Credit Card: क्रेडिट कार्ड बंद करताय? मग हे वाचाच.
Reading Time: 3 minutesनोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात आजकाल एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असतात. अर्थसाक्षर नसलेल्या लोकांच्या मते, क्रेडिट कार्ड वापरणं हे बेजबाबदरीचं लक्षण असतं. पण, आर्थिक सल्लागारांचं मत ऐकलं तर एक लक्षात येतं की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि वेळच्या वेळी त्याचं बिल भरत असाल, तर बँक तुमच्याकडे एक जबाबदार ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्ड योग्यपणे वापरण्याने तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच ‘कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची’ ऐपत वाढत असते. हा क्रेडिट कार्ड वापरण्याचा फायदा सुद्धा आहे. क्रेडिट कार्डची वाढती उधारी जर तुमचं टेन्शन वाढवत असेल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेणार असाल तर आधी हे ५ मुद्दे वाचा आणि मगच आपला निर्णय घ्या: