पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १

Reading Time: 2 minutesआजच्या काळात कोणावर कुठलं संकट येईल सांगता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला बरेचदा आर्थिक मदत हवी असते. त्यामुळे ‘पर्सनल लोन’ची अनेकांना गरज पडते. पर्सनल लोनसाठी बँकेकडे अर्ज करावा लागतो. पण तो अर्ज मान्य होण्यास काही अटींची पूर्तता होणे गरजेचे असतं. त्यात काही चुका निदर्शनास आल्यास वैयक्तिक कर्ज  नाकारले जाते. यामुळे वेळेवर अडचण निर्माण होऊ शकते. वैयक्तिक कर्ज नाकारले जाऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे.

सुकन्या समृद्धी योजना – भाग ३

Reading Time: 2 minutesसुकन्या समृद्धी योजनेचे सर्व फायदे समजले असतील तर आपल्या मुलीच्या पंखाना बळ देण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे, तिच्या दूरगामी भविष्याची सोय करून ठेवणं. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा उत्तम पर्याय आहे. या भागात सुकन्या समृद्धी खात्यासंदर्भात पडणारे महत्वाचे प्रश्न व उत्तरे जाणून घेऊया.  

गूगल पैसा कसं कमावतं? भाग २

Reading Time: 3 minutesगूगल गाय दूध तर खूप देते आणि स्वतःही हवा तेवढा चारा मिळवते. मोठा चारा घोटाळा गूगल गायीचा अजून तरी झालेला ऐकिवात नाही. गूगलने गेल्या काही वर्षांत पाचशे कंपनीज विकत घेतल्या त्याही हजारो लाखो डॉलर्स मध्ये. म्हणजे गूगल किती जबरदस्त महसूल कमावत असेल हे लक्षात येतं. पण कसं कमावतं हे ही मनोरंजक आणि महत्वाचं आहे.

पॅन कार्डचे बदलेले महत्वाचे नियम

Reading Time: 2 minutesदहा क्रमांक असलेलं  पॅन कार्ड हे एक किती महत्त्वाचं कार्ड आहे हे सांगायला नको. एका दिवसात बँकेद्वारे  पन्नास हजारावरील आर्थिक व्यवहार करताना धारकाजवळ पॅन कार्डची आवश्यक असते. या नियमांची प्रत्येकाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बदलण्यात आलेल्या नियमांपैकी चार नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

गूगल पैसा कसं कमावतं? भाग १

Reading Time: 2 minutesगूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं? किंवा का देतं? असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत.आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही. मग ही गूगलगाय मोफत गूगल दुग्ध कशी देत असावी? मग गूगल पैसा कसं कमावतं? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. गूगल ही पाश्चिमात्य कंपनी. त्यामुळे “फ्री मील्स” देण्याचा संबंधच नाही. गूगल हवं तेव्हा हवं तितकं त्याच्या ‘सर्च इंजिन’द्वारे कुठे कुठे फिरवून आणतं, हवी ती माहिती देतं. गूगलच्या ‘जीमेल (Gmail) वरून वैयक्तिक तसेच व्यावहारिक मेल संवाद सुरूअसतात. मग ही सर्व ‘सेवा’ गूगल कशी ‘फ्री’ मध्ये त्याच्या ‘ग्राहकांना’ कशी देत असेल? आणि का देत असेल?

सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये

Reading Time: 2 minutesएखाद्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खाते उघडायचे असेल तर नैसर्गिक (जैविक) पालक किंवा कायदेशीर पालक यांच्याकडून उघडले जाऊ शकते. मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा पीईफ सुविधा पुरवणाऱ्या बँकेत अथवा काही सरकारी बँकेत उघडता येते. संबंधित बँकेच्या सर्व शाखांमध्ये हे खाते उघडता येते का? याची एकदा खात्री करा. (स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एसबीएच, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आंध्रा बँक, यूको बँक, इलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक इ. बँकांच्या शाखामध्ये ही सुविधा आहे). तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार आयसीआयसीआय बँक व ऍक्सिस बँक या खाजगी बँकांमध्येही हे खाते उघडता येते.

रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान

Reading Time: 2 minutes“Salary Credited to Your Account No. xxxxxx .” हा मेसेज सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा आणि आनंद देणारा मेसेज आहे. असाच एक मेसेज सध्या व्हाट्स ऍपवर फिरतो आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून येणारा ‘रिटर्न अमाऊंट क्रेडीटेडचा मेसेज’! दुर्दैवाने ‘सॅलरी क्रेडीटेड’च्या मेसेजप्रमाणे हा मेसेज आनंद देणारा नाही.  इन्कम टॅक्स डिपार्टकडून अशा प्रकारचे कोणतेही मेसेज नागरिकांना पाठविण्यात आलेले  नसून अशा प्रकारच्या मेसेजेसच्या बाबतीत नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

विमा ग्राहकाची फसवणूक: आपण काय काळजी घ्याल?

Reading Time: 3 minutesपॉलिसीधारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या पाच पॉलिसी बंद करून त्याच्या नावे दोन नवीन पॉलिसी परस्पर उघडून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Compound Interest: चक्रवाढ व्याजाची जादू

Reading Time: 3 minutesअनेकदा गुंतवणुकीचे साधे सोपे पण जास्त फायदा मिळवून देणारे पर्याय आपल्या समोर असतात पण निव्वळ पुरेशा माहितीअभावी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती करून घेतल्यास जास्त फायदा होऊ शकतो.

१ जानेवारी २०१९ पासून ATM कार्ड्स अवैध ठरणार का?

Reading Time: 2 minutesबँकेकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्डमध्ये आता एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे जुन्या मॅग्नेटिक स्ट्रीपऐवजी EMV (युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा) कार्ड्स आता चलनात येतील. तसेच रिझर्व बँकेच्या आदेशानुसार जुनी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली  सर्व कार्ड्स १ जानेवारी २०१९ पासून ब्लॉक केली जातील. रिझर्व बँकेने २७ ऑगस्ट, २०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार दिनांक १ सप्टेंबर, २०१५ पासून बँकांनी EMV तंत्रज्ञान असणारे कार्ड जरी करणे बंधनकारक आहे.