गुंतवणुकीची  गोष्ट हातातली…..

Reading Time: 3 minutesकाल सरत्या वर्षाचा अखेरचा महिना सुरु झाला. आपण सगळे जण हे वर्ष किती पटकन संपलं? लक्षातच नाही आले. अशा वाक्यांनी सुरुवात करणार आणि ३१ डिसेंबरची वाट बघणार. कशासाठी? तर नविन वर्षात नविन संकल्प सुरु करायचे म्हणून. या महिन्यात सर्व जण नविन वर्षात काय काय सवयी शिस्तबद्धपणे अंगीकारायच्या याची मनातल्या मनात किंवा अगदीच साक्षर लोकं वहीत लिहून यादी बनविणार. मग अर्थसाक्षर जन काय करणार?

गुंतवणुकीचे ४ ‘P’लर

Reading Time: 3 minutesगुंतवणूक करतांना किमान ४ Pलर अनुकरणीय असतात.Participation – सहभाग, Provision – तरतूद, Protection – जोखमीचे सरंक्षण, Profit – परतावा आता वरील मुद्द्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ६

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंडांची निर्मिती मोठया समूहाच्या विखुरलेल्या छोटया-छोटया रकमेची गुंतवणूक करण्यासठी झाली. काळानुसार त्यात पारदर्शकता आणण्यासाठी बदल होत गेले, होत आहेत आणि होत राहतील. तरीदेखील दोन प्रकारची जोखीम ही कायम असणार आहेच. पहिली अर्थचक्राची आणि दुसरी कंपनीच्या दोषात्मक व्यवस्थापनाची. कारण या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या बचतीवर परिणाम करू शकतात. हे टाळण्यासाठी तुमची जोखीम क्षमता माहिती असायलाच हवी. 

फिटे अंधाराचे जाळे….गुंतवणूक विशेष

Reading Time: 3 minutesLPG म्हणजेच Liberalization, Privatization आणि Globalization. दुर्दैवाने या स्थित्यांतराकडे बघण्याचा दृष्टीकोन सामान्य बचतकर्त्याकडे नसतो. त्याचे कारण वर नमूद केले आहेच. परंतु त्याला छोटीशी का होईना गुंतवणूक सुरु करायची असते. ही सुरुवात मात्र इच्छा, आस की ध्येय हे ठरवता येत नाही. मग पदरी अंधारच पडतो. 

म्युच्युअल फंड क्या है? -भाग ५

Reading Time: 3 minutesया लेखमालेच्या तिसऱ्या भागात योजनांचे माहितीपत्रक का वाचावे? याचा उहापोह केला होता. आज आपण म्युच्युअल फंडांचे प्रकार, योजनांचे वैविध्य याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करू. गुंतवणूकीसाठी कायम खुला (Open Ended), मुदत बंद (Close Ended) आणि विशिष्ट कालावधीसाठी खुला होणारा (Interval) असे फंडांचे तीन मुख्य प्रकार असतात. तुम्हाला नावं वाचून फंडांच्या प्रकारांची कार्य करण्याची पद्धत लक्षात आली असेल.

म्युच्युअल फंड क्या है?- भाग ४

Reading Time: 3 minutesया लेखमालेचा हेतू सर्व वाचकांना म्युच्युअल फंड नक्की कसे काम करते? हा आहे. परंतु विषय तसा क्लिष्ट असल्यामुळे वाचकांना चांगला परतावा देणाऱ्या योजनांची नावे किंवा माझा फंड का चालत नाही? याबाबत जाणून घेण्यात उत्सुकता आहे असे आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते.  मागील लेखात आपण नियंत्रकांची भूमिका, कायदे व गुंतवणूकदारांचे हक्क याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. या भागात आपण म्युच्युअल फंडाचे वितरक, हिशेब, करदायित्व व मुल्यांकन याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. 

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

Reading Time: 4 minutesम्युच्युअल फंड आस्थापनांना विविध स्वतंत्र नियंत्रकांसोबत काम करावे लागते. जसे की रिझर्व्ह बँक ही रोखे बाजार तसेच आंतरराष्ट्रीय विनिमय बाजाराचे स्वतंत्र नियंत्रक म्हणून काम पाहत असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांना अधीन राहूनच रोखे, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुका, परदेशी गुंतवणूकदार यांच्यासोबत काम करता येते.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग २

Reading Time: 3 minutesश्रीगणेशाची स्थापना करण्याची एक विधिवत पद्धती आपल्याकडे परंपरेनुसार चालत आली आहे. त्यासाठीची संहिता प्रत्येक घरात पाळण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या घरात अनुभवी ज्येष्ठ असतील तिथे त्रुटी राहत नाही. परंतु नवथर मंडळी असतील तर बहुतेकदा सोपस्कार पार पाडले जातात. असंच काहीसं म्युच्युअल फंड व त्यातील विविध पर्यायांची कार्यपद्धती माहित न करून घेता जाहिरात बघून कमिशन वाचणार म्हणून डायरेक्ट गुंतवणूकदार बनतात. मग पदरी मोदकाचा प्रसाद येण्याऐवजी खिरापत सांभाळण्याची वेळ येते.

आहे म्युच्युअल फंड तरी…..

Reading Time: 3 minutesएका खाजगी संस्थेने (YouGuv) केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात गुंतवणूक साधनांमधे मुदत ठेवी पहिल्या क्रमांकावर, विमा योजना दुसऱ्या तर म्युच्युअल फंड योजना तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याखालोखाल सोने, पीपीएफ, शेअर्स असा क्रमांक लागतो. या आठवडयात बाजार आणि म्युच्युअल फंडाबद्दल समाज माध्यमांवरून इतकी नकारात्मकता पसरवली गेली की बाजार पुढील आठवडाभर बंद राहणार, अशी देखील हाळी देण्यात येत आहे. म्हणूनच म्युच्युअल फंडाची थोडी पार्श्वभूमी माहित करून घेण्याचा प्रयत्न या लेखात करू.

संकल्पाचा ‘अर्थ’ आणि गुंतवणुकीचा १५×१५×१५ चा नियम

Reading Time: 3 minutesअर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण पाहता बऱ्याच गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीची चिंता भेडसावू लागली आहे. स्थिर सरकार आले म्हणून बाजार वर जाणार, या अपेक्षेने भरघोस परतावा मिळेल या आशेवर असलेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. खरतरं शेअर बाजार म्हणजे चढ-उतार हे समीकरण निश्चित ठरलेल आहे. मग एकतर तुम्ही परताव्याचा दर किंवा गुंतवणूक कालावधी ठरवून संकल्प सोडला पाहिजे. परंतु गुंतवणूक म्हणजे रग्गड नफा हेच एक समीकरण आपल्या मनात ठरलेले असते. मग तो नाही मिळत असे दिसू लागले की तोटा सहन करणे किंवा केलेली गुंतवणूक कवटाळून धरणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात.