Reading Time: 2 minutes

सिबिल स्कोअर चांगला असणे हे ती व्यक्ती आर्थिक बाबतीत शिस्तप्रिय व जबादार असण्याचं लक्षण आहे. पण प्रत्येक जबाबदार व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगलाच असेल असे नाही. आपल्याही कळत-नकळत बऱ्याचदा आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे सिबिल स्कोअर खालावतो याची आपल्याला कल्पनाच नसते.

सर्वसामान्यांमध्ये  सिबिल आणि सिबिल स्कोरबद्दल अनेक गैरसमज आहेत. सिबिल स्कोअरच्या एकापेक्षा एक सुरस कथा आपल्याला ऐकायला मिळतात. मुळात, या कथा म्हणजे अनुभव असतात आणि हे अनुभव त्या व्यक्तीचे तेव्हाच्या परिस्थितीनुसारचे वैयक्तिक अनुभव असतात. पण हे लक्षात न घेता  सरसकट विधानं केली जातात आणि खऱ्या माहिती किंवा प्रक्रियेऐवजी गैरसमजच जास्त पसरतात.

क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट रिपोर्ट चांगला येतो आणि कर्ज लवकर मिळतं हा  अजून एक गैरसमज म्हणता येईल. आपला क्रेडिट रिपोर्ट आणि सिबिल स्कोअर आपण क्रेडिट कार्डचा वापर किती आणि कसा ठरतो यावर ठरतो. या वापरावर आपला सिबिल स्कोअर सुधारणार की खालवणार हे ठरतं.

सिबिल स्कोअर खालावण्याच्या अशाच काही सवयी-

१. एकाच क्रेडिट कार्डचा अधिक वापर-

  • बहुतेकदा आपण बरेचसे खर्च एकाच क्रेडिट कार्डवरून करतो. त्यामुळे एकाच क्रेडिट कार्डचा जास्त वापर केला जातो. असे सातत्याने होत राहिल्यास सिबिल स्कोअर खालावतो का? तर नाही. सिबिल स्कोअर खालावण्याचं मुख्य कारण म्हणजे क्रेडिट मर्यादेचा साधारण अपेक्षेपेक्षा जास्त वापर होणे हे असतं. 
  • क्रेडिट कार्डचा वापर नक्की करावा, त्यामुळे सिबिल स्कोअर सुधारण्यास मदतच  होत असते. पण त्याच्या वापरावर मर्यादा असणे गरजेचे आहे. 
  • क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांचं शेवटी उधार असंच वर्गीकरण केलं जातं आणि वारंवार उधारावर व्यवहार होणे हे त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीबाबत शंका उत्पन्न करणारं आहे. म्हणून एकाच क्रेडिट कार्डवरून सातत्याने क्रेडिट लिमिटपेक्षा जास्त अथवा क्रेडिट कार्ड कर्ज घेऊन व्यवहार करायची सवय असल्यास त्याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

२. पात्र असलेल्या सेवांचा स्विकार-

  • जर तुम्ही क्रेडिट कार्डची आर्थिक मर्यादा वाढवून मिळण्यास किंवा अजून एखादे क्रेडिट कार्ड घेण्यास/मिळण्यास पात्र असाल तर या सेवांचा अवश्य लाभ घ्या. क्रेडिट कार्डची आर्थिक मर्यादा वाढवून मिळणे याचा अर्थ त्या-त्या आर्थिक संस्थेने तुमच्यावर दाखवलेला विश्वास असतो. त्या सेवांचा लाभ जरूर घ्यावा, त्याची नोंद आपल्या क्रेडिट रिपोर्टमध्ये होत असते. 
  • परंतु, वाढीव मर्यादेचा अर्थ गरज नसतानाही पात्रता,कुवत किंवा उपलब्ध आहे म्हणून खर्चही वाढवावा असा होत नाही. असे झाल्यास त्याचीही नोंद सिबिलकडे होतेच. परिणामी आपला सिबिल स्कोअर घसरतो.

३. ना हरकत प्रमाणपत्र (NOC )-

  • जर तुम्ही एखादं क्रेडिट कार्ड बंद करणार असाल तर ते कार्ड देऊ करणाऱ्या संस्थेकडून तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र मिळणं अनिवार्य आहे. अनेकदा ग्राहक कार्ड बंद करवून घेतात पण त्याचा पुढे असे प्रमाणपत्र मिळेपर्यंत पाठपुरावा करत नाहीत. अनेकांना तर असे प्रमाणपत्रही घ्यायचे असते हेच माहिती नसते. 
  • संस्था किंवा ग्राहक, कोणाच्याही बाजुने झालेल्या अशा हलगर्जीपणाचा प्रतिकुल परिणाम ग्राहकाच्याच सिबिल स्कोअरवर होतो. अशा व्यवहारानंतर त्याची नोंद सिबिलकडे ४५ दिवसांच्या आत होणे आवश्यक असते. याचाही पाठपुरावा ग्राहकाने काळजीपुर्वक करायला हवा. 

सिबिल स्कोअरचा कर्ज मंजूर होण्या न होण्यात नेहमीच लक्षणीय वाटा असतो. विनातक्रार, आणि लवकरात लवकर कर्ज मंजूर होण्यासाठी चांगला सिबिल स्कोअर (साधारण ७००च्या वरती) असणं अत्यंत आवश्यक आहे. असे असल्यास बँकांकडून कर्ज मान्य करताना फारसा विचार केला जात नाही.  

क्रेडिट कार्ड आणि सिबिल (CIBIL) स्कोअर,

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

सिबिल स्कोअर आणि गैरसमज,

डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved. 

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.