वाहतूक नियम मोडणे आता महागात पडणार

Reading Time: 2 minutes देशातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सन २०१७ मध्ये रस्त्यावर एकूण ४,६४,९१० अपघात झाले होते त्यामध्ये एकूण १,४७,९१३ लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातांमधील जवळपास ४५% अपघात हे हायवे सोडून इतरत्र झालेले आहेत. अपघातांना रोखण्यासाठी गेली काही वर्षे अनेक प्रकारची उपाययोजना चालू आहे. पण त्याला मिळणारं यश अत्यल्प आहे. सध्या अपघातांचे प्रमाण ३% नी कमी झालं आहे. अर्थात हे पुरेसं नाही. म्हणूनच शक्य तितके प्रयत्न सरकारकडून होत आहेत. या प्रयत्नांचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे, रस्ते व वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी लोकसभेत सादर केलेले “मोटर वाहन दुरुस्ती विधेयक”

बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

Reading Time: 2 minutes कर हा शासनाच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. आपला कर प्रामाणिकपणे भरणे हे प्रत्येक करदात्याच्या कर्तव्य आहे. अर्थात कायदेशीर मार्गाने करबचत करणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा वापर करणे हा गुन्हा नाही तर अधिकार आहे. परंतु बेकायदेशीर मार्गाने काहीतरी जुगाड करून करदायित्व टाळणाऱ्या तमाम ‘करबुडव्यांना’ चाप बसण्यासाठीच्याउपाययोजना करून, त्यांना ताळ्यावर आणण्याच्या दृष्टीने  या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.

२०१९ च्या अर्थसंकल्पातील ३० महत्वपूर्ण घोषणा

Reading Time: 3 minutes दरवर्षी दिसणाऱ्या लाल सुटकेस मधून दिमाखात आगमन  करणारा अर्थसंकल्प यावर्षी पहिल्यांदाच लाल कपड्यात गुंडाळलेला होता. या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग, गरीब जनता, सामान्य करदाते, परकीय गुंतवणूक, डिजिटलायझेशन अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला असून, सर्वसामान्य करदात्यांवरचा कराचा बोजा कमी करून श्रीमंत करदात्यांना अधिक कर आकारण्यात येणार आहे. याद्वारे सामाजिक असमतोल सुधारण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आला आहे. 

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?

Reading Time: 2 minutes अर्थ म्हणजे पैसे आणि अर्थसंकल्प म्हणजे साहजिकच आर्थिक गोष्टींशी निगडीत असणाऱ्या गोष्टींबाबतची सविस्तर मांडणी. मुळात अर्थ हा विषयच एवढा मोठा आहे की त्यामध्ये अनेक बाबींचा समावेश असतो. आणि जर हा अर्थसंकल्प देशाचा अर्थसंकल्प असेल तर तो तयार करताना अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार असतो. 

अर्थसंकल्प – अंतरिम अर्थसंकल्प (हंगामी) अर्थसंकल्प म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes राज्यघटनेच्या कलम ११२ प्रमाणे संपूर्ण अर्थसंकल्प व कलम ११६ प्रमाणे हंगामी अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो. सत्ताधारी पक्ष पुढील आर्थिक वर्षात सत्तेत राहणार असेल तर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो. परंतु सरकारची मुदत संपत आली असेल तर सरकार “लेखनुदान” (Votes on Account) सादर करते. यामध्ये जमाखर्चाचा तपशील असतो. संपूर्ण अर्थसंकल्प सादर करायचा अधिकार सत्ताधारी सरकारला असतो.

क्रेडिट कार्डमुळे सिबिल स्कोअर खालावतो का?

Reading Time: 2 minutes सिबिल स्कोअर चांगला असणे हे ती व्यक्ती आर्थिक बाबतीत शिस्तप्रिय व जबादार असण्याचं लक्षण आहे. पण प्रत्येक जबाबदार व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगलाच असेल असे नाही. आपल्याही कळत-नकळत बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे सिबिल स्कोअर खालावतो याची आपल्याला कल्पनाच नसते.

आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

Reading Time: 3 minutes तुमच्या स्वतःचा पगार आणि इतर उत्पन्नाचे आर्थिक नियोजन तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. गरज वाटल्यास त्याचा एक लिखित आराखडा तुमच्या जवळ असेल तर उत्तमच. पण निदान तुम्ही कुठे खर्च करू इच्छिता? येत्या काळात कोणते संभाव्य खर्च आहेत? कोणती संभाव्य आवक आहे? अडचणीच्या काळी कुठून खर्च करणार? कर्ज घेणार का? किती घेणार? निवृत्तीनंतर काय? अशा प्रश्नाची उत्तरे खूप सुरवातीपासून तपासत राहावी म्हणजे आपल्याबरोबरच आपल्या परिवाराच्या आनंदाची हमी आपण देऊ शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्नच्या ई-व्हेरिफिकेशनच्या ५ सोप्या पद्धती

Reading Time: 2 minutes आत्तापर्यंत आयकर रिटर्न भरल्यानंतर ते व्हेरिफाय करण्यासाठी ITR-V हा फॉर्म म्हणजे ITR फाईल केल्यावर आयकर विभागाच्या साईटवर तयार होणारी पोचपावती (acknowledgement) डाऊनलोड करावी लागत असे. नंतर सदर पावती सही करून सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर म्हणजे सी.पी.सी. बेंगलोरला पाठवावा लागत असे. नाही म्हटलं, तरी ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ होती. आता मात्र ही प्रकिया इलेक्ट्रॉनिकली त्वरित पूर्ण करण्याच्या ५ सोप्या आणि सहज पद्धती उपलब्ध आहेत. याबद्दल अनेकजणांना माहिती नसते.

क्रेडिट कार्ड आणि सिबिल स्कोअर

Reading Time: 2 minutes कोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना आपला सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. हा स्कोअर आपल्या कोणत्याही एकाच व्यवहारावर ठरत नसतो. आपला सिबिल स्कोअर म्हणजे आपण सातत्याने करत आलेल्या सर्व आर्थिक उलाढालींचा एकत्रित परिणाम असतो. या स्कोअरवर कर्ज मंजूर वा नामंजूर होणे अवलंबून असते. हा स्कोअर खराब असल्यास आपण कर्ज घेण्यास पात्र ठरण्यासाठी तो सुधारायला साधारण ४ ते १२ महिने लागू शकतात.

तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?

Reading Time: 3 minutes प्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असत. कुटुंबातील सदस्यांना आरामदायक आयुष्य मिळावं किंवा त्यांना कुठल्याही आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू नये याचा प्रयत्न कुटुंबातील प्रमुख किवा प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. घरातील प्रत्येकाच्या आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण करणे इतकंच त्यात समाविष्ट नाही. त्याशिवायही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा देतील.