योग्य असले तरीही, सोन्यात गुंतवणूक करण्याची गरज इतर पर्यायांद्वारे बदलता येऊ शकते. त्यामुळे भौतिक मालमत्तेच्या पलिकडेही पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतील.
 • भौतिक संपत्ती म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याला पर्याय म्हणून भारत सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची सुरुवात केली. यामध्ये गुंतवणुकीचा विचार करता येईल. 
 • याशिवाय, वित्तीय प्रणालीला मदत म्हणून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ई-गोल्डच्या स्वरुपात लोक सोने खरेदी करू शकतात. 
 • गूगल पे, पेटीएम आणि फोन पे इत्यादीसारख्या सेवा प्रदात्यांनी एक ग्राम सोने किंवा एखाद्या व्यक्तीच्या गरजेनुसार गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे यात प्रचंड लवचिकता आली आहे. 
 • विश्वसनीयतेबद्दल सांगायचे झाल्यास, हे प्लॅटफॉर्म एमएमटीसी-पीएएमपी (MMTC-PAMP) या सार्वजनिक क्षेत्रातील सोने शुद्धीकरण कारखान्यासोबत काम करतात. 
 • यामुळे आपली सोन्यातील गुंतवणूक ९९.९९% ही २४ कॅरेट सोन्याच्या गुणवत्तेची आहेत, हे प्रमाणित केलेले असते. 
 • ठराविक प्रमाणात सोने गोळा झाल्यानंतर, उदा. ८ ते १० ग्राम, ग्राहक भौतिक स्वरुपातही त्याची निवड करू शकतात आणि ते मिळवू शकतात. हा पर्याय अधिक परवडणारा आहे.

संबंधित इतर लेख : सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे ५ प्रमुख घटक

सोन्याच्या घराघरांतील साठ्यासंबंधी लवकरच मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा

जागतिक आर्थिक अंदाज आणि त्याचे परिणाम: 

 • इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या वृद्धीच्या ताज्या अंदाजानुसार, जागतिक अर्थव्यवस्था ४.९ टक्क्यांनी घसरेल. 
 • संबंधित प्रमुख अर्थव्यवस्थांचा व्यापार आणि अंतर्गत बाजार घसरणीचाच होत राहिल्यास स्थिती आणखी बिकट होईल. 
 • लस चाचणीची परवानगी असलेल्या प्रयोगशाळा विकसित करणे आणि विश्वसनीय लस मोठ्या प्रमाणावर तयार होणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असून यात प्रचंड अनिश्चितता आहे. 
 • आणखी काळजी करण्याचे कारण म्हणजे, कोव्हिड-१९च्या प्रसाराचा अंत दिसत नसल्याने परिस्थिती सुधारण्याची शक्यताही आणखी लांबणीवर जाऊ शकते. 
 • कोव्हिड-१९ चा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून तेथील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. 
 • इटली, स्पेन आणि जर्मनीसारखे देश सध्या सुधारणेच्या मार्गावर आहेत. २०२० या वर्षात तेथील आर्थिक स्थितीही प्रचंड बिकट झालेली आहे.
 • भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे ग्राहक असून त्यांची अर्थव्यवस्थाही मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाली आहे. 
 • सोन्याच्या मालमत्ता वर्गात सुरक्षित गुंतवणूकीची हमी हा एक दृष्टीकोन आहे, जो २०२० या वर्षात सहज वाटू शकतो. 
 • परिस्थिती सोन्याच्या बाजाराला अनुकुल आहे, हे पाहून विदेशी आणि रिटेल गुंतवणूकदार आपली संसाधने सोन्याच्या मालमत्तांकडे वळवतात, हेच योग्य आहे.
 • आदर्श बाजार स्थितीनुसार, कोणत्याही पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा १० ट्के असावा. पण एकूणच अस्थिरता पाहता, अशा प्रकारच्या कोणत्याही मालमत्तेत, विशेषत: सोन्यातील गुंतवणूक १५ टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकेल. 
 • २०२० या निम्म्या वर्षात तर भरपूर परतावा मिळाला आहे, उत्तरार्धात यापेक्षा चांगली स्थिती होऊ शकते.

सुवर्ण गुंतवणूक : 

 • स्थानिक ज्वेलर्ससोबत एसआयपी (SIP) / भिशी  हा बऱ्याचदा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. तथापि, हे जोखीमीचे असू शकते. 
 • प्रत्यक्ष सोने खरेदी असो अथवा इतर स्वरुपातील सोने खरेदी असो, ते मोठ्या ब्रँड आणि विश्वसनीय ज्वेलर्सकडूनच घेतले पाहिजे, जे सोन्याची गुणवत्ता आणि दर्जा दर्शवणारे बीआयएस हॉलमार्क दाखवू शकतात. 
 • सोन्यातील घोटाळेही मोठ्या प्रमाणावर असतात. स्थानिक ज्वेलर्स कमी शुद्धतेचे सोने २२ कॅरेट सोने म्हणून देतात, त्यातील गुणवत्तेच्या खुणा गरजेनुसार लपवतात.

भारतीय ग्राहकांना २२ कॅरेट सोने परिचित असतो. हे सोने नेहमी दागिने तयार करण्यासाठी वापरले जाते. तथापि, एखादी व्यक्ती गुंतवणूक करत असेल तर, ती त्याऐवजी नाणे किंवा बारच्या स्वरुपातील २४ कॅरेट सोन्याला प्राधान्य देईल. बाजाराच्या निर्देशानुसार, किंमतीत १० ते १२% वाढ झाली आहे. त्यामुळे सोने मालमत्ता वर्गात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. सध्यातरी सर्वसामान्यांसाठी सोने हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

श्री प्रथमेश माल्या.

एवीपी- रिसर्च नॉन एग्री कमोडिटी एंड करेंसी, 

एंजेल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Title: Assessment of gold investment in India 

Web Search: Gold Investment Marathi Mahiti, sone kharedi Marathi Mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…