Arthasakshar Features of Mudra yojana in marathi
https://bit.ly/37Klcmk
Reading Time: 2 minutes

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री मुद्रा योजना या लेखात आपण मुद्रा योजनेची प्राथमिक माहिती घेतली. या लेखात आपण प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये तसेच या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अशा महत्वाच्या गोष्टींची माहिती घेऊया. 

प्रधानमंत्री जन-धन योजनेची माहिती…

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये

१. सरकार “मेक इन इंडियाला” प्राधान्य देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. मुद्रा बँक योजनेमुळे लघु उद्योगांना चालना मिळत असल्याने पर्यायाने मेक इन इंडियाला चालना मिळत आहे.

२. देशात जवळपास ५.७७ कोटी लघु उद्योग आहेत (एन.एस.एस.ओ. च्या २०१३ च्या सर्वेनुसार). यातील बरेच उद्योजक हे अनुसूचीत जाती, जमाती इ. वर्गातले आहेत. तसेच बर्‍याच प्रमाणात ह्या लोकांना खूप कमी रक्कम ती पण नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून मिळते. अशा लघु उद्योगांना अर्थसाहाय्य उपलब्ध झाल्याने रोजगार उपलब्ध तर होतीलच शिवाय अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळेल.

३. अतिशय कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगारासाठी चालना मिळते.

४. मुद्रा योजना ग्रामविकास आणि शहरी विकास योजनांसोबत समांतर काम करते. कर्जाच्या पूर्ततेमुळे ग्रामीण भागात लघु उद्योगांना चालना मिळत आहे. यामुळे शहरात होणारे स्थलांतरण घटेल तसेच शहरांमधील गरिबांचा स्तर स्वयंरोजगारामूळे उंचावतो आहे.

५. मुद्रा कर्ज योजने मधून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकतो.

आयुषमान भारत योजना नक्की आहे तरी काय?…

मुद्रा कर्ज योजनेसाठी आवश्यक बाबी

  • सर्वप्रथम ती व्यक्ति भारतीय नागरिक असणे बंधनकारक आहे. 
  • वयाची १८ वर्ष पूर्ण झालेले असावे.
  • कर्जाच्या पूर्ततेसाठी तारण म्हणून काहीही ठेवण्याची आवश्यकता नाही.
  • मुद्रा योजनेद्वारे कर्ज आपल्याला सर्व बँका, मायक्रो फायनान्स संस्था आणि नॉन बँकींग फायनान्स कंपन्यांकडून मिळू शकते.
  • मुद्रा योजने द्वारे कर्ज प्राप्तीसाठी अर्जदाराची या आधी कोणत्याही बँकेकडे थकबाकी नसावी.

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना…

मुद्रा योजनेतून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

कर्जासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे नेहमीच गरजेचे असते मात्र मुद्रा योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तारण म्हणून काहीही ठेवण्याची गरज नाही शिवाय व्याजदर अत्यल्प असतो. 

१. ओळखपत्र – आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक

२. रहिवासी पुरावा – हल्लीचे टेलीफोन बिल, वीजबिल, संपत्ति कर पावती (२ महिन्यापेक्षा जूनी नको), आधार कार्ड, मतदान कार्ड

३. जातीचा पुरावा – एस.सी., एन.टी., ओबीसी, मायनॉरिटी इ. चे प्रमाणपत्र

४. आपल्या व्यवसायाचा पुरावा – व्यवसाय परवाना व पत्ता याचे कागदपत्र

५. बँकेच्या खात्याचे विधान (स्टेटमेंट) – व्यावसायिक बँक खात्याचे मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट (किशोर व तरुण श्रेणीसाठी)

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)…

६. व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इत्यादींचे कोटेशन व बिले

७. व्यवसायाचे इन्कम टॅक्स /सेल टॅक्स रिटर्न यासोबत मागील दोन वर्षाचे बॅलेन्स शिट (किशोर व तरुण श्रेणीसाठी)

८.खेळत्या भांडवल कर्जसाठी एका वर्षाची प्रक्षेपित बॅलेन्स शिट (२ लाख व त्यावरील कर्जासाठी)

९. अर्ज भरण्यापूर्वी आणि सध्याच्या वित्तीय वर्षात विक्री. (किशोर व तरुण श्रेणीसाठी)

१०. प्रकल्प अहवाल (प्रस्तावित प्रकल्पाचा) – प्रकल्प अहवाल ज्यात यांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेचा अहवाल देखील प्रदान करावा लागतो.

११. मेमोरँडम आणि असोसिएशनचे लेख

१२. फोटोप्रत (दोन)

माझी कन्या भाग्यश्री योजना…

आता नक्कीच आपल्या सर्वांना नेमकी प्रधानमंत्री मुद्रा योजना कशी कार्यरत आहे, कर्ज कोणाला आणि कसे मिळते हे सर्व लक्षात आले असेलच. मुद्रा योजनेचे अनेक लाभार्थी आहेत आणि पुढेही असतील. अनेक छोट्या उद्योगांना मुद्रा कर्ज योजनेमुळे आर्थिक सहाय्य लाभले.

“चप्पल शिवण्याचे काम करणार्‍याने मुद्रा द्वारे कर्ज घेऊन चपला आणि बॅग यांचे छोटेसे दुकान सुरू केले. ज्यामुळे आता त्याला मुलांची शिक्षण करता येतील”, ही आणि अशी कितीतरी सकारात्मक उदाहरणे आपल्या समोर आहेत. स्वयंरोजगार, लघु उद्योगांना चालना आणि रोजगार निर्मिती यामुळे नक्कीच आपल्या देशाच्या विकासाला मोलाचा हातभार लागेल.

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.