Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?
Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.
Jack Ma: ‘मा यून’ ते ‘जॅक मा’ चा यशाचा प्रवास
Reading Time: 2 minutesभारत- चीन चकमकीमध्ये भारताने चीनवर मात दिल्यानंतर नुकतीच आलेली ताजी बातमी म्हणजे “जॅक मा (Jack Ma)” यांची जागा मुकेश अंबानींनी घेतली आहे. होय! आशियामधील सर्वात श्रीमंत आणि जगामध्ये श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या १० व्यक्तींमध्ये असणाऱ्या जॅक मा यांना मागे टाकून मुकेश अंबानी आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्या असून जगामधील श्रीमंतांच्या यादीमध्ये ते आता ९ व्या क्रमांकावर आहेत. कोण आहेत हे जॅक मा? चला तर मग या लेखामध्ये त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. जॅक मा यांच्या बाबतीत असं म्हणता येईल की ‘बस नाम ही काफी है|’
प्रधानमंत्री मुद्रा योजना
Reading Time: 3 minutesकाय आहे मुद्रा योजना? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? मला कर्ज मिळू शकेल का? मिळाल्यास किती मिळेल?
असे बरेच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले असतील. नाही म्हणायला गुगल महाराज आहेत उत्तर द्यायला, पण बर्याच संकेत स्थळांना भेट देऊन देखील म्हणावे तशी समाधानकारक आणि सोप्या भाषेत माहिती मिळेलच असे नाही. आजच्या लेखात आपण मुद्रा योजनेची सोप्या भाषेत माहिती घेऊया.