Reading Time: 3 minutes

नवरात्र संपतांना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. गेल्या तीन आठवड्यांपासून हिरीहिरीने राजकीय चर्चा आणि जल्पक बनून संदेश वहन करणारे लोकशाहीचे उपासक आज मतदानाचा हक्क बजावून कृतकृत्य होतील. आपणही आपला हक्क बजावला असेल. या लेखमालेच्या तिसऱ्या भागात योजनांचे माहितीपत्रक का वाचावे? याचा उहापोह केला होता. आज आपण म्युच्युअल फंडांचे प्रकार, योजनांचे वैविध्य याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

गुंतवणूकीसाठी कायम खुला (Open Ended), मुदत बंद (Close Ended) आणि विशिष्ट कालावधीसाठी खुला होणारा (Interval) असे फंडांचे तीन मुख्य प्रकार असतात. तुम्हाला नावं वाचून फंडांच्या प्रकारांची कार्य करण्याची पद्धत लक्षात आली असेल.

 1. कायम खुला (Open Ended):- या प्रकारात गुंतवणूकदार कधीही युनिट्सची खरेदी-विक्री करू शकतो. ही युनिट्सची खरेदी-विक्री त्यावेळेच्या एनएव्ही (NAV) नुसार घडून येते. (मागील लेखात याची माहिती घेतली आहे.) 
 2. मुदत बंद (Close Ended):- या प्रकारात मुदतपूर्ती ठरलेली असते. गुंतवणूकदारांना अशा योजनांचे युनिट्स एनएफओ (NFO) दरम्यान खरेदी करता येतात. या प्रकारातील योजनांची शेअर बाजारात नोंदणी करावी लागते. जर एखादया गुंतवणूकदाराला तातडीची गरज पडल्यास शेअर बाजारात खरेदीदार उपलब्ध असल्यास युनिट्सची विक्री करून पैसे मिळवू शकतो. अशा व्यवहारात मागणी-पुरवठा या तत्वानुसार युनिटची किंमत एनएव्हीपेक्षा (NAV) कदाचित वेगळी असू शकते.
 3. खुला होणारा (Interval): हा प्रकार म्हणजे ओपन एंडेड (Open Ended) व क्लोज एंडेड (Close Ended) या दोन्ही प्रकारांचे एकत्रीकरण असे म्हणता येईल. अंशतः खुला व दीर्घ काळ मुदत बंद, अशी याची संरचना असते. उदाहरणार्थ जानेवारी १ ते १५ व जुलै १ ते १५ या दरम्यान खरेदी-विक्री करिता खुला तर इतर वेळी मुदत बंद अशा प्रकारे काम सुरु असेल. यात एखादया गुंतवणूकदारास बाहेर पडण्यासाठी किंवा आत शिरण्यासाठी संधी मिळू शकते.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग २ 

फंड चालविण्याची दोन पद्धती असतात:

 • कार्यक्षम(Actively Managed) पद्धतीने चालविला जाणारा फंड:- यामध्ये फंड व्यवस्थापकांना गुंतवणूक साधनांची निवड करण्यास वाव मिळतो. त्यामुळे व्यवस्थापकांची जबाबदारी वाढून गुंतवणूकदारांच्या अधिक परतावा मिळविण्याच्या अपेक्षा देखील वाढतात.
 • स्वयंचलित(Passively Managed) पद्धतीने चालविला जाणारा फंड:- यामध्ये  निर्देशांकाचे अनुकरण करून गुंतवणूक केली जाते. त्यामुळे कुठलाही मानवी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसते. फंड चालविण्यासाठी लागणाऱ्या खर्चात होणारी कपात हा लाभ असला तरी निर्देशांकापेक्षा जास्त परतावा मिळेल ही शक्यता कधीच नसते. अशा प्रकारच्या फंडांना इंडेक्स फंड (Index Fund) म्हणून देखील ओळखले जाते.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

म्युच्युअल फंड योजना पुढील ३ प्रकारांत विभागल्या जातात.

 • रोखे (Debt):– या प्रकारच्या योजना फक्त सरकारी रोखे, ट्रेझरी बिल्स, बॉण्ड्स तसेच डिबेंचर्स यात गुंतवणूक करतात. याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
  • गिल्ट फंड
  • इन्कम फंड
  • जंक बॉण्ड योजना
  • शाश्वत मुदतपूर्ती योजना (Fixed Maturity Plan)
  • फ्लोटिंग रेट फंड
  • लिक्विड फंड

उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

 • समभाग (Equity):– या प्रकारच्या योजना समभाग सलंग्न गुंतवणूका करतात. या योजना भांडवल वृद्धीसाठी काम करतात. याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
  • सेक्टर फंड
  • थिमॅटिक फंड
  • ईएलएसएस
  • राजीव गांधी इक्विटी सेविंग्ज स्कीम
  • डिव्हिडंड इन्कम स्कीम्स
  • अर्बिट्राज फंड
 • गोल्ड फंड:– या योजना सोने अथवा सोन्याशी सलंग्न प्रकारात गुंतवणूक करतात. याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
  • गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड
  • गोल्ड सेक्टर फंड
 • मिश्र (Hybrid):– या योजना रोखे व समभाग अशा दोन्ही प्रकारांत गुंतवणूक करतात. काही योजना गोल्ड स्कीम्समधे देखील गुंतवणूक करतात. याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
  • मासिक उत्पन्न योजना
  • भांडवल सुरक्षित योजना
  • बॅंलन्स फंड योजना

म्युच्युअल फंड क्या है?- भाग ४

यांच्या जोडीला इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स, वायदेबाजाराशी सलंग्न असणाऱ्या योजना, आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजना, फंड ऑफ फंड्स तसेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड असे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत.

तुम्हाला एवढया योजनांची नावं वाचतांना कंटाळा आला असेल. या सर्वांचे सखोल विश्लेषण वाचायला किती कष्ट पडतील. संक्षिप्त स्वरुपात सगळ्या उपप्रकारांची ओळख करून देणे म्हणजे व्हाट्स अप चॅटवर “GnSdTc” लिहून प्रेम व्यक्त करण्यासारखं होईल. भविष्यात कधीतरी प्रत्येक प्रकारच्या एका योजनेचे विश्लेषण लिहून समजावून घेण्याचा प्रयत्न करू.

“कौन बनेगा करोडपती”च्या एका शोमधे अमरावतीच्या श्रीमती बबिता ताडे यांनी १ करोड रुपयांचे इनाम जिंकले. १ करोड जिंकण्यासाठी त्यांना १६ प्रश्नांची उत्तर द्यावी लागली. हे खरंय की त्यांनी काही अवघड प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय वापरले. त्यात त्यांना प्रेक्षकांची आणि एका तज्ञाची मदत घ्यावी लागली. परंतु त्यामुळे त्यांना मिळालेल्या बक्षिसाची किंवा त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा तसूभरही कमी होत नाही.

असंच काहीसं तुमचे आर्थिक सल्लागार अभ्यास करून तुम्हाला कामी येईल, अशी गुंतवणूक सुचविण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या अर्थव्यवस्था, बाजार आणि गुंतवणूका याबाबत सगळेच साशंक आहेत. तेव्हा हिच ती वेळ, सल्लागार आणि एजंट यातला फरक ओळखण्याची.

– अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

94 23 18 75 98

[email protected]

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…