म्युच्युअल फंड क्या है? – भाग ६

Reading Time: 3 minutes

मागील अडीच महिन्यांपासून सुरु असलेली ही लेखमाला थांबविण्याची वेळ आली आहे. चांगले कथानक असलेली मालिका गरज नसताना लांबविली की रटाळ वाटायला लागते, तसं व्हायला नको. या लेखमालेतून वाचकांना म्युच्युअल फंडाबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. वाचकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

म्युच्युअल फंड क्या है? – भाग २

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

म्युच्युअल फंड क्या है?- भाग ४

म्युच्युअल फंड क्या है? -भाग ५

 • गेल्या आठवडयात बाजाराने अनपेक्षित उसळी घेतली आणि पाऊस थांबल्यानंतर जशी सर्वत्र हिरवळ दिसू लागते तसेच सर्वांच्या पोर्टफोलिओचा परतावा हिरवा रंग दाखवू लागले. ३० ऑक्टोबर हा जागतिक बचत दिन म्हणून साजरा केला जातो. 
 • २०१० ते २०१९ दरम्यान भारतीय बचतकर्त्यांचा टक्का ४४% वरून ४०% पर्यंत खाली आला आहे. मग ही ४% घट कशामुळे? याचा सकारत्मक अर्थ काढायचा ठरल्यास भारतीयांची क्रयशक्ती वाढली आहे, असा निष्कर्ष काढता येईल. नकारात्मक्तेला नेहमीच प्रचंड वाव असतो. ज्याचा त्याने निष्कर्ष काढावा.

फिटे अंधाराचे जाळे….गुंतवणूक विशेष

 • माझ्या एका उच्च शिक्षित क्लायंटने विचारलेला प्रश्न, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित आहे का? यू ट्युबच्या महाजालात सर्व प्रकारची माहिती असलेले व्हिडीओज उपलब्ध आहेत. ऐकावे जनाचे करावे मनाचे, या उक्तीप्रमाणे तुमची निरपेक्ष वृत्ती असेल तर योग्य निर्णय घेऊ शकता. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था होते. त्यांनासुद्धा असाच एक व्हिडीओ बघून हा प्रश्न पडला होता.
 • म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखाली असलेला एकूण गुंतवणूक निधी २५ लाख कोटींच्या आसपास आहे. यातली केवळ ४ लाख कोटी रक्कम निमशहरी किंवा ग्रामीण भारतातील गुंतवणूकदारांनी गुंतविली आहे तर, उर्वरित २१ लाख कोटी हे शायनिंग इंडियातील गुंतवणूकदारांचे आहेत.  
 • ही एवढी मोठी दरी का? कारण अपूर्ण माहितीच्या आधारावर कुठल्याही साधनांमधे केलेली गुंतवणूक नकारात्मक परतावा देते.  ही दरी मिटविण्यासाठीच माझ्यासारखे अनेकजण विविध गुंतवणूक पर्यायांची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. 
 • प्रत्येकाला शेअर बाजारातून नफा तर कमवायचा आहे पण जोखीम घ्यायची तयारी नाही. मग म्युच्युअल फंडासारखे साधनं उपलब्ध आहेत तर, भरवसा नाही. 
 • परवा नाशिक ते कसारा टॅक्सीने जाण्याचा प्रसंग आला. दिवाळीची गर्दी असल्याने चालकाने १५० रुपये सीट असे भाडे घेतले. एका प्रवाशाने कुरबुर केली. किती पैसे कमवतात हे लोक? त्यावर चालकाने शांतपणे परंतु धाडसाने उत्तर दिले, “साहेब, दुसऱ्याची कमाई बघाल तर स्वतः कधी प्रगती करू शकणार नाही.” असंच गुंतवणूक करतांना बघितलं जातं. तुम्ही गुंतवणूकीचा निर्णय शेवटचा एकटयाने कधी घेतलाय, आठवून पहा.

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

 • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भूतकाळातील परतावे बघून केली जाते. त्यात काही चुकीचं आहे असं अजिबात नाही. पण तुम्ही मागील ३-५-१०-१५-२० वर्षांचा परतावा बघून गुंतवणूकीचा निर्णय घेता आणि ६ महिने किंवा वर्षभरात तुलना करून बघता, हे कितपत योग्य आहे? 
 • समजा तुम्ही बँकेत मुदत ठेव केली किंवा आवर्ती योजना सुरु केली तर, रोज बँकेत जाऊन माझे पैसे किती झाले हे बघत नाही. का? कारण तुम्हाला परतावा किती मिळणार हे आधीच ठरलेले असते. मुदत ठेवी स्थिर उत्पन्नासाठी आणि म्युच्युअल फंड हे भांडवली नफ्यासाठी असतात, हे मागे एका लेखात सांगितले होते. पण अनेकदा नकारात्मक परतावा पाहून म्युच्युअल फंडांची तुलना मुदत ठेवींशी केली जाते तेव्हा अशा गुंतवणूकदारांची कीव येते.
 • गुंतवणूक कितीही रकमेची असू देत पण त्यासाठी ध्येय असले पाहिजे, हे आधी मनाशी ठरवा. तुम्ही मुदत ठेव किंवा जागा खरेदी का करतात? शिल्लक रक्कम विशिष्ट कालावधीपर्यंत लागणार नाही याची खात्री असते म्हणून मुदत ठेव. आणि अतिरिक्त रक्कम आहे म्हणून किंवा भविष्यात जागेचे भाव वाढतील आणि भांडवली नफा मिळेल या आशेने जागा खरेदी होत असते.हिच साधी सोपी ध्येय ठरविण्याची पद्धत आहे. घेतलेल्या जागेचे भाव वाढतील म्हणून १०-२० वर्षे थांबणारे, म्युच्युअल फंडात ३-५ वर्षेसुद्धा थांबत नाहीत. फक्त वाचन करून किंवा अभ्यास करून कुणाला पदवी मिळते का? त्यासाठी परिक्षा देणे हे ओघाने आलेच.
 • म्युच्युअल फंडांची निर्मिती मोठया समूहाच्या विखुरलेल्या छोटया-छोटया रकमेची गुंतवणूक करण्यासठी झाली. काळानुसार त्यात पारदर्शकता आणण्यासाठी बदल होत गेले, होत आहेत आणि होत राहतील. तरीदेखील दोन प्रकारची जोखीम ही कायम असणार आहेच. पहिली अर्थचक्राची आणि दुसरी कंपनीच्या दोषात्मक व्यवस्थापनाची. कारण या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या बचतीवर परिणाम करू शकतात. हे टाळण्यासाठी तुमची जोखीम क्षमता माहिती असायलाच हवी. 
 • पुन्हा मुळ प्रश्नाकडे वळू. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित आहे का? म्हणाल तर हो, म्हणाल तर नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी “Mutual Fund Investment is subject to Market Risk”  हे जरूर ध्यानात ठेवा. जर तुमची अर्धा तासात ५ किलोमीटर चालण्याची क्षमता नसेल आणि तुम्ही ३० सेकंदात १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत असाल तर निकाल काय लागणार?

एसआयपी(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

आज वैद्यकीय सुविधांमुळे माणसाचे आयुर्मान १०० पर्यंत उंचावले आहे. मग गुंतवणूकीचे वय किती असावे? सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० हे तर अजिबात नाही. गुंतवणूकीचे वय ३वर्षे-९वर्षे-१५वर्षे-३०वर्षे असावे, असे गुंतवणूक शास्त्र सांगते.

अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

9423187598

atulkotkar@yahoo.com

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *