क्रेडिट कार्ड
Reading Time: 3 minutes

Credit Card

नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात आजकाल एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड (Credit Card) असतात. अर्थसाक्षर नसलेल्या लोकांच्या मते, क्रेडिट कार्ड वापरणं हे बेजबाबदरीचं लक्षण असतं. पण, आर्थिक सल्लागारांचं मत ऐकलं तर एक लक्षात येतं की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि वेळच्या वेळी त्याचं बिल भरत असाल, तर बँक तुमच्याकडे एक जबाबदार  ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्ड योग्यपणे वापरण्याने तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच ‘कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची’ ऐपत वाढत असते. हा क्रेडिट कार्ड वापरण्याचा फायदा सुद्धा आहे. क्रेडिट कार्डची वाढती उधारी जर तुमचं टेन्शन वाढवत असेल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेणार असाल तर आधी हे ५ मुद्दे वाचा आणि मगच आपला निर्णय घ्या: 

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे ६ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? 

१. तुमची थकबाकी पूर्णपणे भरून टाका :

  • प्रत्येक क्रेडिट कार्डवर बरेच व्याज, व्याजावर व्याज हे बँकेने आकारलेले असतात. आपण केलेल्या आर्थिक व्यवहारांना ३,६,९ महिन्यांच्या कालावधीत परतावा करण्याची आपण तरतूद करत असतो. 
  • मूळ रकमेवर हे व्याज तुमची बँक नियमितपणे आकारत असते. क्रेडिट कार्ड बंद करताना आपण फक्त शेवटचं आलेलं बिल भरून निर्धास्त होऊ शकतो. 
  • क्रेडिट कार्ड बंद करताना आपली पूर्ण देय रक्कम बँकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींकडून विचारून घेतली पाहिजे. अन्यथा, हे व्याज दर महिन्यात वाढत जातं. ही रक्कम भरल्याने बँकेचा आणि तुमचा व्यवहार तर संपतोच. शिवाय, तुमच्या ‘क्रेडिट स्कोअर’ला सुद्धा धक्का लागत नाही. 
  • तुम्हाला जर काही कारणामुळे जुन्या क्रेडिट कार्डची देय रक्कम देणं शक्य होत नसेल, तर तुम्ही बॅंकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींच्या मदतीने ती रक्कम नवीन कार्डमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकतात.

२. एसआय (स्टँडिंग इन्स्ट्रक्शन) बंद करा: 

  • आपल्या क्रेडिट कार्डवर आपण बऱ्याच वेळेस अमेझॉन प्राईम सारखे वार्षिक सबस्क्रिब्शनचे ऑटो-रिन्युअल लावलेले असतात. हे सर्व सबस्क्रिब्शन क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी आठवणीने बंद केले पाहिजेत. 
  • बँकेला आपण दिलेली ही ‘दर महिन्याची सूचना’ बँक  आपण सांगितल्याशिवाय बँक रद्द करत नाही. ही सूचना रद्द करावी अन्यथा, ती तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करेल, तुम्हाला दंड आकारेल आणि ती रक्कम वाढत जाईल. 
  • तुम्हाला बँकेकडून ‘नो-ड्युज’ प्रमाणपत्र किंवा तसा इमेल जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्ड बंद झालं आहे अशी खात्री बाळगली नाही पाहिजे. 

महत्वाचा लेख: क्रेडिट कार्ड वि. डेबिट कार्ड, कोणत्या कार्डचा उपयोग कधी कराल?

३. नवीन क्रेडिट कार्ड आधी बंद करावं: 

  • तुमच्याकडे जर एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतील तर त्यापैकी जे कार्ड नवीन आहे ते आधी बंद करावं. 
  • तुम्ही वापरत असलेलं जुनं क्रेडिट कार्ड हे तुम्हाला नवीन कर्ज घेण्यासाठी, इतर बँकांच्या क्रेडिट कार्डच्या ऑफर मिळवण्यासठी पात्र करत असतं. जुन्या क्रेडिट कार्डमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत असतो. ते क्रेडिट कार्ड बंद करण्या ऐवजी नवीन क्रेडिट कार्ड बंद करण्याचा पर्याय निवडा. 

४. नवीन कर्ज हवे असेल तर क्रेडिट कार्ड सुरू ठेवा: 

  • “एखादं क्रेडिट कार्ड बंद केलं, तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो” असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. पण, तसं न होता क्रेडीट कार्ड बंद केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करत असतो. 
  • जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्ही कमी व्याजदराच्या कर्जासाठी पात्र असतात. तुम्हाला जर येत्या काळात गृह कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल तर, त्यावेळेस तुमचं क्रेडिट कार्ड बंद करण्याची घाई करू नका. 

विशेष लेख: क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने कसे वापराल?

५. रिवॉर्ड पॉईंट्सचा वापर करा : 

  • क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी त्यावर असलेले रिवॉर्ड पॉईंट्स हे न चुकता वापरून घेतले पाहिजेत. 
  • हे रिवॉर्ड काही वेळेस कॅशबॅकच्या स्वरूपात असतात तर काही वेळेस व्हाउचरच्या स्वरूपात तुमची बँक हे रिवॉर्ड तुम्हाला देत असते. 
  • ठराविक वेळेत त्यांचा वापर केला नाही तर हे पॉईंट्स रद्द होत असतात. तुमचं क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी हे पॉईंट्स वापरणं विसरू नका. 
  • क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट्स तुम्ही बँकेच्या वेबसईटवर जाऊन ‘रिवॉर्ड’ या भागात जाऊन तुमच्या उपलब्ध पॉईंट्सनुसार योग्य पर्याय निवडा आणि तुमच्या हक्काच्या पॉईंट्सचा वापर करा. 

क्रेडिट कार्ड वापरण्याचे आणि बंद करण्याचे आपले फायदे व तोटे आहेत. आपल्या आर्थिक आरोग्याला योग्य तो निर्णय प्रत्येकाने घ्यावा हेच या लेखातून सांगण्याचा आमचा उद्देश आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Credit Card in Marathi, Credit Card Marathi, Credit Card Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

जागतिक बचत दिन – जगा सन्मानाने…

Reading Time: 2 minutes आज ३० ऑकटोबर! भारतमध्ये आजचा दिवस ‘जागतिक बचत दिन’ (world saving day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझाने’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला. जगभर, ‘जागतिक बचत दिन’ दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतामध्येही पूर्वी हा दिवस ३१ ऑक्टोबरलाच साजरा होत असे. परंतु १९८४ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ३१ ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे त्यानंतर भारतामध्ये ‘जागतिक बचत दिन’ हा ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो.

नोटाबंदीपासून ठप्प नागपूरातील लाकूड व्यापाराच्या संकटात भर

Reading Time: < 1 minute लाकडावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्यात आला असला तरी सरकारने…

सोने खरेदीविक्रीवर पॅनकार्ड अनिवार्य

Reading Time: < 1 minute सद्य परिस्थितीत दोन लाख रुपयांच्यावरील सोने खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.…

एशियन पेंट्स – भारतीय मल्टी नॅशनल कंपनी !

Reading Time: 3 minutes १९४२ च्या दुसऱ्या महायुद्धात भारतात पेन्ट्सची आयात करण्यावर बंदी घालण्यात आली होती.…